Hardik Pandya Share Video With His Son Agastya During IPL Shoot : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या आयपीएल २०२४ मधील एक चर्चेतील चेहरा आहे. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन झाल्यापासून ते आता विविध सामन्यातील पराभवापर्यंत हार्दिक पांड्या सतत चर्चेत आहे. त्याने सोशल मीडियावर कोणती नवी पोस्ट टाकलेली रे टाकली त्याचे चाहते आणि विरोधक पोस्टखाली कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पाडतायत. अशातच हार्दिकने स्वत:चा एक नवा व्हिडीओ पोस्ट केलाय. ज्यामध्ये तो मुलग अगस्त्यबरोबर दिसत आहे. हा व्हिडीओ आयपीएल ॲड शूटदरम्यानचा आहे, ज्यामध्ये तो आपल्या मुलाला अभिनयाचे धडे देताना दिसत आहे.

सामन्यातून वेळ मिळताच हार्दिक आयपीएलच्या ॲड शूटसाठी पोहोचला. जाहिरातीच्या शूटिंगवेळी हार्दिक पांड्याचा मुलगा अगस्त्यही त्याच्याबरोबर सेटवर होता. शूटमधून मोकळा वेळ मिळताच हार्दिक त्याच्या मुलाजवळ येतो आणि त्याचे चुंबन घेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर तो आपल्या मुलाशी बोलू लागतो. हार्दिक मुलाला शूटिंग आणि अभिनय याविषयी सांगताना दिसतोय. यावेळी मुलाला तो आई काय करते? तो आता काय काम आहेत? याबद्दल सांगताना दिसतोय. हार्दिक पांड्याची पत्नी नताशा एक अभिनेत्री आहे आणि अनेक चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला आहे. हार्दिकचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

IPL 2024 मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सची स्थिती सध्या चांगली नाही. संघाला पुढे जाण्यासाठी आता विजयावर भर द्यावा लागणार आहे. संघ सध्या गुणतालिकेत 8 व्या क्रमांकावर आहे.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आतापर्यंत खेळलेल्या 8 पैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत. याचा अर्थ, हार्दिक आणि कंपनीला 5 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. IPL 2024 मधील मुंबई इंडियन्सच्या खराब स्थितीत कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याचे निर्णय आणि त्याची निराशाजनक वैयक्तिक कामगिरी यांचाही मोठा वाटा आहे.

हेही वचा – रांचीमध्ये अडकलोय, ६०० रुपये पाठवशील का? धोनीकडून पैशांची मागणी? पुरावा म्हणून काय दाखवलं पाहा

दरम्यान आयपीएल २०२४ मधील मुंबई इंडियन्सच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाल्यास, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सची स्थिती फारशी चांगली नाही. संघाला पुढे जाण्यासाठी आता विजयावर भर द्यावा लागणार आहे. संघ सध्या पॉइंट्स टेबलमध्ये ८ व्या क्रमांकावर आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आतापर्यंत खेळलेल्या ८ पैकी फक्त ३ सामने जिंकले आहेत. याचा अर्थ, हार्दिक आणि टीमला ५ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. IPL 2024 मधील मुंबई इंडियन्सच्या खराब स्थितीत कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याचे निर्णय आणि त्याची निराशाजनक वैयक्तिक कामगिरी यांचाही मोठा वाटा आहे.

हार्दिक पांड्याने त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून दिले आहे. पण या मोसमात तो मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. हार्दिकला मुंबईला प्लेऑफमध्ये घेऊन जायचे असेल तर त्याला उर्वरित ६ पैकी किमान ५ सामने चांगल्या रनरेटने जिंकावे लागतील.