scorecardresearch

IPL 2023: ‘ते कूल कर्णधार आहेत’, हार्दिक पांड्याचे कौतुक करताना युवा खेळाडूने आशिष नेहराबद्दल केलं मोठं वक्तव्य

Shivam Mavi on Hardik and Ashish: भारतीय संघाचा युवा खेळाडू शिवम मावी हा आयपीएल २०२३ मध्ये गुजरात टायटन्स संघाचा भाग आहे. त्याने आपला नवीन कर्णधार हार्दिक पांड्या आणि कोच आशिष नेहराबद्दल महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

ipl 2023 Updates
हार्दिक पांड्या आणि आशिष नेहरा (फोटो-संग्रहि छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

Shivam Mavi praised Hardik Pandya and Ashish Nehra: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यासाठी आयपीएल २०२२ खूप छान ठरले. कर्णधारपद भूषवताना त्यांनी पहिल्यांदाच गुजरात जायंट्स संघाला चॅम्पियन बनवले. पांड्याने नवीन संघासह संपूर्ण हंगामात शानदार कामगिरी केली. त्याचबरोबर अंतिम फेरीत राजस्थान रॉयल्सचा पराभव करून ट्रॉफीवर कब्जा केला. आता युवा वेगवान गोलंदाज शिवम मावीने हार्दिकच्या कर्णधारपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

शिवम मावीने पंड्याचे कौतुक केले –

शिवम मावीने आयपीएल २०२३ च्या आधी सांगितले की, “गुजरात टायटन्सकडून खेळण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. हार्दिक हे खूप कूल कर्णधार आहे. संघात नवीन असलेल्या तरुणांना ते पाठीशी घालतात. संघातील वातावरण अतिशय अनुकूल आहे. त्यामुळे जेव्हा एखादा तरुण अशा वातावरणात पाऊल ठेवतो, तेव्हा त्याच्यासाठी ही चांगली गोष्ट असते. त्यामुळे तो अधिक चांगली कामगिरी करू शकतो.”

कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या पूर्ण पाठिंबा देतात –

शिव मावीने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियासाठी टी-२० मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो काळ आठवून मावीने पांड्याचे कौतुक केले. मावी म्हणाला की, “जेव्हा मी त्यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा भारतासाठी खेळलो, तेव्हा त्यांनी खूप साथ दिली. सपोर्ट हा खूप महत्त्वाचा घटक आहे आणि कर्णधाराने तुम्हाला साथ दिली तर खूप छान वाटते. चांगले वातावरण निर्माण करणे हे कर्णधार आणि व्यवस्थापनाच्या हातात असते. वातावरण चांगले असेल तर संघ चांगली कामगिरी करतो हे तुम्ही पाहू शकता.”

हेही वाचा – IPL 2023: डेव्हिड वॉर्नरने शेअर केलेल्या डान्सच्या VIDEO वर पत्नी कँडीने विचारला मजेशीर प्रश्न; म्हणाली, ‘तू माझ्यासाठी…’

वातावरण हलके ठेवतात –

शिव मावीने गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराचेही कौतुक केले. तो म्हणाला की ते मित्रासारखे वागतात. जे खेळाडूंना स्वातंत्र्य देते. मावी म्हणाला, “आम्हांला आमचा जास्तीत जास्त वेळ मैदानावर घालवू देतात. तसेच तुम्हाला विश्रांती हवी असेल, तर ते परवानगी देतील. तुम्हाला काही हवे असेल तर तुम्ही जाऊन त्यांना विचारू शकता. काही वेळा खेळाडूंना मैदानावर सराव करावासा वाटत नाही. अशा परिस्थितीत ते आमच्यावर भार टाकत नाहीत, वातावरण हलके ठेवतात.”

शिवम मावीला ६ कोटींना विकत घेतले –

आयपीएल २०२३ स्पर्धेला ३१ मार्चपासून सुरू होत आहे. पहिला सामना चेन्नई आणि गुजरात यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी हा सामना होणार आहे. शिवम मावी हा यूपीचा आहे. त्याला गुजरात संघाने आयपीएल लिलावात तब्बल ६ कोटी रुपयांना सामील करून घेतले होते. तो चेंडू आणि बॅटने अप्रतिम कामगिरी करु शकतो

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 21:19 IST

संबंधित बातम्या