Virat Kohli giving Anushka Sharma a flying kiss Video: राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली बॅटने काही खास करु शकला नाही. पण कर्णधार म्हणून त्याने आरसीबीला ७ धावांनी विजय मिळवून दिला. राजस्थान रॉयल्सच्या इनिंग दरम्यान, क्षेत्ररक्षणादरम्यान विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पत्नी अनुष्का शर्माला फ्लाइंग किस देताना दिसत आहे.या सामन्यात डावाच्या पहिल्याच चेंडूवर ट्रेंट बोल्टने त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले. फलंदाजीत फ्लॉप ठरलेल्या विराट कोहलीने मैदानावर कर्णधार आणि क्षेत्ररक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.

विराट कोहलीचा फ्लाइंग किसचा व्हिडिओ व्हायरल –

राजस्थान रॉयल्सच्या डावाच्या १४व्या षटकात हर्षल पटेलने यशस्वी जैस्वालला झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. विराट कोहलीने जैस्वालचा झेलबाद घेतला. आरसीबीसाठी ती अत्यंत महत्त्वाची विकेट होती. कारण यशस्वी सेट झाला होता आणि बंगळुरूसाठी धोका बनू शकत होता. तो ३७ चेंडूत ४७ धावा करून बाद झाला. झेल घेतल्यानंतर विराट कोहलीने स्टँडमध्ये उपस्थित पत्नी अनुष्का शर्माला फ्लाइंग किस दिला. जे पाहून स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांमध्येही उत्साह संचारला.

सामन्याबद्दल बोलायचे तर, प्रथम फलंदाजी करताना ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डुप्लेसीच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारता आली. त्यानंतर हर्षल पटेलने केलेल्या शानदार गोलंदाजीमुळे बंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा सात धावांनी पराभव केला. आक्रमक पध्दतीने खेळताना मॅक्सवेलने ४४ चेंडूत ७७ धावांच्या खेळीत सहा चौकार आणि चार षटकार मारले. डू प्लेसिसने त्याला चांगली साथ देताना ३९ चेंडूत ८ चौकार आणि दोन षटकार खेचून ६२ धावा केल्या.

हेही वाचा – IPL 2023 RR vs RCB: ‘… म्हणून या हंगामात खूप अटीतटीचे सामने पाहायला मिळत आहेत’; विजयानंतर विराट कोहलीचा खुलासा

दोघांनी तिसर्‍या विकेटसाठी अवघ्या ६६ चेंडूत १२७ धावांची भागीदारी केली, ज्यामुळे आरसीबीला नऊ गडी गमावून १८९ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सला ६ बाद १८२ धावा करता आल्या. बेंगळुरूचा हा सात सामन्यांमधला चौथा विजय आहे, तर राजस्थानचा हा तिसरा पराभव आहे. आरसीबीकडून हर्षलच्या तीन बळींशिवाय डेव्हिड विली आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक बळी मिळाला. विलीने चार षटकांत २६ तर सिराजने ३९ धावा दिल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या विकेटसाठी ३४ चेंडूत ५२ धावांची खेळी –

राजस्थानसाठी देवदत्त पडिक्कलने दुसऱ्या विकेटसाठी ३४ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. त्याचबरोबर यशस्वी जैस्वालसह ९८ धावांची भागीदारी करून संघाला चांगल्या स्थितीत आणले होते, मात्र ही भागीदारी तुटल्याने संघाने लय गमावली. पडिक्कलने सात चौकार आणि एक षटकार मारला. अखेरच्या षटकांत ध्रुव जुरेलने १६ चेंडूत नाबाद ३४ धावा केल्या. मात्र त्याला दुसऱ्या टोकाकडून चांगली साथ मिळाली नाही.