BCCI Action Against Digvesh Rathi Fine & 1-match suspension : आयपीएल २०२५ मध्ये सोमवारी (१९ मे) खेळवण्यात आलेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स या सामन्यात दोन भारतीय खेळाडू वाद घालताना दिसले. या रोमांचक सामन्यात हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मा व लखनौचा फिरकीपटू दिग्वेश राठीमध्ये बाचाबाची झाली. दोघांनी एकमेकांकडे पाहून हातवारे देखील केले. परिणामी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिग्वेश राठी व अभिषेक शर्मा या दोघांवरही कारवाई केली आहे.

आयपीएलचे नियम (कोड ऑफ कंडक्ट) मोडल्यामुळे बीसीसीआयने दिग्वेश राठीवर एका सामन्याची बंदी घातली आहे. तसेच त्याला सामना शुल्कापैकी ५० टक्के रक्कमेचा दंड ठोठावला आहे. तर, अभिषेकला सामना शुल्कापैकी २५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. त्याच्या नावावर एका डिमेरिट प्वाइंटची नोंद करण्यात आली आहे. दिग्वेश राठीवर सामन्यादरम्यान खेळभावना न जपल्यामुळे तिसऱ्यांदा कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर आयपीएलच्या कलम २.५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. राठीवर पाच डिमेरिट प्वाइंट्सची नोंद असल्यामुळे त्याच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

पहिली कारवाई – १ एप्रिल २०२५ – लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना

कारवाईचं कारण : पंजाब किंग्सच्या प्रियांश आर्याला बाद केल्यावर नोटबूक सेलिब्रेशन व विरोधी खेळाडूशी शारिरिक संपर्क. आयपीएलच्या कोड ऑफ कंडक्टमधील कलम २.५ अंतर्गत लेव्हल १ चं उल्लंघन
दंड : सामना शुल्कापैकी २५ टक्के दंड व एक डिमेरिट प्वाइंट

दुसरी कारवाई – ४ एप्रिल २०२५ – लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना

कारवाईचं कारण : मुंबई इंडियन्सच्या नमन धीरला बाद केल्यावर पुन्हा ‘नोटबूक’ सेलिब्रेशन.
दंड : सामना शुल्कापैकी ५० टक्के दंड व २ डिमेरिट प्वाइंट

तिसरी कारवाई – १९ मे २०२५ – लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना

कारवाईचं कारण : सनरायझर्स हैदराबादच्या अभिषेक शर्माशी वाद. आयपीएलच्या कोड ऑफ कंडक्टमधील कलम २.५ अंतर्गत लेव्हल १ चं उल्लंघन
दंड : सामना शुल्कापैकी ५० टक्के दंड, २ डिमेरिट प्वाइंट आणि एका सामन्याची बंदी
एकूण डिमेरिट प्वाइंट्स – पाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिग्वेशवरील एकूण कारवाई

२५ टक्के दंड म्हणजेच १.८७ लाख रुपये, दोन वेळा ५० टक्के दंड म्हणजे ७.५० लाख रुपये. एका सामन्याची बंदी म्हणजेच ७.५० लाख रुपयांचं नुकसान, याचाच अर्थ त्याचं १६.८७ लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. आयपीएलच्या महालिलावात लखनौ सुपरजायंट्सने दिग्वेशला ३० लाख रुपयांमध्ये करारबद्ध केलं होतं आणि आता त्याचं १६.८७ लाख रुपयांचं नुकसान झाल्यामुळे त्याला ट्रोल केलं जात आहे.