आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ६४ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जवर १७ धावांनी विजय मिळवला. या विजयासह दिल्ली संघाने गुणतालिकेत सहाव्या स्थानापासून थेट चौथ्या क्रमांकवर झेप घेतली आहे. तर दुसरीकडे या सामन्यात पराभव झाल्यामुळे पंबाज किंग्ज हा संघ प्लेऑफपर्यंत पोहोचण्याची शक्यता धुसर झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सने पंजाबसमोर विजयासाठी १६० धावांचे लक्ष्य ठवले होते. मात्र पंजाब संघ १४२ धावा करु शकला.

हेही वाचा >>> मुंबई इंडियन्सचे बळ वाढणार, सूर्यकुमार यादवच्या जागेवर ‘हा’ दिग्गज खेळाडू ताफ्यात दाखल

दिल्लीने दिलेल्या १६० धावांचे लक्ष्य गाठताना पंजाब संघ पूर्णपणे ढासळला. पंजाबचा जितेश शर्मा वळगता एकाही खेळाडूला चांगली फलंदाजी करता आली नाही. सलामीला आलेल्या जॉनी बेअरस्टो (२८) आणि शिखऱ धवन (१९) यांनी खास खेळी केली नाही. तसेच भानुका राजपक्षे (४), लियाम लिव्हिंगस्टोन (३), मयंक अग्रवाल (०) यांनी निराशा केली. हे महत्त्वाचे खेळाडू बाद झाल्यामुळे पंजाब किंग्जची दुर्दशा झाली.

हेही वाचा >>> लियामला पाहून मुद्दाम स्ट्राईकवर आला, पण गोल्डन डकवर झाला बाद; दिल्लीच्या डेविड वॉर्नरला मोठा झटका

त्यानंतर पाचव्या विकेटसाठी आलेल्या जितेश शर्माने संघाला सावरण्याचा चांगला प्रयत्न केला. त्याने ३४ चेंडूंमध्ये ४४ धावा केल्या. जितेश मैदानात असेपर्यंत पंजाबच्या विजयाच्या आशा होत्या. मात्र शार्दुल ठाकुरच्या चेंडूवर तो झेलबाद झाला आणि पंजाबच्या हातातून सामना गेला.

हेही वाचा >>> Video : जोस बटलर-रियान परागची एकच चर्चा, दोघांनी टिपला अप्रतिम झेल, कृणाल पांड्याला केलं ‘असं’ बाद

शेवटच्या फळीतील राहुल चहर (१८) वगळता एकही फलंदाज १० पेक्षा जास्त धावा करु शकला नाही. परिणामी दिल्ली कॅपिटल्सचा १७ धावांनी विजय झाला.

हेही वाचा >>> अ‍ॅन्ड्र्यू सायमंड्सची शेवटची पोस्ट शेन वॉर्नवर, शेन वॉर्नची रॉड मार्शवर,२ महिन्यांत ३ दिग्गज क्रिकेटपटूंचे निधन

तर यापूर्वी सुरुवातीला फलंदाजीसाठी येत दिल्ली कॅपिटल्सने चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र डावाच्या पहिल्याच चेंडूवर सलामीला आलेला डेविड वॉर्नर झेलबाद झाल्यामुळे दिल्ली संघावरील दबाव वाढला. दिल्लीच्या मिचेल मार्शने (६३) अर्धशतकी खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत घेऊन जाण्याचं काम केलं. तर सरफराज खान (३२), ललित यादव (२४), अक्षर पटेल (१७) या तीन खेळाडूंनी समाधानकारक फलंदाजी केली. ज्यामुळे वीस षटके संपेपर्यंत दिल्लीला १५९ धावा करता आल्या.

हेही वाचा >>> ठरलं! महिला टी-२० चॅलेंज २०२२ स्पर्धेचे मुख्य प्रायोजकत्व ‘My11Circle’कडे; २३ मेपासून रंगणार थरार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोलंदाजी विभागात दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंनी नेहमीप्रमाणे नेत्रदीपक कामगिरी केली. शार्दुल ठाकुरने शिखर धवन, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, कसिगो रबाडा या चार दिग्गज फलंदाजांना बाद केलं. तर अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या जोडीने प्रत्येकी दोन गड्यांना बाद केलं. ज्यामुळे पंजाबचा संघ दिल्लीसमोर तग धरु शकला नाही. दिल्लीच्या गोलंदाजांसमोर फलंदाजांचा निभाव न लागल्यामुळे पंजाबचा पराभव झाला.