David Warner became the highest run scorer against PBKS team:आयपीएलमध्ये भारतीय खेळाडूंसोबतच अनेक परदेशी खेळाडूंनीही मोठे विक्रम केले आहेत. आयपीएलच्या इतिहासातील या महान परदेशी खेळाडूंपैकी एकाचे नाव आहे डेव्हिड वॉर्नर. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएल खेळत असून त्याने धावा करण्याच्या बाबतीत अनेक विक्रम केले आहेत. त्यापैकी एक विक्रम आयपीएलच्या ६४ व्या सामन्यात रचला. डेव्हिड वॉर्नर पंजाब किंग्जविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.

डेव्हिड वॉर्नरने पंजाब किंग्जविरुद्ध नवा विक्रम रचला –

हा आयपीएल सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात धरमशाला येथे खेळला गेला. या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ या दिल्लीच्या दोन सलामीवीरांनी शानदार सुरुवात केली. काही वेळातच डेव्हिड वॉर्नर पंजाब किंग्जविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.

या यादीत डेव्हिड वॉर्नरचे नाव आघाडीवर आहे. डेव्हिड वॉर्नरने पंजाब किंग्जविरुद्ध सर्वाधिक ११०५ धावा केल्या आहेत. या यादीत दुसरे नाव ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरचे आहे. डेव्हिड वॉर्नरने पंजाबनंतर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. वॉर्नरने केकेआरविरुद्ध आतापर्यंत १०७५ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – PBKS vs DC: दिल्लीविरुद्ध शिखर धवनने नोंदवला लाजिरवाणा विक्रम, गौतम गंभीर-पार्थिव पटेलच्या ‘या’ क्लबमध्ये झाला सामील

या यादीत तिसरे नाव शिखर धवनचे आहे. शिखर धवनने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध १०५७ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये कोणत्याही संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत धवन तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धही १०४० धावा केल्या आहेत. या यादीत आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीचे नाव पाचव्या क्रमांकावर आहे. विराट कोहली हा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे, पण त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने दिल्लीविरुद्ध १०३० धावा केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिल्लीने पंजाबचा १५ धावांनी पराभव केला –

दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा १५ धावांनी पराभव केला आहे. या पराभवामुळे पंजाबचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने २१३ धावांची मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ केवळ १९८ धावा करू शकला आणि सामना गमावला. दिल्लीकडून रिले रुसोने सर्वाधिक नाबाद ८२ धावा केल्या. त्याच्याशिवाय पृथ्वी शॉनेही ५४ धावांची खेळी खेळली. डेव्हिड वॉर्नरने ४६ आणि फिलिप सॉल्टने २६धावा केल्या. पंजाबकडून सॅम करणने दोन बळी घेतले.