महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्ज संघाने प्ले-ऑफच्या शर्यतीत आपलं आव्हान कायम राखलं आहे. गुणतालिकेच्या पहिल्या स्थानावर असलेल्या हैदराबादच्या संघावर ८ गडी राखून मात करत चेन्नईने घरच्या मैदानावर विजय मिळवला. मात्र चेन्नईच्या गोलंदाजीदरम्यान धोनीने केलेली एक कृती क्रीडाप्रेमींच्या चांगलीच चर्चेत राहिली आहे.

अवश्य वाचा – अंबाती रायडूच्या शतकी खेळीच्या जोरावर चेन्नई ठरली ‘सुपरकिंग’! हैदराबादवर ८ गडी राखून मात

सामन्यात नाणेफेक जिंकलेल्या धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर अॅलेक्स हेल्स माघारी परतल्यानंतर शिखर धवन आणि केन विल्यमसन जोडीने हैदराबादच्या डावाला चांगला आकार दिला. हरभजन सिंहच्या गोलंदाजीदरम्यान अखेरच्या चेंडूवर शिखर धवनने एका धावेसाठी एक फटका खेळला. हा चेंडू आपल्या ताब्यात घेण्यासाठी रविंद्र जाडेजा डिप मिड-विकेट पोजिशनवरुन धावत आला, मात्र मैदानात चपळ असलेल्या धोनीने जाडेजाआधी बॉलवर ताबा मिळवला. यानंतर धोनीने जाडेजाच्या दिशेने चेंडू फेकण्याची नक्कल करत त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला. धोनीच्या या कृतीला जाडेजासह समालोचकांनीही चांगलीच दाद दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान हैदराबादच्या संघाने विजयासाठी दिलेलं आव्हान चेन्नईने अंबाती रायडूच्या शतकाच्या जोरावर पूर्ण केलं. हैदराबाच्या संघाला पराभव स्विकारावा लागला असला तरीही गुणतालिकेत त्यांचं पहिलं स्थान कायम आहे. दरम्यान चेन्नईच्या संघाने प्ले-ऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं असून, प्ले-ऑफच्या सामन्यांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्यांना अवघ्या एका विजयाची गरज आहे.