IPL 2023 MI vs RCB Match Video: आयपीएलचा १६वा सीझन ३१ मार्चपासून सुरू झाला असून यामध्ये आतापर्यंत एकूण ७ सामने खेळले गेले आहेत. या मोसमातील ५ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि मुंबई इंडियन्सचा संघ आमनेसामने आले होते. ज्यामध्ये आरसीबी संघाने शानदार सुरुवात करताना सामना ८ गडी राखून जिंकला. या सामन्यात विराट कोहलीची फलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी पाहायला मिळाली. या सामन्यातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

आता या सामन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आरसीबीचा एक खेळाडू त्यांचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला मुंबई इंडियन्सच्या इनिंग दरम्यान चेंडू फलंदाजाच्या हेल्मेटला मारण्याचा सल्ला देताना दिसत आहे. त्यावेळी मुंबई संघाकडून कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन ही सलामीची जोडी मैदानावर उपस्थित होती.

सिराजच्या बॉलवर रोहितने सिंगल घेताच इशान किशन स्ट्राईकवर आला होता. त्यावेळी त्याच्या हेल्मेटवर बॉल मारण्याचा सल्ला देत असल्याचे स्पष्टपणे ऐकू येत आहे. आता हा आवाज ऐकल्यानंतर चाहते अंदाज लावत आहे की हा आवाज विराट कोहलीचा आहे, जो सिराजला असा चेंडू टाकण्याचा सल्ला देत आहे.

विराटने या सामन्यात ८२ धावांची नाबाद खेळी केली होती –

या सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ गडी गमावून १७१ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये तिलक वर्माची ८४ धावांची शानदार नाबाद खेळी पाहायला मिळाली. यानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली या सलामीच्या जोडीने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या आरसीबी संघाला शानदार सुरुवात करून दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी करून सामना पूर्णपणे एकतर्फी केला. या सामन्यात कोहलीने ४९ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ८२ धावांची नाबाद खेळी साकारली. त्याचबरोबर संघाला १६.२ षटकात विजय मिळवून दिला.