मागील अनेक दिवसांपासून श्रीलंका देश आर्थिक संकटाशी झुंज देतोय. येथे इंधन, धान्य यासोबतच रोजच्या वापरातील वस्तू महागल्या आहेत. महागाई गगनला भिडली आहे. याच कारणामुळे श्रीलंकन नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्या विरोधात निदर्शने केली जात आहे. तसेच राजपक्षे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जातेय. दरम्यान, श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू अर्जुना रणतुंगा यांनी आयपीएल क्रिकेटमध्ये सहभागी असणाऱ्या श्रीलंकन खेळाडूंना लक्ष्य केलंय. खेळाडूंनी आयपीएल सोडून श्रीलंकेमधील निदर्शनांत सहभागी व्हावं असं आवाहन रणतुंगा यांनी केलंय.

हेही वाचा >>> सामन्यात हार्दिक पांड्याचा त्रागा, मोहम्मद शमीवर ऑन कॅमेरा चिडला, चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

“श्रीलंकेचे काही क्रिकेटपटू भारतात आयपीएल खेळत आहेत. यातील काही खेळाडूंनी श्रीलंकेमधील परिस्थितीवर अद्याप भाष्य केलेलं नाहीये. येथे नागरिक सरकारच्या विरोधात बोलायला घाबरत आहेत. मात्र हे क्रिकेटपटूसुद्धा त्यांची नोकरी शाबुत ठेवण्यासाठी काही बोलत नाहीयेत. पण काही क्रिकेटर समोर येऊन भूमिका मांडत असल्यामुळे आयपीएलमध्ये खेळणाऱ्या श्रीलंकन क्रिकेटरर्सनीही पुढे येण्याची गरज आहे. त्यांनी एका आठवड्यासाठी आयपीएल सोडून श्रीलंकेत सुरु असलेल्या निदर्शनाला पाठिंबा द्यायला हवा,” असं अर्जुना राजपक्षे म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> संघाचा सामन्यात पराभव पण हार्दिक पांड्या चमकला, दिग्गजांना मागे टाकत नोंदवला ‘हा’ विक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा, महेला जयवर्धने तसेच वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा हे श्रीलंकन खेळाडू आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सहभागी आहेत. तर वनिंदू हसरंगा, भानुका राजपक्षे, दुशमंथा छमीरा, छमिका करुणारत्ने आणि महीश तीकशाना हे खेळाडू वेगवेगळ्या संघाचा भाग असून ते आयपीएलच्या सामन्यांत खेळत आहेत.