गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सने एकामागून एक विजय मिळवल्याने त्यांचे मनोबल कमालीचे उंचावले आहे. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादशी दोन हात करताना कोलकाताचा संघ विजयी हॅट्ट्रिकसाठी सज्ज असेल.
गेल्या दिल्लीविरुद्धच्या सामन्यात कोलकाताचा कर्णधार गौतम गंभीरने दमदर खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज उमेश यादवने १८ धावांमध्ये २ बळी मिळवत दिल्लीच्या धावसंख्येला वेसण घालण्याचे काम चोख बजावले होते. उमेशला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्ने मॉर्केलची सुरेख साथ मिळत आहे.
हैदराबादला गेल्या सामन्यात दिल्लीकडून पराभव पत्करावा लागला होता. सलामीवीर शिखर धवनला अजूनही सूर गवसलेला नाही. कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या कामगिरीमध्ये सातत्याचा अभाव जाणवत आहे. वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि भुवनेश्वर कुमार यांनाही अजून छाप पाडता आलेली नाही.

प्रतिस्पर्धी संघ
कोलकाता नाइट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), अझर मेहमूद, जोहान बोथा, केसी करियप्पा, पीयूश चावला, पॅट कमिन्स, आदित्य गऱ्हवाल, ब्रॅड हॉग, शेल्डॉन जॅक्सन, कुलदीप यादव, मॉर्ने मॉर्केल, सुनील नरिन, सुमित नरवाल, मनीष पांडे, युसुफ पठाण, वीर प्रताप सिंग, वैभव रावळ, आंद्रे रसेल, शकीब अल हसन, रायन टेन डुस्काटा, रॉबिन उथप्पा, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, ख्रिस लिन, जेम्स नीशाम.

सनरायझर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), शिखर धवन, आशीष रेड्डी, रिकी भुई, रवी बोपारा, इऑन मॉर्गन, ट्रेंट बोल्ट, मॉइझेस हेन्रिके, सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार, प्रवीण कुमार, चामा मिलिंद, नमन ओझा, परवेझ रसूल, केव्हिन पीटरसन, पद्मनाभन प्रशांत, लोकेश राहुल, इशांत शर्मा, करण शर्मा, लक्ष्मीरतन शुक्ला, डेल स्टेन, हनुमा विहारी, केन विल्यमसन.
वेळ : दुपारी ४ पासून
थेट प्रक्षेपण : सोनी मॅक्स आणि सोनी सिक्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.