Ricky Ponting Argued With Umpire : गुरुवारी झालेल्या आयपीएल सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सचा १२ धावांनी पराभव केला. आयपीएल २०२४ च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. याआधी ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाचा पंजाब किंग्जने ४ विकेट्सने पराभव केला होता. दुसऱ्या सामन्यादरम्यान एक गोंधळ पाहायला मिळाला. यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रशिक्षक रिकी पाँटिंग पंचाशी वाद घालताना दिसला. त्यामुळे काही वेळासाठी सामना थांबवण्यात आला होता.

लाइव्ह मॅचमध्ये पाँटिंग अंपायरशी भिडले –

राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आयपीएल सामन्यादरम्यान झालेल्या वादाने सर्वांना आश्चर्यचकित केले. थेट सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाचा को रिकी पाँटिंग पंचांशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादामुळे सामना काही काळ थांबवावा लागला. दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील पहिल्या षटकात राजस्थान रॉयल्सचा खेळाडू रोव्हमन पॉवेल मैदानात पोहोचला तेव्हा ही घटना घडली. तथापि, राजस्थान रॉयल्सने आधीच शिमरॉन हेटमायरच्या जागी नांद्रे बर्गरची प्रभावशाली खेळाडू म्हणून निवड केली होती.

वादाचे खरे कारण आले समोर –

अशा परिस्थितीत जेव्हा रोव्हमन पॉवेल मैदानावर दिसला, तेव्हा दिल्ली कॅपिटल्स संघाचा कोच रिकी पाँटिंगने डगआउटमधून आक्षेप घेतला. वास्तविक, रिकी पाँटिंग प्रभावशाली खेळाडूच्या नियमाशी संबंधित एक मोठा गोंधळ झाला होता. राजस्थान रॉयल्सने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये केवळ तीन विदेशी खेळाडूंचा समावेश केल्यामुळे हे घडले. रोव्हमन पॉवेलबद्दल बोलायचे तर तो रियान परागच्या जागी पर्यायी खेळाडू म्हणून आला होता.

हेही वाचा – IPL 2024 : एक दिवस कौतुक करायचं, दुसऱ्या दिवशी हुर्यो उडवायची अशी वागणूक देशाच्या हिरोंना देऊ नका – सोनू सूद

रोव्हमन पॉवेलच्या येण्याने निर्माण झाला गोंधळ –

रिकी पाँटिंगला असे वाटले की रोव्हमन पॉवेल पाचवा विदेशी खेळाडू म्हणून आला आहे. त्यामुळे त्याने पंचांशी वाद घालण्यास सुरुवात केली. मात्र, पंच नितीन मेनन यांनी रिकी पाँटिंगला समजावून हे प्रकरण शांत केले. पंचांनी स्पष्ट केले की राजस्थान रॉयल्स संघात रोव्हमन पॉवेलसह केवळ चार परदेशी खेळाडू आहेत, कारण यजमान संघाने जोस बटलर, शिमरॉन हेटमायर आणि ट्रेंट बोल्ट यांच्या रूपात केवळ तीन परदेशी खेळाडूंना मैदानात उतरवले होते. त्याच वेळी, क्षेत्ररक्षणादरम्यान शिमरॉन हेटमायरच्या जागी नांद्रे बर्गरचा प्रभावशाली खेळाडू म्हणून वापर करण्यात आला. अशा परिस्थितीत रोव्हमन पॉवेल चौथा परदेशी खेळाडू म्हणून मैदानात उतरला होता. मात्र, रोव्हमन पॉवेलला काही काळ पर्यायी क्षेत्ररक्षक म्हणून ठेवण्यात आले.

हेही वाचा – IPL 2024, RR vs DC : ऋषभ पंतने आऊट झाल्यानंतर रागाच्या भरात असं काही केलं, ज्याचा VIDEO होतोय व्हायरल

काय आहे नियम?

नियम १.२.५ सांगतो की प्रत्येक संघ कोणत्याही सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये ४ पेक्षा जास्त विदेशी खेळाडूंचा समावेश करता येत नाही. त्याचबरोबर नियम १.२.६ सांगतो की एका संघाला सामन्यादरम्यान कोणत्याही वेळी मैदानावर ४ पेक्षा जास्त विदेशी खेळाडू ठेवता येत नाहीत. परंतु, प्लेइंग इलेव्हनमध्ये ४ विदेश खेळाडू असताना अजून एक विदेशी खेळाडू मैदानात येऊ शकतो, पण तो विदेशी खेळाडू पर्यायी क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात येऊ शकतो.