scorecardresearch

IPL 2023 Rule Change: आता एक नाही दोन प्लेईंग-११! टॉस झाल्यावरही डावपेच बदलू शकणार कर्णधार, कसे असतील IPLचे मजेशीर नियम?

IPL 2023 New Rules: इंडियन प्रीमियर लीग २०२३ला आणखी रोमांचक बनवण्यासाठी अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. नाणेफेकीपासून ते सामना संपेपर्यंत बीसीसीआयने मोठे निर्णय घेतले आहेत.

IPL 2023 New Rules: IPL will be played with these changed rules captains got this exemption in selection of playing 11
संग्रहित छायाचित्र (ट्विटर)

Indian Premier League 2023 New Rule: आयपीएल २०२३ साठी उलटी गिनती सुरू झाली आहे. ही स्पर्धा ३१ मार्चपासून सुरू होणार आहे. दोन महिने चालणाऱ्या या स्पर्धेच्या नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले असून त्यामुळे हा खेळ आणखीनच रोमांचक होणार आहे. येथे आम्ही IPL २०२३ च्या नवीन नियमांबद्दल सांगत आहोत. आयपीएल २०२३ मध्ये, कर्णधार दोन भिन्न संघ खेळाडूंची यादी घेऊन नाणेफेकसाठी येतील आणि नाणेफेक झाल्यानंतर त्यांचे खेळण्याचे ११ खेळाडू उघड करतील. आयपीएलच्या नियमांमध्ये हा एक महत्त्वाचा बदल आहे. आयपीएलने एका अंतर्गत नोटमध्ये म्हटले आहे की यामुळे फ्रँचायझींना त्यांचे सर्वोत्तम प्लेइंग-११ निवडता येतील, मग ते प्रथम फलंदाजी करतील किंवा प्रथम गोलंदाजी करतील हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असेन. याशिवाय नाणेफेकीनंतर प्रभावशाली खेळाडू निवडण्याची संधीही संघांना असेल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या नोटमध्ये म्हटले आहे की, “सध्या कर्णधारांना नाणेफेक करण्यापूर्वी त्यांचे प्लेइंग-११ एकमेकांना सांगावे लागत होते. आता हे काम टॉसनंतर लगेच केले जाईल, जेणेकरून संघांना सर्वोत्तम खेळणारा ११ खेळाडूंचा संघ निवडण्यास मदत होईल. मग ते प्रथम फलंदाजी असो किंवा प्रथम गोलंदाजी असो. यामुळे संघांना प्रभावशाली खेळाडू म्हणजेच ‘इम्पॅक्ट प्लेअर’ निवडण्यास मदत होईल.”

हेही वाचा: Virat Kohli: “ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शतकानंतर…”, महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सच्या मुलखातीत विराटने केला मोठा खुलासा

इथेही बदल होतील

टूर्नामेंट समितीने आधीच ‘इम्पॅक्ट सबस्टिट्युशन’ (प्रभावी खेळाडूची जागा) जाहीर केली आहे ज्यामध्ये पाच नियुक्त बदली खेळाडूंमधून सामन्यादरम्यान नवीन खेळाडू बदलल जाऊ शकते. निर्धारित वेळेत ज्या संघाची षटके पूर्ण होणार नाहीत अशा संघांना प्रत्येक षटकासाठी ३० यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त चार क्षेत्ररक्षक ठेवण्याचा नियम लावला जाणार असून हा एकप्रकारे ओव्हर रेट दंड आकारण्याचा प्रकार आहे. यष्टिरक्षकाने काही चुकीचे केले तर चेंडू डेड घोषित केला जाईल आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच अतिरिक्त धावा मिळतील. क्षेत्ररक्षकाने काही चूक केली तरी चेंडू डेड घोषित केला जाईल आणि पाच धावांचा दंड आकारला जाईल.

हेही वाचा: IND vs AUS: सामना सुरु असताना अचानक केला ‘या’ पक्षाने हल्ला, स्टॉयनिससह पांड्याचीही बसली पाचावर धारण; Video व्हायरल

SA२० मध्ये आधीच लागू केले आहेत

आयपीएलपूर्वी दक्षिण आफ्रिकेची एसए२० लीग नुकतीच पार पडली, ज्यामध्ये हा नियम लागू करण्यात आला. यामध्ये संघांना नाणेफेकीनंतर त्यांची प्लेइंग इलेव्हन घोषित करण्याची सुविधा देण्यात आली होती. नाणेफेकीनंतर त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यापूर्वी संघांनी संघाच्या पत्रकावर १३ नावे टाकली. म्हणजेच ११ खेळाडू खेळत असून दोन खेळाडूंना इम्पॅक्ट प्लेयर म्हणून ठेवण्यात आले होते. संध्याकाळच्या सामन्यांमध्ये, दुसऱ्या डावात दवाचा प्रभाव अधिक जाणवतो, ज्यामुळे संघाला गोलंदाजी करणे कठीण होते. या नव्या नियमामुळे गोलंदाजी संघाला नंतर दिलासा मिळण्याची शक्यता असून, त्यामुळे सामन्यातील संतुलन आणि रोमांचकता वाढेल.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 12:23 IST

संबंधित बातम्या