Hardik Pandya Kisses Shikhar Dhawan : आयपीएल २०२३ चा १८ वा सामना पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशन आयईएस बिंद्रा स्टेडियममध्ये रंगला. गुजरातचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलच्या ६७ धावांच्या अर्धशतकी खेळीमुळं पंजबा किंग्ज विरोधात त्यांना विजय मिळवता आला. पंजाबने २० षटकांत ८ विकेट्स गमावत १५३ धावा केल्या होत्या. त्यानंतर या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गुजरातने सहा विकेट्स राखून हा सामना जिंकला. परंतु, नाणेफेक सुरु होण्यापूर्वी चाहत्यांना या सामन्यात एक मजेशीर घटना पाहायला मिळाली. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तत्पूर्वी, गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने पंजाब किंग्जचं नेतृत्व करणाऱ्या शिखर धवनला किस केलं. या दोघांचा रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

नक्की वाचा – …म्हणून सचिन तेंडुलकरने मला बॅटने मारलं, विरेंद्र सेहवागने सांगितला ‘त्या’ सामन्यातील खतरनाक किस्सा

पंजाब किंग्जने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत हार्दिक पांड्याने शिखर धवनला किस केल्याचं दिसत आहे. नाणेफेक सुरु होण्यापूर्वी दोन्ही खेळाडू मैदानात आल्यावर चाहत्यांना हा नजारा पाहायला मिळाला. दोघांची केमिस्ट्री पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला. फ्रॅंचायजीने हा फोटो शेअर करत मजेशीर कॅप्शन देत म्हटलं, ” किस किससे तुम भागोगे.!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. चाहते या फोटोला मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षाव करत आहेत. पंजाब आणि गुजरातने आतापर्यंत खेळलेल्या त्यांच्या ३-३ सामन्यांपैकी २ सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांना मागील सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. सनरायझर्स हैद्राबादने पंजाबचा पराभव केला होता. तर गुजरातने कोलकाता नाईट रायडर्सवर मात केली होती.