Mumbai Indians latest News Update : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज क्रिस जॉर्डनला मुंबई इंडियन्सने त्यांच्या उर्वरीत सामने खेळण्यासाठी त्यांच्या स्क्वॉडमध्ये सामील केलं आहे. जॉर्डनचा कोणत्या खेळाडूच्या जागेवर स्क्वॉडमध्ये समावेश करण्यात आला आहे, याबाबतीत अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीय. मुंबईच्या टीममध्ये यावर्षी जोफ्रा आर्चरची एन्ट्री झालीय. पण दुखापतीमुळं तो मैदानात काही सामने खेळण्यासाठी उतरला होता. जॉर्डनला मुंबई इंडियन्सच्या जर्सीत ट्रेनिंग सेशन दरम्यान पहिलं गेलं. राजस्थान रॉयल्सने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये जॉर्डन सराव करताना दिसत आहे.
अनसोल्ड राहिला होता क्रिस जॉर्डन
डिसेंबर महिन्यात झालेल्या आयपीएल लिलावात क्रिस जॉर्डनला कोणत्याही संघाने खरेदी केलं नव्हतं. त्याची बेस प्राईस दोन कोटी रुपये इतकी होती. आयपीएलमध्ये याआधी जॉर्डन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, सनरायझर्स हैद्राबाद, पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळला आहे. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर ३०.८५ च्या सरासरीनं आणि ९.३२ च्या इकॉनमी रेटनुसार २७ विकेट्सची नोंद आहे. मागील सीजनमध्ये तो चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळला होता. त्या सीजनमध्ये जॉर्डनने चार सामन्यात २ विकेट घेतल्या होत्या.
जसप्रीत बुमराह आणि रिचर्डसन आयपीएलमधून बाहेर असल्यामुळं तसंच जोफ्रा आर्चरच्या दुखापतीनं मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजांच्या समस्या वाढल्या आहेत. यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सने खूप चांगली कामगिरी केली नाहीय. मुंबईने सातपैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे गुणतालिकेत मुंबई इंडियन्स नवव्या स्थानावर आहे. या सामन्यात क्रिस जॉर्डनला मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग ११ मध्ये सामील केलं जाऊ शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.