IPL 2024, Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings: आयपीएलमधील पंजाब किंग्सविरूध्दच्या सामन्यात विराट कोहलीच्या शानदार ७७ धावांच्या खेळीने आरसीबीच्या विजयाचा पाया रचला. या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार मिळालेल्या विराटने ४९ चेंडूंत ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७७ धावा केल्या. सामना संपल्यानंतर कोहलीने मैदानातून व्हीडिओ कॉलवर अनुष्का आणि लेकाशी बोलताना दिसला. याचा व्हिडिओही सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

सामना झाल्यानंतर विराट कोहली मैदानावरच व्हीडिओ कॉलवर बोलताना दिसला. विराटचा सामन्यानंतरचा व्हीडिओ कॉल ही काय नवीन गोष्ट नाहीय, तो नेहमीच अनुष्का जर सामना पाहण्यासाठी उपस्थित नसेल तर तिला कॉल करतो.पण हा व्हीडिओ कॉल खास होता. कारण तो फक्त व्हीडिओ कॉलवर अनुष्काशीच बोलत नव्हता तर त्याचा लेक अकाय याच्याशीसुध्दा हावभाव करत गप्पा मारताना दिसला. व्हीडिओ कॉलवर कोहलीने स्वतचा चेहरा असलेली स्क्रिन मोठी ठेवली होती. त्यामुळे अनुष्का किंवा इतर कोणीही दिसू शकले नाहीत. पण व्हीडिओ कॉलवर बोलताना विराट स्वतमध्येच मग्न झाला होता. या क्षणाचा व्हीडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विराट कोहली दोन महिने क्रिकेटच्या मैदानापासून आणि सर्वांच्या नजरेपासून दुर होता. या ब्रेक दरम्यान आपला वेळ कसा घालवला याबद्दल हर्षा भोगले यांच्याशी बोलताना कोहली म्हणाला की, आम्ही एका अशा ठिकाणी होतो जिथे लोक आम्हाला ओळखत नव्हते. एक कुटुंब म्हणून वेळ घालवता आला आणि हे दोन महिने छान होते. अर्थात, दोन मुले झाल्यानंतर, कौटुंबिक दृष्टिकोनातून गोष्टी पूर्णपणे बदलल्या आहेत. कुटुंबासोबत राहणं, मोठ्या मुलीशी तेवढंच जोडलेलं राहण, या साऱ्या गोष्टी आहेत. माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची चांगली संधी मिळाल्याबद्दल मी देवाचा आभारी आहे.