Sunil Gavaskar Statement On MS Dhoni Autograph : चेपॉक स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रविवारी रंगतदार सामना झाला. पण सामना संपल्यानंतर मैदानात अविस्मरणीय घटना घडली. टीम इंडियाचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी त्यांच्या शर्टवर भारताचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा ऑटोग्राफ (सही) घेतला. ज्येष्ठ क्रिकेटपटू गावसकर यांनी मनाचा मोठेपणा दाखवत धोनीला दिलेला सन्मान पाहून तमाम चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. धोनी मैदानात फिरत असताना गावसकर त्याच्याजवळ आले आणि ऑटोग्राफ घेतला. या ऐतिहासिक क्षणाची संपूर्ण क्रीडाविश्वात चर्चा रंगली असतानाच आता खुद्द सुनील गावसकर यांनी ऑटोग्राफ घेण्यामागचं कारण सांगितलं आहे.

स्टार स्पोर्ट्सवर बोलताना गावसकर म्हणाले, धोनीवर कोण प्रेम करत नाही. धोनी भारतीय क्रिकेटचा आदर्श आहे. मागील काही वर्षात भारतीय क्रिकेटसाठी धोनीनं जे केलं आहे, ते अभूतपूर्व आहे. भारतात अनेक युवा खेळाडू आहेत, जे धोनीकडून प्रेरणा घेतात. ज्या प्रकारे त्याने स्वत:ला सांभाळलं आहे, ते खूप जबरदस्त आहे. सीएसकेचे खेळाडू मैदानावर फिरत आहेत, हे जेव्हा मला कळलं, त्यावेळी मी लगेच एक पेन उधार मागला आणि तो माझ्याजवळ ठेवला. धोनीचा ऑटोग्राफ घेण्याता क्षण माझ्यासाठी खूप भावनिक होता.”

नक्की वाचा – मुंबई-लखनऊ सामन्याआधी गौतम-रोहितच्या भेटीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलंय? पाहा Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुनील गावसकर नेहमीच धोनीचं कौतुक करत असतात. याआधीही गावसकर यांनी धोनीबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, “जर मला आयपीएलमध्ये एखाद्या संघात सामील होण्याची संधी मिळाली, तर मी सीएसकेच्या संघात सामील होईल. ड्रेसिंग रुममध्ये धोनी शांत असतो की रागात असतो, ते मला पाहायचं आहे.” मागील सामन्यात सीएसकेचा पराभव झाला होता. आता चेन्नई सुपर किंग्जचा शेवटचा सामना २० मे ला दिल्ली कॅपिटल्सविरोधात होणार आहे. हा सामनात दिल्लीत खेळवला जाणार आहे.