MS Dhoni recreates iconic six: विश्वचषक २०११ च्या अंतिम सामन्यात, धोनीने श्रीलंकेविरुद्ध षटकार मारून भारताला दुसऱ्यांदा विश्वविजेते बनवले. धोनीने मारलेला षटकार (एमएस धोनी) आठवून आजही क्रिकेट चाहते उत्साहाच्या सागरात डुंबू लागतात. आता त्या ऐतिहासिक दिवसाला १२ वर्षांनंतर ‘२ एप्रिल २०२३’ (२०११ च्या या दिवशी) त्याच शैलीत शॉट खेळून धोनीने चाहत्यांना पुन्हा एकदा जुन्या आठवणींच्या समुद्रात रमण्याची संधी दिली आहे.

एमएस धोनीने २०११ विश्वचषक फायनलमध्ये जबरदस्त षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला होता. त्या षटकारावर रवी शास्त्रींनी केलेली कॉमेंट्री आजही लोकांच्या मनात ताजी आहे. आता एमएस धोनीने पुन्हा एकदा तोच फटका मारला आहे. या जबरदस्त शॉटने धोनीने २०११ च्या वर्ल्ड कप फायनलची आठवण करून दिली.

Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024
MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव

खरं तर, IPL २०२३ मध्ये CSK कडून खेळत असलेल्या धोनीने सरावाच्या वेळी अगदी त्याच पद्धतीने षटकार मारला आहे, ज्याचा व्हिडिओ CSK ने ट्विटरवर शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये माही अगदी त्याच पद्धतीने षटकार मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. CSK ने ट्विट करून लिहिले, ‘जेव्हा भूतकाळातील आनंददायी घटना समोर येतात…’  या व्हिडिओवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. धोनीचा तोच शॉट पाहून चाहते सोशल मीडियावर सतत आपले विचार मांडत असतात.

२०११ च्या विश्वचषकाबद्दल बोलायचे तर, फायनलमध्ये श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत ६ विकेट्सवर २७४ धावा केल्या होत्या, त्यानंतर भारताने हा ऐतिहासिक सामना ४ विकेट गमावून जिंकला होता. भारताकडून धोनीने नाबाद ९१ धावांची खेळी केली. तर तिथे गौतम गंभीरने ९७ धावा केल्या होत्या. त्यावेळी नवीन असलेल्या विराट कोहलीने ३५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत भारताला दुसऱ्यांदा विश्वविजेता बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. जेव्हा भारत विजयाच्या जवळ होता आणि ११ चेंडूत फक्त ४ धावा हव्या होत्या, तेव्हा धोनीने नुवान कुलसेकराला षटकार ठोकत इतिहास रचला होता.

हेही वाचा: IPL 2023: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आणखी एक धक्का, ‘हा’ मिस्ट्री स्पिनर लीगच्या पहिल्या काही सामन्यातून बाहेर

दुसरीकडे, आयपीएल २०२३ बद्दल बोलायचे तर, सीएसकेला त्यांच्या पहिल्या सामन्यात गुजरातविरुद्ध ५ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. सीएसकेने सामना गमावला असला तरी धोनीने सामन्यादरम्यान षटकार मारून चाहत्यांना नक्कीच आनंदी होण्याची संधी दिली. मात्र चेन्नई पुढच्या सामन्यांमध्ये नक्की पुनरागमन करेल अशी चाहत्यांना आशा आहे.