IPL 2025 GT beat DC by 10 Wickets: साई सुदर्शन आणि शुबमन गिलच्या द्विशतकी भागीदारीच्या जोरावर गुजरात टायटन्सने दिल्लीचा एकतर्फी पराभव केला. गुजरातने एकही विकेट न गमावता हा दणदणीत विजय मिळवला. गुजरातने या एकतर्फी सामन्यात दिल्लीचा १० विकेट्स राखून पराभव केला आहे. या विजयासह गुजरातचा संघ आयपीएल २०२५च्या प्लेऑफसाठी पात्र ठरला. या विजयासह गुजरातने आपल्यासह इतर दोन संघांनाही प्लेऑफमध्ये नेलं आहे.

६० व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुलच्या शतकाच्या जोरावर गुजरात टायटन्स संघाला २०० धावांचे आव्हान दिले होते. पण शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी शेवटपर्यंत नाबाद राहत संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. साई सुदर्शन आणि शुबमन गिलने २०५ धावांची भागीदारी केली. यामध्ये साई सुदर्शने दणदणीत शतक झळकावलं, साईचं हे आयपीएलमधील दुसरं शतक आहे.

साई सुदर्शनने ६२ चेंडूत १२ चौकार आणि ४ षटकारांसह १७७ च्या स्ट्राईक रेटने १०८ धावा करत नाबाद परतला. तर कर्णधार शुबमन गिलने ५३ चेंडूत ३ चौकार आणि ७ षटकारांसह ९३ धावा करत नाबाद परतला. या दोघांनीच गुजरातला विजयापर्यंत नेलं.

गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यासह दिल्लीचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. फाफ डू प्लेसिस आणि अभिषेक पोरेल लवकर बाद झाले. यानंतर केएल राहुलने एकट्याने संघाचा डाव सावरला. केएल राहुलने ६५ चेंडूत १४ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ११२ धावा केल्या. तर अभिषेक पोरेल १९ चेंडूत ३० धावा करत बाद झाला. केएल राहुलने ६५ चेंडूत १४ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ११२ धावा केल्या. तर अभिषेक पोरेल १९ चेंडूत ३० धावा करत बाद झाला.

केएल राहुलने ६५ चेंडूत १४ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ११२ धावा केल्या. तर अभिषेक पोरेल १९ चेंडूत ३० धावा करत बाद झाला. तर अक्षर पटेल आणि स्टब्सने प्रत्येकी २१, २५ धावांची खेळी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुजरात टायटन्स संघ या विजयासाठी पहिल्या स्थानी पोहोचला आहे. तर दुसऱ्या स्थानी आरसीबीचा संघ, तिसऱ्या स्थानी पंजाब किंग्सचा संघ आहे. यासह हे तिन्ही संघ प्लेऑफसाठी क्वालिफाय ठरले आहेत. यासह चौथ्या स्थानासाठी मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स संघासाठी अटीतटीची लढत होणार आहे. त्यामुळे या तिन्ही संघांचा प्रत्येक सामना महत्त्वाचा असणार आहे.