IPL 2025 SRH vs PBKS Abhishek Sharma Revealed He was sick From 4 Days: अभिषेक शर्माने आयपीएल २०२५ मध्ये शतकी खेळी करत चर्चेचा मोठा विषय ठरला आहे. सर्वच जण त्याचं कौतुक करत आहेत. अभिषेक शर्मा हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावांची खेळी खेळणारा पहिला भारतीय खेळाडूही बनला आहे. ५५ चेंडूत १४ चौकार आणि १० षटकारांसह १४१ धावांची तुफानी खेळी केरत अभिषेक शर्माने मोठा खुलासा केला आणि सांगितले की तो गेल्या चार दिवसांपासून तो आजारी होता.
अभिषेक शर्माने फक्त विक्रमी खेळी केली नाही तर त्याने आपल्या संघाला मोठा विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. अभिषेकने १९ चेंडूत अर्धशतक झळकावले तर ४० चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. आपल्या १४१ धावांच्या खेळीसह अभिषेकने सनरायझर्स हैदराबादला २४६ धावांचे लक्ष्य गाठून देण्यात हेडबरोबर १७५ धावांची सलामी भागीदारी केली. पण खरं सांगायचं तर ४ दिवस अभिषेक शर्माला ताप होता. त्याने स्वत: सामन्यानंतर हा खुलासा केला आहे.
पंजाब किंग्जविरुद्ध शतक झळकावल्यानंतर अभिषेक शर्मा पत्रकार परिषदेत म्हणाला, “खरं सांगायचं तर, मी गेल्या चार दिवसांपासून आजारी होतो आणि मला ताप होता. पण मी भाग्यवान आहे की या काळात मला युवराज सिंग आणि सूर्यकुमार यादव सारखे खेळाडू माझ्याबरोबर होते. ते दोघेही सतत फोन करत होते, मी कसा आहे काय करतो आहे, याची सातत्याने विचारपूस करत होते.”
पुढे अभिषेक म्हणाला, “एका वेळेला मला माझ्या कामगिरीबाबत शंका वाटत होती, पण त्या दोघांना माझ्याबाबत जराही शंका नव्हती. त्यांच्यासारख्या दिग्गजांचा विश्वा खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा असं कोणी तुमच्यावर विश्वास दाखवतं, तेव्हा तुम्हीदेखील स्वत:वर पुन्हा विश्वास ठेवता, यामुळे मला खूप प्रोत्साहन मिळाले आणि मी हे करू शकलो. फक्त एका चांगल्या खेळीची वाट पाहत होतो.”
Second highest successful run-chase in the #TATAIPL ✅
Runs galore, records broken and Hyderabad rises to a run-chase that will be remembered for the ages ?
Take a bow, @SunRisers ??
Scorecard ▶ https://t.co/RTe7RlXDRq#SRHvPBKS pic.twitter.com/g60LVXPFpoThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2025
अभिषेक शर्माची आयपीएल २०२५ मधील सुरूवात फारशी चांगली राहिली नव्हती. त्याने पंजाब किंग्सविरूद्धच्या सामन्यांपूर्वी झालेल्या ५ सामन्यांमध्ये फक्त ५१ धावा केल्या होत्या. अभिषेक फॉर्मशी झगडताना दिसत होता. पण आता त्याने एकच मोठी खेळी खेळत आपला फॉर्म परत मिळवला आहे.