scorecardresearch

बंगळुरु-चेन्नई सामन्यात प्रेमाचा बहर, तरुणीने गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, तरुणाने काय केलं? पाहा व्हिडीओ

सामना रंगात आलेला असताना एका मुलीने आरसीबीच्या चाहत्याला हजारो लोकांच्या समोरच प्रपोज केलं आहे.

RCB VS CSK COUPLE PURPOSE
तरुणीने आरसीबीच्या चाहत्याला अशा प्रकारे प्रपोज केले (फोटो ट्विटरवरुन साभार)

चेन्नई आणि बंगळुरु यांच्यातील सामना चांगलाच चुरशीचा झाला. या सामन्यात बंगळुरुने चेन्नईवर १३ धावांनी मात केली. फिनिशर म्हणून ओळख असलेल्या महेंद्रसिंह धोनीचीही जादू या सामन्यात चालू शकली नाही. दरम्यान विजय आणि पराभव याव्यतिरिक्त आजचा सामना एका खास कारणामुळे चर्चेचा विषय ठरला. एकीकडे सामना रंगात आलेला असताना एका मुलीने आरसीबीच्या चाहत्याला हजारो लोकांच्या समोरच प्रपोज केलं आहे. विशेष म्हणजे या मुलानेही तरुणीच्या प्रेमाचा स्वीकार केलाय.

हेही वाचा >> विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी २०० क्लबमध्ये, आयपीएलमध्ये ‘असा’ विक्रम करणारे फक्त दोघे!

तरुणीने गुडघ्यावर बसून केलं प्रपोज

बंगळुरुने चेन्नईला विजयासाठी १७४ धावांचे लक्ष्य दिले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईचे ७९ धावांवर तीन गडी बाद झाले होते. एकीकडे या दोन संघांत चुरशीची लढत होत असताना एका तरुणीने तिच्यासोबत आलेल्या तरुणाला थेट गुडघ्यावर बसून प्रपोज केलं. हा सर्व प्रकार कॅमेरामॅनने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. हजारो लोकांसमोर या तरुणीने प्रेम असलेल्या मुलाला प्रपोज केल्यामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. विशेष म्हणजे हा तरुण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा चाहता आहे. त्यानेदेखील या तरुणीच्या प्रेमाचा स्वीकार करत तिला मिठीत घेतले.

हेही वाचा >> IPL 2022, RCB vs CSK : मोईन अलीने घातला खोडा, क्लीन बोल्ड झाल्यामुळे विराट कोहलीचं स्वप्न राहिलं अधुरं

एकीकडे बंगळुरु संघाचा विजय झाला. तर दुसरीकडे बंगळुरुच्या चाहत्यालाही आपली प्रेमिका मिळाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला. सोशल मीडियावर तर चेन्नईचा पराभव आणि बंगळुरुचा विजय यापेक्षा गुडघ्यावर बसून प्रपोज करणारी तरुणी आणि बंगळुरुचा चाहता असलेला तिचा प्रियकर यांचीच चर्चा होत आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Girl proposes to her boyfriend during rcb vs csk match prd

ताज्या बातम्या