Delhi Capitals vs Mumbai Indians Score Update: आयपीएल २०२३च्या १६व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने आले होते. आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या या दोन्ही संघातील सामना चांगलाच रंगला. मुंबई इंडियन्सने दिल्लीला त्यांच्यात घरात सहा गडी राखून पराभूत करत रोमांचक विजय मिळवला. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर दिल्लीने सर्वबाद १७२ धावा केल्या. जेसन बेहरेनडॉर्फच्या षटकात मुंबईने चार बळी टिपत सामन्यात आपली बाजू भक्कम केली. कर्णधार रोहित शर्माला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
धावांचा पाठलाग करताना मुंबईने आक्रमक सुरुवात केली. पॉवर प्ले मध्ये मुंबईने दमदार सुरुवात केली असून कर्णधार रोहित आणि सलामीवीर इशान यांच्यात अवघ्या २६ चेंडूत ५० धावांची भागीदारी केली होती. दोघांनी मिळून पहिल्या १० षटकात ७१ धावा करत भक्कम अशी सलामी त्या दोघांनी दिली. त्यानंतर रोहित शर्मा आणि ईशान किशन चांगल्या टचमध्ये दिसत होते. दोघांमध्ये ७१ धावांची भक्कम अर्धशतकी भागीदारी झाली. चुकीचा कॉल करत रोहित शर्माने इशान किशनला धावबाद केले.
विजयाच्या उंबरठ्यावर असताना मुंबईला दुसरा धक्का बसला. तिलक वर्मा मोठा फटका मारण्याच्या नादात तो २९ चेंडूत ४१ धावा करत मनीष पांडेकरवी झेलबाद झाला. त्यापाठोपाठ फॉर्म मध्ये नसलेला सूर्यकुमार यादव पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारत भोपळाही न फोडता बाद झाला. दोघांना एकाच षटकात मुकेश शर्माने बाद करून सामना रोमांचक केला. दोन षटकात दिल्लीने भेदक गोलंदाजी करत मुंबईला तीन धक्के दिले. कर्णधार रोहित शर्मा जो एकमेव फलंदाज होता जो सध्या सेट होता. त्याच्या बाद होण्याने सामना रोमांचक झाला. रोहितने ४५ चेंडूत ६५ धावा केल्या. शेवटच्या षटकात इम्पॅक्ट प्लेअर टीम डेव्हिडने मॅच जिंकून दिली.
तत्पूर्वी, डेव्हिड वॉर्नरने पुन्हा एकदा ५१ धावांची उपयुक्त खेळी केली आणि यावेळेस त्याला उपकर्णधार अक्षर पटेलची चांगली साथ मिळाली. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ३५ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी केली. मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू पीयुष चावलाने सुरुवातीला दिल्लीला ३ धक्के दिले होते, परंतु मधल्या षटकांत दिल्लीने अप्रतिम फलंदाजी करत सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. अक्षरने २५ चेंडूंत ५४ धावा केल्या, त्यात त्याने ४ चौकार आणि ५ षटकारांचा साज चढवला.
जेसन बेहरेनडॉर्फने १९व्या षटकात मुंबईला चार विकेट्स मिळवून देताना लक्ष्य थोडे मुंबईच्या आवाक्यात आणले. १८ व्या षटकात ५ बाद १६५ धावा असणारा दिल्लीचा संघ पुढील १० चेंडूंत ७ धावा करून माघारी परतला. मुंबईकडून जेसन बेहरेनडॉर्फ आणि पियुष चावलाने प्रत्येकी ३ विकेट्स तर रिले मेरेडिथने २ आणि ऋतिक शौकीनने एक विकेट त्यांना साथ दिली. दिल्लीला आता आयपीएलमध्ये टिकून राहायचे असेल तर किमान पुढील सर्व सामने जिंकणे आवश्यक आहे.