Kolkata Knight Riders 3rd time champion in IPL : आयपीएलच्या १७ व्या हंगामाचे विजेतेपद कोलकाता नाईट रायडर्स संघाने जिंकले. कोलकाता नाईट रायडर्सने अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव करत तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर तिसऱ्यांदा नाव कोरले. आयपीएलमध्ये केकेआर संघाने १० वर्षानंतर ट्रॉफी जिंकली आहे. यावेळी कोलकाता नाईट रायडर्सची कामगिरी उत्कृष्ट राहिली. यासह कोलकाता नाईट रायडर्सनेही या मोसमात अशी कामगिरी केली, जी यापूर्वी आयपीएलमध्ये एकदाच पाहायला मिळाली होती.

आयपीएल २०२४ मध्ये केकेआरचा मोठा विक्रम –

आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिला. साखळी फेरीत केकेआरने १४ पैकी ९ सामने जिंकले होते आणि केवळ ३ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचवेळी पावसामुळे २ सामने रद्द झाले. यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने क्वालिफायर-१ सामना जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. आता सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून तिसऱ्यांदा चॅम्पियन ठरले. म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्सला या मोसमात एकूण ३ पराभवांना सामोरे जावे लागले.

आयपीएल इतिहासात हे दुसऱ्यांदाच घडले –

आयपीएलच्या एका हंगामात सर्वात कमी सामने गमावणारा कोलकाता नाइट रायडर्स संयुक्तपणे पहिला संघ ठरला आहे. याआधी, २००८ मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या आयपीएल हंगामातही राजस्थान रॉयल्स संघाला केवळ ३ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला होता. विशेष म्हणजे त्या मोसमात राजस्थान रॉयल्सनेही ट्रॉफीवर कब्जा केला होता. त्याच वेळी, या यादीत दुसऱ्या स्थानावर गुजरात टायटन्सचा संघ आहे, ज्याने २०२२ मध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल हंगामात केवळ ४ सामने गमावले आणि ते देखील चॅम्पियन बनले होते.

हेही वाचा – KKR vs SRH : रिंकू सिंग नतमस्तक होताच गौतम गंभीरने मारली मिठी, केकेआरच्या जेतेपदानंतरचा VIDEO व्हायरल

केकेआरने एसआरएचवर एकतर्फी विजय मिळवला –

अंतिम सामन्यात सनरायझर्सं हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जो केकेआरच्या गोलंदांजांनी चमकदार कागमगिरी करत चुकीचा सिद्ध करताना सनरायझर्स हैदराबाद संघाला १८.३ षटकात ११३ धावांवर रोखले. त्यानंतर अवघ्या १०.३ षटकांत त्याने हे लक्ष्य गाठले. केकेआरच्या लक्ष्याचा पाठलाग करताना व्यंकटेश अय्यरच्या बॅटमधून शानदार खेळी पाहायला मिळाली. त्याने नाबाद अर्धशतक झळकावले.