Chennai Super Kings vs Mumbai Indians Highlights Match Updates, 06 May 2023 :चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगला. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मुंबई चेन्नईच्या गोलंदाजांनी भेदक मारा केल्यामुळं मुंबईला २० षटकात ८ विकेट्स गमावत १३९ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. डेव्हिड कॉनवे आणि ऋतुराज गायकवाडने धडाकेबाज फलंदाजी केली. शिवम दुबेने चौफेर फटकेबाजी करून चेन्नईला विजयाच्या दिशेनं नेलं. त्यामुळे चेन्नईने १७.४ षटकात ४ विकेट्स गमावत १४० धावा करून सामना खिशात घातला आणि मुंबईचा पराभव झाला.
चेन्नईसाठी ऋतुराज गायकवाडने १६ चेंडूत ३० धावा दिल्या. डेवॉन कॉनव्हेनंही धडाकेबाज फलंदाजी करून ४२ धावांची खेळी साकारली. अजिंक्य रहाणेनं २१ धावा करून चेन्नईच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. तर शिवम दुबे २६ धावांवर नाबाद राहिला. धोनीनं एक धाव घेऊन चेन्नईला विजय मिळवून दिला.प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सची चेन्नईच्या गोलंदाजांनी दाणादाण उडवली. पॉवर प्ले मध्ये तीन फलंदाज बाद करून चेन्नईने मुंबईला मोठा धक्का दिला. सलामीसाठी कॅमरून ग्रीन आणि ईशान किशन मैदानात उरतले होते. परंतु, दोघंही स्वस्तात माघारी परतले. चेन्नई सुपर किंग्जे वेगवान गोलंदाज दिपक चहर आणि तुषार देशपांडेनं पॉवर प्ले मध्ये मुंबईच्या तीन फलंदाजांना बाद केलं. दिपकने कर्णधार रोहित शर्माला शून्यावर झेलबाद केलं. तसंच सलामीवीर फलंदाज कॅमरून ग्रीनला ६ धावांवर क्लीन बोल्ड केलं.
तिसऱ्या षटकात दिपक चहरच्या गोलंदाजीवर ईशान किशन ७ धावांवर बाद झाला.दिपक चहरच्या भेदक माऱ्यापुढं कर्णधार रोहित शर्मा शून्य धावा करून बाद झाला. परंतु, नेहल वढेराने सावध खेळी करत चेन्नईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला आणि दमदार अर्धशतक ठोकलं. वधेराने ५१ चेंडूत ६४ धावा केल्या. पाथिराना आणि तुशार देशपांडेच्या भेदक माऱ्यापुढं मुंबई इंडियन्सने २० षटकात ८ विकेट्स गमावत १३९ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे चेन्नईला विजयासाठी १४० धावांंचं आव्हान देण्यात आलं होतं.
Chennai Super Kings vs Mumbai Indians Highlights Updates
पाहा मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्याचे Highlights अपडेट्स
चेन्नई सुपर किंग्जने १२ षटकानंतर शंभरी पार केली आहे. स्टब्जने अंबाती रायडूला १२ धावांवर बाद करून मोठा धक्का दिला. सीएसके विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. १३ षटकानंतर सीएसकेची धावसंख्या १०६-३ झाली आहे. कॉनवे अप्रतिम फलंदाजी करत असून त्याला साथ देण्यासाठी शिवम दुबे मैदानात उतरला आहे. १५ षटकानंतर चेन्नईची धावसंख्या १२३-३ अशी झाली आहे. १६ षटकानंतर चेन्नईची धावसंख्या १२८-३ अशी झाली आहे. १७ षटकानंतर १३२-४ अशी चेन्नईची धावसंख्या झाली होती. त्यानंतर कॉनवे बाद झाल्यानंतर शिवम आणि धोनीनं चेन्नईला विजय मिळवून दिला.
मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू पीयुष चावलाने अप्रितम गोलंदाजी करून चेन्नईचे धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि अजिंक्य रहाणेला बाद केलं. त्यामुळे चेन्नईला मोठा धक्का बसला आहे. नऊ षटकानंतर चेन्नईची धावसंख्या ८१-२ अशी झाली आहे. अकरा षटकानंतर चेन्नईची धावसंख्या ८८-२ अशी झाली आहे. १२ षटकानंतर चेन्नईची धावसंख्या ९६-२ अशी झाली आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडे चौफेर फटकेबाजी करून चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली. परंतु, पीयुष चावलाच्या गोलंदाजीवर ऋतुराज ३० धावांवर असताना बाद झाला. त्यामुळे पाचव्या षटकात चेन्नईला पहिला धक्का बसला. पाच षटकानंतर चेन्नईची धावसंख्या ५०-१ झाली आहे. सहा षटकानंतर चेन्नईची धावसंख्या ५५-१ अशी झाली आहे. आठ षटकानंतर चेन्नईची धावसंख्या ८०-१ अशी झाली आहे.
मुंबई इंडियन्सने २० षटकात ८ विकेट्स गमावत १३९ धावा केल्या आहेत. त्यामुळे चेन्नईला विजयासाठी १४० धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहेत. चेन्नईचे सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे मैदानात उतरले आहेत. पहिल्या षटकानंतर चेन्नईची धावसंख्या १०-० अशी झाली. २ षटकानंतर चेन्नईची धावसंख्या १६-० झाली आहे. ऋतुराज गायकवाडने अर्शद खानच्या तिसऱ्या षटकात चौकार षटकारांचा पाऊस पाडला. त्यामुळे तीन षटकात चेन्नईची धावसंख्या ३६-० अशी झालीय. चार षटकानंतर चेन्नईची धावसंख्या ४६-० वर पोहोचली आहे.
चेन्नई सुपर किंग्जे वेगवान गोलंदाज दिपक चहर आणि तुषार देशपांडेनं पॉवर प्ले मध्ये मुंबईच्या तीन फलंदाजांना बाद केलं. दिपकने कर्णधार रोहित शर्माला शून्यावर झेलबाद केलं. तसंच सलामीवीर फलंदाज कॅमरून ग्रीनला ६ धावांवर क्लीन बोल्ड केलं, तिसऱ्या षटकात दिपक चहरच्या गोलंदाजीवर ईशान किशन ७ धावांवर बाद झाला. त्यानंतर ११ व्या षटकात रविंद्र जडेजाने सूर्यकुमार यादवला २६ धावांवर बाद करून मुंबईच्या आशांवर पाणी फेरलं. मुंबईची धावसंख्या १२ षटकानंतर ७४-४ अशी झालीय. १४ षटकानंतर मुंबईची संख्या ८६-४ अशी झालीय. १५ षटकानंतर मुंबई ९३-४ वर पोहोचली आहे. १७ षटकानंतर मुंबईची धावसंख्या १२२-४ अशी झाली होती. त्यानंतर पाथीरानाच्या गोलंदाजीवर नेहल वढेरा ६४ धावांवर बाद झाला. १९ षटकानंतर मुंबईची धावसंख्या १३४-७ अशी झाली आहे.
चेन्नई सुपर किंग्जे वेगवान गोलंदाज दिपक चहर आणि तुषार देशपांडेनं पॉवर प्ले मध्ये मुंबईच्या तीन फलंदाजांना बाद केलं. दिपकने कर्णधार रोहित शर्माला शून्यावर झेलबाद केलं. तसंच सलामीवीर फलंदाज कॅमरून ग्रीनला ६ धावांवर क्लीन बोल्ड केलं, तिसऱ्या षटकात दिपक चहरच्या गोलंदाजीवर ईशान किशन ७ धावांवर बाद झाला. सात षटकानंतर मुंबईची धावसंख्या ४४-३ अशी झालीय. ८ षटकानंतर मुंबईची धावसंख्या ५५-३ वर पोहोचली आहे. ९ षटकानंतर मुंबईची धावसंख्या ५९-३ अशी झाली आहे. नेहम वढेरा सावध खेळी करत असून पन्नाशीच्या जवळ पोहोचला आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेनं मुंबई इंडियन्सला पहिला धक्का दिला. तुषारने सलामीवीर फलंदाज कॅमरून ग्रीनला ६ धावांवर क्लीन बोल्ड केलं, दोन षटकानंतर मुंबईची धावसंख्या १३-१ अशी झाली होती. त्यानंतर तिसऱ्या षटकात दिपक चहरच्या गोलंदाजीवर ईशान किशन ७ धावांवर बाद झाला. रोहित शर्मा आणि नेहम वडेरा मैदानात असताना मुंबईची धावसंख्या १४-२ वर पोहोचली होती. परंतु, दिपक चहरच्या भेदक माऱ्यापुढं कर्णधार रोहित शर्मा शून्य धावा करून बाद झाला. रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यात डक आऊट झाला आहे. तिसऱ्या षटकानंतर मुंबई इंडियन्स १६-३ वर पोहोचली आहे, चार षटकानंतर मुंबईची धावसंख्या १९-३ अशी झाली आहे. पाच षटकानंतर मुंबईची धावसंख्या २४-३ अशी झाली आहे,
सीएसकेनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुंबई इंडियन्ससाठी सलामीला कॅमरून ग्रीन आणि ईशान किशन मैदानात उतरले आहेत. रोहित शर्मा मिडल ऑर्डरमध्ये खेळणार आहे. एका षटकानंतर मुंबईची धावसंख्या १०-० अशी झाली आहे.
चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये सीएसके आणि मुंबई इंडियन्स यांच्यात महामुकाबला होत आहे, चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग ११ मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. तिलक वर्माला दुखापत झाल्याने त्याच्या जागेवर त्रिस्टॅन स्टब्सला खेळवण्यात येणार असल्याचं कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेकीदरम्यान जाहीर केलं.
आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ४९ वा सामना चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि चेन्नईचं नेतृत्व करणारा एम एस धोनी आमनेसामने येणार आहेत. आतापर्यंत झालेल्या १५ आयपीएल हंगामात मुंबईने पाचवेळा तर चेन्नईने चारवेळा विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे.
त्यामुळे मुंबई आणि चेन्नई यांच्यात नेहमीच हाय व्होट्लेज सामना होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. दोन्ही संघामध्ये झालेल्या आतापर्यंतच्या सामन्यात मुंबईने बाजी मारली आहे. या दोन्ही संघांमध्ये एकूण ३७ सामने झाले आहेत. यामध्ये मुंबईने २१ सामन्यांत विजय संपादन केलं असून चेन्नईला १६ सामन्यांत विजय मिळवता आला आहे. त्यामुळे चेन्नई आणि मुंबईत होणारी कांटे की टक्कर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
चेन्नई सुपर किंग्स वि मुंबई इंडियन्स लाइव्ह क्रिकेट स्कोअर