Abhishek Sharma Creates History for SRH : आयपीएल २०२४ च्या आठव्या सामन्यात सनरायझर्स आणि मुंबई हे संघ एकमेकांशी भिडणार आहेत. दोन्ही संघ अजूनही या मोसमातील पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. या सामन्यात स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेड येताच भुकेल्या सिंहाप्रमाणे मुंबईवर वर्चस्व गाजवताना दिसला. त्याने या मोसमातील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. ट्रॅव्हिस हेडने अवघ्या १८ चेंडूत अर्धशतक झळकावले. ज्यामुळे आंद्रे रसेलही मागे पडला. मात्र काही मिनिटांनंतर युवा फलंदाज अभिषेक शर्माने हेडचा हा विक्रम मोडीत काढला.

आतापर्यंत, आयपीएल २०२४ मध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केकेआरचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलच्या नावावर होता. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या २० चेंडूत अर्धशतक केले. पण रसेल आता मागे पडला आहे. ट्रॅव्हिस हेडने अवघ्या २४ चेंडूत ३ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने ६२ धावांची शानदार खेळी केली. यानंतर अभिषेक शर्माने कहर केला. त्याने अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावले. या शानदार खेळीमुळे हैदराबाद संघाने अवघ्या ७ षटकांत १०० धावांचा आकडा गाठला होता. मुंबईविरुद्ध सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याच्या बाबतीत हेड तिसऱ्या स्थानावर आहे.

Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Kolkata Knight Riders Vs Lucknow Supergiants Mathc Highlights in marathi
KKR vs LSG : कोलकाताचा ऐतिहासिक विजय! लखनऊचा ८ विकेट्सनी उडवला धुव्वा
Who is Angkrish Raghuvanshi
IPL 2024 : कोण आहे अंगक्रिश रघुवंशी? ज्याने सुनील नरेनच्या साथीने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची केली धुलाई
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’

अभिषेक शर्माने रचला इतिहास –

अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावत अभिषेकने इतिहास रचला आहे. तो एसआरएचसाठी सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर होता. पण ट्रॅव्हिस हेडने त्याला मागे सोडले होते आणि नंतर काही वेळाने तोही मागे पडला. हैदराबादकडून खेळताना वॉर्नरने २० चेंडूत दोनवेळा अर्धशतक झळकावले होते.

हेही वाचा – IPL 2024 : सनरायझर्स हैदराबादने रचला इतिहास! आरसीबीचा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडत मुंबईला दिले २७८ धावांचे लक्ष

सनरायझर्स हैदराबादसाठी सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारे फलंदाज –

१६ चेंडू- अभिषेक शर्मा विरुद्ध एमआय, हैदराबाद, २०२४

१८ चेंडू- ट्रॅव्हिस हेड वि एमआय, हैदराबाद, २०२४

२० चेंडू- डेव्हिड वॉर्नर विरुद्ध सीएसके, हैदराबाद, २०१५

२० चेंडू- डेव्हिड वॉर्नर विरुद्ध केकेआर, हैदराबाद, २०१७

२० चेंडू- मोइसेस हेन्रिक्स विरुद्ध आरसीबी, हैदराबाद, २०१५