Delhi Capitals grand welcome with traditional dance: आयपीएल २०२३ मधील ६४ वा सामना आज धर्मशाळा येथील स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने असणार आहेत. पीबीकेएसचे दुसरे होम ग्राउंड असलेल्या धर्मशाला येथील मैदानावर आज दोन्ही संघ एकमेकांना आव्हान देतील. दिल्लीचा संघ आदल्या दिवशी सामन्याच्या ठिकाणी पोहोचले आहेत, जिथे त्यांचे पारंपारिक पद्धतीने जंगी स्वागत करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ फ्रँचायझीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.

खरं तर, मंगळवारी, १६ मे रोजी दिल्ली कॅपिटल्सने धर्मशालासाठी उड्डाण केले. यादरम्यान टीमचा दिल्ली ते हिमाचल प्रदेशच्या मैदानात पोहोचेपर्यंतचा संपूर्ण प्रवास दाखवण्यात आला. आगामी सामन्यासाठी त्यांच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर, डीसी यांचे पारंपारिक नृत्यासह भव्य स्वागत करण्यात आले, ज्याचा व्हिडिओ फ्रँचायझीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना डीसीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “लहान ल्हासामध्ये उतरलो.”

१० वर्षांनंतर धर्मशाला येथे सामना होणार –

या मैदानावर २०१३ मध्ये आयपीएलचा शेवटचा सामना खेळला गेला होता. या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने आले होते. पहिल्या डावात पंजाबने १८३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सचा डाव १३३ धावांवर आटोपला होता.

हेही वाचा – GT vs SRH: ‘लव्ह स्टोरीचे रुपांतर झाले लग्नात’; शुबमन गिलच्या शतकावरील सेहवागच्या वक्तव्याने चाहत्यांमध्ये पिकला हशा

विशेष म्हणजे दिल्ली कॅपिटल्सचा संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. अशा स्थितीत सामना हरल्याने त्याचे कोणतेही नुकसान होणार नाही. दुसरीकडे, पंजाब किंग्जचा संघ अजूनही शर्यतीत आहे, पण त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचणे खूप कठीण आहे. मात्र, दोन्ही संघांच्या चाहत्यांना एक रोमांचक सामना पाहायला मिळेल, अशी आशा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील दिल्लीने या स्पर्धेत १२ सामने खेळले असून त्यात त्यांना फक्त चार विजय मिळवता आले आहेत. दिल्ली सुरुवातीपासूनच गुणतालिकेत तळाशी आहे. सुरुवातीपासूनच संघाची कामगिरी अत्यंत खराब होती, त्यामुळेच संघाला पुन्हा एकदा आयपीएलचे जेतेपद पटकावण्यात अपयश आले. पंजाबनंतर, दिल्ली २० मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध लीग टप्प्यातील शेवटचा सामना खेळेल.