IPL 2024, PBKS vs DC Team Predicted Playing 11, Players List, Pitch Report Updates: दिल्ली कॅपिटल्सचा नियमित कर्णधार ऋषभ पंत भीषण रस्ते अपघातानंतर क्रिकेटच्या मैदानात परतणार आहे. पंतच्या नेतृत्त्वाखालील दिल्ली संघाचा सामना आज २३ मार्च रोजी शिखर धवनच्या पंजाब किंग्स संघाविरूध्द होणार आहे. दोन्ही संघ विजय मिळवत मोहिमेला सुरूवात करण्याच्या प्रयत्नानिशी मैदानात उतरणार आहे. या दोन्ही संघांनी आतापर्यंत एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावले नाही.

पंजाब किंग्जने यंदाच्या मोसमात घरचे मैदान बदलले आहे.
आतापर्यंत या संघाचे घरच्या मैदानावरील सामने पंजाब क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळवले जात होते. या मोसमापासून सर्व सामने महाराज यादविंद्र आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवले जातील. या मैदानावर शनिवारी पहिला आयपीएलचा सामना खेळवला जाणार आहे. या मैदानावर आतापर्यंत फक्त देशांतर्गत क्रिकेट सामने खेळले जात आहेत.

match prediction ipl 2024 royal challengers bangalore match against sunrisers hyderabad today
IPL 2024 : बंगळूरुसमोर विजयाचे आव्हान; सनरायजर्स हैदराबादशी आज गाठ; हेड, कोहलीकडून अपेक्षा
KL Rahul Argues With Umpire in live match and Sledges Shivam Dube CSK vs LSG
IPL 2024: केएल राहुल लाइव्ह सामन्यात थेट पंचांवरच भडकला, दुबेलाही सुनावलं; VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं
IPL 2024 MI vs RR Predicted Playing 11 Pitch Report details in Marathi
MI vs RR Match Preview: मुंबईसमोर राजस्थानचे आव्हान, MI च्या संघात कोणते बदल होणार? पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
MS Dhoni 300 Dismissals in T20
DC vs CSK : महेंद्रसिंग धोनीने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला यष्टीरक्षक

IPL 2024 PBKS vs DC पिच रिपोर्ट

महाराजा यादविंद्र स्टेडियममध्ये आयपीएलचा सामना खेळवला जात आहे. या मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यांवर नजर टाकली तर कमी धावसंख्येची खेळपट्टी असल्याचे लक्षात येते. हा सामना दिवसा होणार असल्याने आणि उष्णतेमुळे अपेक्षेपेक्षा कमी धावसंख्या होऊ शकते. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. चौकार मारण्यासाठी फलंदाजांना खूप मेहनत करावी लागू शकते आणि फिरकी गोलंदाजांचे बरेच वर्चस्व असू शकते. पण वेगवान गोलंदाजही फलंदाजांसाठी त्रासदायक ठरू शकतात. दिल्लीकडे अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्या रूपाने २ जागतिक दर्जाचे फिरकी गोलंदाज आहेत, जे पंजाबच्या फलंदाजांसाठी अडचणी निर्माण करू शकतात.

पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत ३२ वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी दोन्ही संघांनी सारखाच ११-११ वेळा विजय मिळवला आहे. गेल्या मोसमातही दोघांनी एकदा एकमेकांना पराभूत केले होते. पंजाब आणि दिल्ली हे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणता येतील, हे या आकडेवारीवरून समजू शकते. खेळपट्टीवर अवलंबून, सामना कमी धावसंख्येचा असू शकतो. त्यामुळे दोन्ही संघ गोलंदाजी आक्रमणावर बरेच अवलंबून असतील.

पंजाब किंग्जचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), सॅम करन, ऋषी धवन, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.

दिल्ली कॅपिटल्सचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, ललित यादव, अक्षर पटेल, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मुकेश यादव, अॅनरिक नॉर्खिया.