CSK CEO Kasi Viswanathan Statement On MS Dhoni IPL Retirement : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आणि कोट्यावधी क्रिकेटप्रेमींचा हिरो महेंद्रसिंग धोनी यंदाच्या आयपीएल हंगामातही चांगल नेतृत्व करताना दिसत आहे. धोनीच्या कॅप्टन्सीत चेन्नईचे खेळाडू उत्साहात खेळत आहेत. सीएसकेसाठी मागील आयपीएल हंगाम खराब गेला होता. रविवारी झालेल्या सामन्याक चेन्नईचा कोलकाताविरोधात जरी पराभव झाला असला, तरीही प्ले ऑफमध्ये चेन्नई सुपर किंग्जची जागा पक्की आहे. अशातच धोनीच्या आयपीएलच्या निवृत्तीबाबत संपूर्ण क्रीडाविश्वात चर्चा रंगली आहे. धोनीचा यंदाचा आयपीएल हंगाम शेवटचा आहे का? असा प्रश्न कोट्यावधी चाहत्यांना पडला आहे. याच पार्श्वभूमीवर सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कासी विश्वनाथन यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

रिपोर्ट्सनुसार, चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी धोनीच्या निवृत्तीबाबत प्रतिक्रिया देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, एम एस धोनी आयपीएलचा पुढील हंगामही खेळणार आहे, असं आम्हाला वाटतंय. धोनीचे चाहते नेहमीप्रमाणे आम्हाला समर्थन करतील, अशी मला आशा आहे.” दरम्यान रविवारी केकेआरविरोधात झालेल्या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला. त्यानंतर धोनीनं माध्यमांशी बोलताना या पराभवाची कारणं सांगितली.

नक्की वाचा – चेन्नईचा KKR विरोधात पराभव का झाला? कर्णधार एम एस धोनीनं सांगितलं यामागचं मोठं कारण, म्हणाला, “सर्व खेळाडूंनी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एम एस धोनीनं माध्यमांना प्रतिक्रिया देत म्हटलं, “नाणेफेक जिंकल्यानंतर तुम्ही अनेकदा फलंदाजीचा निर्णय घेता. परंतु, या खेळपट्टीवर दुसऱ्या इनिंगमध्ये पहिला चेंडू फेकल्यावर मला समजलं की, ही खेळपट्टी १८० धावांची आहे. प्रथम फलंदाजी करून ही धावसंख्या करू शकलो नसतो. मैदानात दव पडल्याने खूप जास्त फरक पडला, असं मला वाटतं. जर तुम्ही दुसऱ्या इनिंगची तुलना पहिल्या इनिंगशी केली, तर त्यांच्या फिरकीपटूंना जास्त मदत मिळाली होती आणि याच कारणामुळं आम्ही या सामन्यात मागे पडलो. आम्हा या पराभवासाठी कुणाला जबाबदार ठरवू शकत नाही. सर्वांनी खूप प्रयत्न केले. दुसऱ्या इनिंगमध्ये दव पडला नसता आणि जर आम्ही १५० चेज करत असतो, तर खूप अडचणींचा सामना करावा लागला असता.”