Axar Patel, MI vs DC IPL 2025: आयपीएल २०२५ स्पर्धेतील ६३ वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेला हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो थेट प्लेऑफमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी या सामन्यासाठी कसून तयारी केली आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला आहे.

या महत्वाच्या सामन्यातून संघाचा कर्णधार अक्षर पटेल बाहेर पडला आहे. नाणेफेकीच्या वेळी अक्षर पटेलऐवजी फाफ डू प्लेसिस नाणेफेकीला आला. त्यावेळी त्याने अक्षर पटेल हा सामना खेळणार नसल्याची माहिती दिली. अक्षर पटेलला गेल्या दोन दिवसांपासून फ्लू झाल्यामुळे तो हा सामना खेळू शकणार नसल्याची माहिती फाफ डू प्लेसिसने दिली.

काय म्हणाला फाफ डू प्लेसिस?

” आजचा सामना हा आमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. आम्हाला प्लेऑफमध्ये जाण्याची सुवर्णसंधी आहे. आम्ही या संधीचा दोन्ही हातांनी स्वीकार करतो. हा सामना स्पर्धेतील मजबूत संघाविरुद्ध आहे. पण आम्ही या आव्हानासाठी तयार आहोत. गेल्या ५ –६ सामन्यांमध्ये आम्हाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. आम्हाला एक नवीन संधी मिळाली आहे.”

अक्षर पटेलबाबत बोलताना काय म्हणाला?

फाफ डू प्लेसिस पुढे म्हणाला, “ अक्षर गेल्या दोन दिवसांपासून खूप आजारी आहे. त्याला फ्लू झाला आहे. त्याला आम्ही नक्कीच मिस करू. तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे, त्याची जागा भरून काढणं खूप कठीण आहे.”

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

दिल्ली कॅपिटल्स (Playing XI): फाफ डु प्लेसिस (कर्णधार), अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), समीर रिजवी, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विप्रज निगम, माधव तिवारी, कुलदीप यादव, दुष्मंथा चमीरा, मुस्ताफिजुर रहमान, मुकेश कुमार

मुंबई इंडियन्स (Playing XI): रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सॅन्टनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह

इम्पॅक्ट प्लेअर्स –

दिल्ली कॅपिटल्स: के. एल. राहुल, सेदिकुल्लाह अटल, करुण नायर, त्रिपुराना विजय, मनवंत कुमार एल.
मुंबई इंडियन्स: कर्ण शर्मा, कॉर्बिन बॉश, राज बावा, अश्वनी कुमार, सत्यनारायण राजू.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.