Lucknow Super Giants vs Gujarat Titans IPL Match Updates: आयपीएलच्या ३०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा सामना गुजरात टायटन्सशी होत आहे. लखनऊच्या एकना स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवण्याकडे लखनऊचे लक्ष असेल. दुसरीकडे गेल्या सामन्यात राजस्थानविरुद्ध पराभूत झालेल्या गुजरात संघाला पुन्हा विजयी मार्गावर यायचे आहे. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने लखनऊसमोर १३६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाने सहा विकेट्सवर १३५ धावा केल्या. गुजरातकडून कर्णधार हार्दिकने सर्वाधिक ६६ धावा केल्या. त्याच्याशिवाय ऋद्धिमान साहाने ४७ धावांची शानदार खेळी केली. या दोघांशिवाय केवळ विजय शंकर (१० धावा) दहाचा आकडा पार करू शकला. शुभमन गिलला खातेही उघडता आले नाही. त्याचवेळी अभिनव मनोहर तीन आणि डेव्हिड मिलर सहा धावा करून बाद झाले. लखनऊकडून कृणाल पंड्या आणि मार्कस स्टॉइनिसने प्रत्येकी दोन बळी घेतले. नवीन-उल-हक आणि अमित मिश्राला प्रत्येकी एक विकेट मिळाली. लखनऊमध्ये अवघड वाटेवर १३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे लोकेश राहुलच्या संघासाठी सोपे नसेल.

वास्तविक, गुजरात टायटन्सचा आज लखनऊ सुपरजायंट्सशी सामना आहे, जो जिंकून ते स्वतःला ईदच्यादिवशी ईदी म्हणजेच विजय देऊ इच्छीतात. तसे पहिले तर, गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या आणि गेल्या ६ पैकी ५ सामने जिंकणाऱ्या लखनऊवासियांना त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करणे सोपे जाणार नाही. म्हणजेच गुजरात टायटन्सच्या खेळाडूंना आपल्या ईदीसाठी संघर्ष करावा लागणार आहे. गुजरात टायटन्सने आतापर्यंत ५ सामने खेळले असून ३ जिंकले आहेत. हा संघ सध्या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. अशा स्थितीत लखनऊला हरवण्यात ते यशस्वी ठरले तर विजयासोबतच त्यांचा उदयही टेबलमध्ये पाहायला मिळेल. याचा अर्थ तुम्ही दुहेरी ईदी मिळवू शकते.

हेही वाचा: LSG vs GT: ईद मुबारक! राशिद-शमीने गळाभेट घेत दिल्या शुभेच्छा, गुजरात-लखनऊच्या खेळाडूंचा सेलिब्रेशन Video व्हायरल

दोन्ही संघांचे प्लेइंग-११

लखनऊ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस, कृणाल पांड्या, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), आयुष बधोनी, नवीन-उल-हक, अमित मिश्रा, आवेश खान, रवी बिश्नोई.

राखीव खेळाडू: जयदेव उनाडकट, कृष्णप्पा गौतम, डॅनियल सॅम्स, प्रेरक मंकड, कर्ण शर्मा.

गुजरात टायटन्स: ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुबमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा.

राखीव खेळाडू: जोश लिटल, जयंत यादव, शिवम मावी, साई किशोर, श्रीकर भारत.