आयपीएल २०२३च्या २२व्या सामन्यात, मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा ५ गडी राखून पराभव करत स्पर्धेतील आपला दुसरा विजय नोंदवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआरने निर्धारित २० षटकांत धावफलकावर १८५ धावा जोडल्या, परंतु मुंबई संघाने हे लक्ष्य संयमीपणे पार करत केवळ ४चेंडू आणि ५ गडी राखून ते पूर्ण केले. इशान किशनने धडाकेबाज फलंदाजी करत शानदार अर्धशतक केले. त्याच्या या खेळीच्या जोरावर मुंबईने हा सामना जिंकला.

मुंबईसाठी हा विशेष विजय होता कारण सामना पाहण्यासाठी हरमनप्रीत कौरसह १९००० तरुणी स्टेडियममध्ये उपस्थित होत्या. वानखेडेवर स्त्री शक्तीचा जागर पाहायला मिळाला. आजचा सामना मुंबईचा संघ मुलींना समर्पित करत असल्याने नाणेफेकीसाठी यजमान संघाकडून महिला प्रीमिअर लीगमधील मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर आली.

Rohit Sharma Praised and Hugs Yashasvi Jaiswal After Century Video Viral MI vs RR IPL 2024
IPL 2024: ‘गार्डनमध्ये फिरणाऱ्या मुला’च्या शतकानंतर रोहितने मैदानातच घेतली गळाभेट, यशस्वीने रोहितला पाहताच… VIDEO व्हायरल
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनी कुठल्या दुखापतीसह खेळतोय? मुंबईविरूद्ध सामन्यानंतर सीएसकेच्या एरिक सिमन्स यांचे मोठे वक्तव्य
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: हार्दिक पंड्याने ‘सल्लागार धोनी’ला दिलं चेन्नईच्या विजयाचं श्रेय

खरं तर कालच्या सामना मुंबई इंडियन्ससाठी खूप खास होता. याचे कारण त्या सामन्यात मुंबईच्या संघाने तो विजय मुलींना समर्पित केला. तब्बल १९,००० लेकी या सामन्याच्या साक्षीदार काल झाल्या. काल मुंबई इंडियन्सने वानखेडेवर एक अनोखा उपक्रम साजरा करत आहे. ३६ एनजीओ मधील १९००० पेक्षा जास्त मुली आणि २०० अपंग मुले मुंबईच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी मैदानात उपस्थित होते. लक्षणीय बाब म्हणजे हा विशेष सामना क्रीडा क्षेत्रातील महिलांचा उत्सव असल्याचे नीता अंबानी यांनी म्हटले आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीच्या मालक नीता अंबानी दरवर्षी हा अनोखा उपक्रम राबवत असतात. मुलींचे शिक्षण आणि खेळाच्या अधिकारावर प्रकाश टाकण्यासाठी हा उपक्रम राबवत असल्याचे यावेळी नीता अंबानी यांनी सांगितले.

एवढेच नाही. या महान विजयानंतर, असे मजेदार दृश्य पाहिले जे कदाचित आपण पुन्हा कधीही पाहू शकणार नाही. सामना संपल्यानंतर झहीर खान सीमारेषेवर मुलाखत घेत होता पण रोहित शर्मा आणि इशान किशनच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ उत्सवात इतका मग्न होता की त्यांनी झहीर खानलाही सोडले नाही. घरच्या मैदानावर सहा गडी राखून विजय मिळविल्यानंतर, खेळाडू, प्रशिक्षक कर्मचारी आणि मालकांसह संपूर्ण मुंबई संघाने वानखेडे स्टेडियमवर फेरफटका मारून विजयाचा जल्लोष साजरा केला. भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर, जो आधी मुंबईच्या कोचिंग युनिटचा एक भाग होता. तो कोलकाताविरुद्ध मुंबईच्या विजयाचा आढावा घेत होता, पण मुंबई इंडियन्सचा संघ त्याच्यासमोरून जात असताना, रोहित आणि इशानने झहीरच्या लाइव्ह मुलाखतीत व्यत्यय आणला आणि थेट त्याचा हात धरून त्याला खेचायला सुरुवात केली. दोघांनी त्याला मुंबईच्या विजयाच्या जल्लोषात सामील करून घेतले.

हेही वाचा: BCCI News: जय शाह यांची मोठी घोषणा! IPL २०२३ सुरु असताना बक्षिसाची रक्कम केली दुप्पट, खेळाडूंची झाली चांदी

मुंबईचे हे सेलिब्रेशन पाहून अँकरही थक्क झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दुसरीकडे, या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, केकेआरसाठी व्यंकटेश अय्यरने ५१ चेंडूत १०४ धावांची शतकी खेळी केली, परंतु त्याला दुसऱ्या टोकाकडून एकाही फलंदाजाची साथ मिळाली नाही, ज्यामुळे धावसंख्या पार करायला हवी होती. २०० हे फक्त १८५ होते. पण ते गेल्यावर थांबले आणि शेवटी मुंबईने हे लक्ष्य सहज गाठले.