Yashasvi Jaiswal IPL 2023: यशस्वी जैस्वाल आयपीएल २०२३ मध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने नऊ डावांमध्ये ४७.५६च्या सरासरीने ४२८ धावा केल्या असून स्ट्राइक रेट १५९.७० आहे. या मोसमात आतापर्यंत त्याने ५६ चौकार आणि १८ षटकार मारले आहेत. तसेच, तो सध्या सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असून ऑरेंज कॅप त्याच्या नावावर आहे. आयपीएलच्या १०००व्या सामन्यात जैस्वालने मुंबई इंडियन्सविरुद्ध १२४ धावांची दमदार खेळी केली. आयपीएलमधील कोणत्याही फलंदाजाने राजस्थानकडून खेळताना केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी बटलरनेही १२४ धावांची खेळी केली होती.

राजस्थानकडून डावाची सुरुवात करणारा जैस्वाल २०व्या षटकात बाद झाला. त्याने ६२ चेंडूंचा सामना करत १२४ धावा केल्या. या खेळीत त्याच्या बॅटमधून १६ चौकार आणि ८ षटकार आले. त्याच्या या शानदार खेळीमुळे राजस्थान संघाने २१२ धावा केल्या. जरी या लक्ष्याचा बचाव गोलंदाजांना करता आला नसला तरी जयस्वालने आपल्या खेळीने सर्वांची मने जिंकली. जैस्वालचा क्रिकेटपटू होण्यापासून ते आयपीएल खेळण्यापर्यंतचा प्रवास हा त्याच्या खेळीसारखा खूपच हृदयस्पर्शी आहे.

Sandeep Sharma may replace Shami
RR vs MI : टीम इंडियाच्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाचा शोध संपला! ‘हा’ गोलंदाज घेऊ शकतो मोहम्मद शमीची जागा
Top 5 Oldest Player To Score A Century In IPL
IPL 2024 : रोहित शर्मासह ‘या’ पाच सर्वात वयस्कर खेळाडूंनी आयपीएलमध्ये झळकावलयं शतक, जाणून घ्या कोण आहेत?
IPL 2024 RR vs PBKS Match Updates in marathi
PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज
Yuzvendra Chahal become third highest wicket taker for Rajasthan Royals
IPL 2024 : युजवेंद्र चहलने मोडला शेन वॉर्नचा विक्रम, राजस्थानसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला तिसरा गोलंदाज

मुंबईच्या आझाद मैदानाबाहेर गोलगप्पा विकण्यापासून ते आयपीएलमध्ये शतकवीर होण्यापर्यंतचा यशस्वीचा संघर्षमय प्रवास हा मनाला खूप वेदना देणारा असा आहे. यशस्वी हा उत्तर प्रदेशातील भदोही येथील रहिवासी आहे. त्यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. वयाच्या ११व्या वर्षी यशस्वीने क्रिकेटर बनण्यासाठी मुंबई गाठली. तेथे त्याच्यासाठी सर्व काही सोपे नव्हते कारण घरात एक पैसाही नसताना थेट घर सोडून येणे ही खूप मोठी गोष्ट होती. यशस्वीला मुंबईसारख्या मोठ्या शहरात नाव कमवायचे होते.

हेही वाचा: IPL 2023: रोहितचा वाढदिवस ३५वा की ३६वा? हिटमॅनने अशी गुगली टाकली की समालोचक हर्षा भोगले देखील झाले हैराण

यशस्वी अनेक वेळा रिकाम्या पोटी उपाशी झोपला

मुंबईत कमाई करण्यासाठी आझाद मैदानावर राम लीलेच्या वेळी गोलगप्पा आणि फळे विकायची. त्याला अनेकदा रिकाम्या पोटी झोपावे लागले. यशस्वी यांनी दुग्धव्यवसायातही काम केले. तिथे एके दिवशी त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. यादरम्यान क्लबने यशस्वीला मदतीची ऑफर दिली, मात्र तो चांगला खेळला तरच त्याला तंबूत राहण्यासाठी जागा दिली जाईल, अशी अट त्याच्यासमोर ठेवण्यात आली होती. यशस्वी मंडपात भाकरी करत असे. तिथे त्यांना दुपारी आणि रात्री जेवण मिळायचे.

ज्वाला सिंगने यशस्वीच्या आतील गुण शोधले

यशस्वीने पैसे मिळवण्यासाठी चेंडू शोधण्याचेही काम केले. क्रिकेट खेळताना आझाद मैदानात अनेकदा चेंडू हरवला जातो. तो हरवलेला चेंडू शोधण्यासाठी यशस्वीला पैसे मिळायचे. एके दिवशी प्रशिक्षक ज्वाला सिंग यांची यशस्वीवर नजर पडली. यशस्वीप्रमाणेच ज्वालाही मूळची उत्तर प्रदेशचा आहे. त्याने डावखुऱ्या हाताच्या फलंदाजातील गुण शोधून त्याला तयार केले. जसा जोहरी हिऱ्याला पैलू पाडण्याचे काम करतो त्याचप्रमाणे ज्वाला यांनी यशस्वीला क्रिकेटर होण्यसाठी मदत केली. यशस्वी नेहमीच ज्वाला सिंगचे कौतुक करतो, “त्यांच्यामुळेच मी इथे आहे असं तो म्हणतो.” तो एकदा म्हणाला होता की, “मी त्यांचा दत्तक मुलगा आहे. मला इथपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांचे हे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही.”

हेही वाचा: IPL 2023: “अरे माझा फोन…”, रोहित शर्मा सोबत सेल्फी घेणं चाहत्याला पडलं महागात, पाहा Video

आयपीएल शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू

१९ वर्षे, २५३ दिवस – मनीष पांडे (RCB) विरुद्ध डेक्कन चार्जर्स, सेंच्युरियन, २००९
२० वर्षे, २१८ दिवस – ऋषभ पंत (DC) विरुद्ध SRH, दिल्ली, २०१८
२० वर्षे, २८९ दिवस – देवदत्त पडिक्कल (RCB) विरुद्ध RR, मुंबई WS, २०२१
२१ वर्षे, १२३ दिवस – यशस्वी जैस्वाल (RR) विरुद्ध MI, मुंबई WS, २०२३
२२ वर्षे, १५१ दिवस – संजू सॅमसन (DC) वि RPS, पुणे, २०१७