IPL 2022, MI vs SRH Match Highlights : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ६५ वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जातोय. या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत हैदराबादला विजय प्राप्त करावा लागणार आहे. मुंबईचा विजय झाला तर हैदराबाद संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. तर दुसरीकडे मुंबई संघ अगोदरच प्लेऑफच्या बाहेर पडलेला आहे. या संघाकडे गमावण्यासारखे काहीही नाही.
IPL 2022, MI vs SRH Live Updates : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यातील प्रत्येक अपडेट एका क्लीकवर
हैदराबादचा थरारक पद्धतीने तीन धावांनी विजय झाला. मुंबईने हा सामना जिंकण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला. मात्र मुंबईला वीस षटके संपेपर्यंत १९० धावा करता आल्या.
मुंबई इंडियन्सला संजय यादवच्या रुपात सातवा मोठा झटका बसला आहे. संजय यादव खातंदेखील खोलू शकला नाही.
मुंबई इंडियन्सला ट्रिस्टन स्टब्सच्या रुपात पाचवा मोठा झटका बसला आहे. ट्रिस्टन स्टब्स २ धावांवर असताना धावचित झाला.
मुंबई इंडियन्सला डॅनियल सॅम्सच्या रुपात चौथा मोठा झटका बसला. सॅम्सला चांगल्या धावा करता आल्या नाही. सॅम्स अवघ्या १५ धावांवार बाद झाला. सध्या मुंबईच्या १४० धावा झाल्या आहेत.
मुंबई इंडियन्सला तिसरा मोठा झटका बसला आह. तिलक वर्माच्या रुपात मुंबईचा तिसरा खेळाडू बाद झाला आहे. तिलक वर्माने अवघ्या आठ धावा केल्या. सध्या मुंबई इंडियन्सच्या १२३ धावा झाल्या आहेत.
मुंबई इंडियन्सला इशान किशनच्या रुपात दुसरा झटका बसला आहे. इशान किशनने ४३ धावा केल्या.
मुंबई इंडियन्सला रोहित शर्माच्या रुपात पहिला मोठा झटका बसला आहे. रोहित शर्मा झेलबाद झाला आहे. सध्या मुंबईच्या ९५ धैवा झाल्या आहेत.
मुंबई इंडियन्सने दमदार सुरुवात केली आहे. सध्या मुंबईचा एकही गडी बाद झालेला नाही. या संघाच्या ५० धावा पूर्ण झाल्या आहेत.
हैदराबाद संघाने २० षटकांत १९३ धावा केल्या आहेत. आता मुंबईला विजयासाठी १९४ धावा कराव्या लागणार आहेत.
हैदराबाद संघाला ऐडन मर्करामच्या रुपात पाचवा मोठा झटका बसला आहे. राहुल त्रिपाठी बाद झाल्यानंतर हैदराबादचा संघ ढासळला आहे. मर्कराम फक्त दोन धावा करु शकला आहे. सध्या हैदराबादच्या १८१ धावा झाल्या आहेत.
हैदराबादला राहुल त्रिपाठीच्या रुपात तिसरा मोठा झटका बसला आहे. राहुल त्रिपाठीने ७६ धावा केल्या. राहुल बाद झाल्यामुळे हैदराबादच्या धावफलकाला ब्रेक लागू शकतो.
सनरायझर्स हैदराबादला तिसरा मोठा झटका बसला आहे. निकोलस पुरनच्या रुपात हैदराबादचा तिसरा फलंदाज बाद झाला आहे. पुरनने ३८ धावा केल्या.
हैदराबादचा संघ सध्या चांगल्या स्थितीत आहे. राहुल त्रिपाठी चांगली फलंदाजी करत आहे. सध्या त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. तर दुसरीकडे हैदराबादच्या आतापर्यंत १४७ धावा झाल्या आहेत.
हैदराबाद संघ चांगल्या स्थितीत आहे. सध्या या संघाकडून राहुल त्रिपाठी, निकोलस पुरन फलंदाजी करत आहेत. सध्या हैदराबादरच्या ११५ धावा झाल्या आहेत.
हैदराबादला प्रियाम गर्गच्या रुपात दुसरा मोठा झटका बसला आहे. प्रियाम गर्गने ४२ धावा केल्या. तो झेलबाद झाला आहे.
हैदराबाद संघाच्या ५० धावा पूर्ण झाल्या आहेत. सध्या राहुल त्रिपाठी आणि प्रियाम गर्ग मैदानात फलंदाजी करत आहेत.
सामन्याला सुरुवात झाली असून हैदराबाद संघाला पहिला मोठा झटका बसला आहे. अभिषेक शर्मा अवघ्या ९ धावांवर झेलबाद झाला आहे. सध्या हैदराबादच्या १८ धावा झाल्या आहेत.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
? Toss Update ?@mipaltan have elected to bowl against @SunRisers.
— IndianPremierLeague (@IPL) May 17, 2022
Follow the match ▶️ https://t.co/U2W5UAg3bi #TATAIPL | #MIvSRH pic.twitter.com/j4ImZEgAvJ
सनरायझर्स हैदराबाद संघदेखील वानखेडे स्टेडियमकडे रवाना झाला आहे.
Wankhede-bound for tonight’s game ?#MIvSRH #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/Ac42Qnenas
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 17, 2022
मुंबई इंडियन्सचा संघ वानखेडे स्टेडियमकडे रवाना झाला आहे. काही क्षणात आजच्या सामन्याला सुरुवात होणार आहे.
Send our boys a ? in the replies to wish them luck for tonight ?#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #MIvSRH @Jaspritbumrah93 @TilakV9 @Kartike54075753 pic.twitter.com/ytiEoTMZmH
— Mumbai Indians (@mipaltan) May 17, 2022
आज मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होत आहे.
रोहित शर्मा आणि केन विल्यम्सन (संग्रहित फोटो)