भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे कौतुक केले आहे. क्वालिफायर-१ सामन्यात सीएसकेने गुजरात टायटन्सचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. यासह सीएसकेने १०वी फायनल खेळणार आहे. गांगुलीने धोनीच्या कर्णधारपदाचे कौतुक केले.

गांगुलीने धोनीचे कौतुक केले

धोनीच्या कर्णधारपदाचे कौतुक करताना बीसीसीआयचे माजी अध्यक्ष म्हणाले की, त्याने तरुण सीएसकेचे नेतृत्व केले आहे. गांगुली म्हणाला, या अनुभवी खेळाडूने मोठे सामने कसे जिंकायचे हे दाखवून दिले आहे. तो म्हणाला की, “धोनी आणि त्याच्या संघाने या मोसमात चमकदार कामगिरी केली आहे. धोनीने आपल्या कर्णधारपदात आश्चर्यकारक कामगिरी केली.”

हेही वाचा: IND vs AFG: टीम इंडियाच्या नेतृत्वाची धुरा हार्दिक पांड्यावर; आयपीएलमध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या युवा खेळाडूंना मिळणार संधी

आयपीएल हे तरुणांचे टॅलेंट दाखवण्याचे व्यासपीठ आहे

सौरव गांगुली म्हणाला की, “आयपीएल ही एक अशी स्पर्धा आहे जिथे अनेक युवा खेळाडू आपली प्रतिभा दाखवतात. त्याने या मोसमातील काही सर्वोत्तम युवा खेळाडूंची नावेही दिली. गांगुलीने रिंकू सिंगची पाठ थोपटली. यासोबतच त्याने ध्रुव जुरेल आणि यशस्वी जैस्वाल यांचेही नाव घेतले. पंजाब किंग्जकडून जितेश शर्माच्या कामगिरीचेही गांगुलीने कौतुक केले आहे. मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांची कामगिरीही उत्कृष्ट ठरली. गांगुली म्हणाला की, “आयपीएल ही एक मोठी स्पर्धा आहे आणि त्यात खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे.”

हेही वाचा: IPL2023: एमआय पलटणसाठी १२ षटके महत्त्वाची! गुजरातविरुद्ध मुंबई इंडियन्सची काय आहे रणनीती? जाणून घ्या

आयपीएलनंतर कसोटी चॅम्पियनशिपची तयारी केली जाईल

“कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना यंदा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंग्लंडमधील ओव्हल येथे खेळवला जाणार आहे. आयपीएल संपताच कसोटी चॅम्पियनशिपची तयारी सुरू होईल”, असे सौरव गांगुली म्हणाला. “टीम इंडियाच्या माजी कर्णधाराच्या मते, कसोटी चॅम्पियनशिपचा विजेता कोण असेल हे सांगणे कठीण आहे, कारण अंतिम सामना दोन बलाढ्य संघांमध्ये होणार आहे.” गांगुली म्हणाला, “आशा आहे की हा सामना रोमांचक असेल. मला माहित नाही की कोण विजेता होईल, पण मी तिथे असेन. मला भारताला जिंकताना बघायचे आहे, पण सध्या फायनल कोण जिंकणार जर असं विचारलं तर मी ५०-५०टक्के दोन्ही आहे.”

आयपीएलचा अंतिम सामना रविवार, २८ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी गुजरात टायटन्सला क्वालिफायर-२ सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना करावा लागणार आहे.