IPL 2025 Final Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Highlights : आयपीएल २०२५ या स्पर्धेतील अंतिम सामना आज पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या दोन संघांमध्ये अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात बंगळुरूने पंजाबवर सहा धावांनी मात करत आयपीेल चषक उंचावला आहे. या विजयासह बंगळुरूने १७ वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. या दोन्ही संघांनी आजवर आयपीएल चषक उंचावला नव्हता. मात्र, आता क्रिकेटरसिकांना नवा आयपीएल चॅम्पियन संघ मिळाला. बंगळुरूने आतापर्यंत तीन वेळा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. तिन्ही वेळा या संघाने पराभव पत्करला होता. तर पंजाब किंग्सने देखील एकदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, त्यांना देखील पराभव स्वीकारावा लागला होता. पंजाबला आयपीएल चषकाचा दुष्काळ संपवता आलेला नाही.
या सामन्यात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर निर्धारित २० षटकांत बंगळुरूने ९ बाद १९० धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात पंजाबच्या काईल जेमिसन व अर्शदीप सिंगने प्रत्येक ३ बळी घेत RCB चं कंबरडं मोडलं. तर बंगळुरूकडून विराट कोहलीने सर्वाधिक ४३ धावा जमवल्या. तर, त्याला कर्णधार रजत पाटीदार (२६), जितेश शर्मा (२४), लियाम लिव्हिंगस्टन (२५), मयंक अग्रवाल (२४) या चौघांनी चांगली साथ दिली.
दरम्यान, १९१ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबच्या संघाला २० षटकांत ७ बाद १८४ धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबकडून एकट्या शशांक सिंगने ३० चेंडूत ६१ धावांची खेळी करत शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली. मात्र ही झुंज अपयशी ठरली. बंगळुरूकडून कृणाल पांड्याने सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत १७ धावा देत दोन बळी घेतले. तर, भुवनेश्वर कुमारने चार षटकांत ३८ धावा देत दोन बळी घेतले. तसेच यश दयाल, जॉश हेझलवूड व रोमारियो शेफर्डने प्रत्येक एक बळी टिपला.
RCB vs PBKS IPL 2025 Live Match Updates : आरसीबी विरुद्ध पीबीकेएस संघात खेळवल्या जाणाऱ्या आयपीएल फायनल सामन्याचे लाईव्ह अपडेट्स एकाच क्लिकवर.
Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings, IPL 2025 Final LIVE Score : प्रसिद्ध कृष्णाला पर्पल कॅप तर साई सुदर्शन ऑरेंज कॅपचा मानकरी
पर्पल कॅप (हंगामात सर्वाधिक बळी) - प्रसिद्ध कृष्णा
ऑरेंज कॅप (हंगामात सर्वाधिक धावा) - साई सुदर्शन
मोस्ट व्हॅल्यूबल प्लेअर ऑफ दी सिझन - सूर्यकुमार यादव
पूरन व साई सुदर्शनचा गौरव
सुपर सिक्सेस ऑफ दी सिझन - निकोलस पूरन (४० षटकार)
रुपे ऑन द गो फोर अवॉर्ड - साई सुदर्शन (८८ चौकार)
मोस्ट डॉट बॉल्स - मोहम्मद सिराज (१५१ निर्धाव चेंडू)
कॅच ऑफ दी सीझन - कामिंदू मेंडिस
साई सुदर्शन व वैभव सूर्यवंशीचा गौरव
साई सुदर्शन इमर्जिंग प्लेअर ऑफ दी इयर पुरस्काराने सन्मानित
सुपर स्ट्राइकर ऑफ दी सीझन - वैभव सूर्यवंशी
Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings, IPL 2025 Final LIVE Score : बंगळुरूची पंजाबवर मात
दरम्यान, १९१ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबच्या संघाला २० षटकांत ७ बाद १८४ धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबकडून एकट्या शशांक सिंगने ३० चेंडूत ६१ धावांची खेळी करत शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली. मात्र ही झुंज अपयशी ठरली. बंगळुरूकडून कृणाल पांड्याने सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत १७ धावा देत दोन बळी घेतले. तर, भुवनेश्वर कुमारने चार षटकांत ३८ धावा देत दोन बळी घेतले. तसेच यश दयाल, जॉश हेझलवूड व रोमारियो शेफर्डने प्रत्येक एक बळी घेतला.
IPL 2025 Final Live : पंजाबला लागोपाठ दोन धक्के, नेहाल वढेरापाठोपाठ स्टॉयनिस बाद
भुवनेश्वर कुमारने एकाच षटकात सामना पंजाबच्या हातून हिसकावला आहे. त्याने १७ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर नेहाल वढेराला कृणाल पांड्याकरवी झेलबाद केलं. त्यानंतर मैदानात आलेल्या मार्क स्टॉयनिसने शानदार षटकार लगावला. भुवनेश्वरच्या पुढच्या आऊटस्विंग चेंडूवर स्टॉयनिस यष्टीरक्षक जितेश शर्माकडे झेल देऊन बाद झाला.
IPL 2025 RCB vs PBKS final live score : १२.५ षटकात पंजाबचं शतक
१२.५ षटकात पंजाबचं शतक पूर्ण झालं आहे. शशांक सिंग २ तर नेहाल वढेरा ३ धावांवर खेळत आहेत.
पंजाबला आणखी एक धक्का, कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर जॉश इंग्लिश बाद
पंजाबला आणखी एक धक्का, कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर जॉश इंग्लिश बाद, जॉश पांड्याच्या गोलंदाजीवर लिव्हिंगस्टनकडे सोपा झेल देत बाद झाला. त्याने २३ चेंडूत ३९ धावांची खेळी केली.
IPL Final Live Score, RCB vs PBKS updates : पंजाबला मोठा धक्का, कर्णधार श्रेयस अय्यर बाद
पंजाबला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार श्रेयस अय्यर एकेरी धाव करून बाद झाला आहे. रोमारियो शेफर्डच्या आऊटस्विंग चेंडू बॅटच्या कडेला लागून यष्टीरक्षक जितेश शर्माच्या हातात जाऊन विसावला.
Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings, IPL 2025 Final LIVE Score : ९ षटकात पंजाबची १ बाद ७० धावांपर्यंत मजल
९ षटकात पंजाबने १ बाद ७० धावांपर्यंत मजल मारली आहे. प्रभसिमरन सिंग २६ धावांवर तर, जॉश इंग्लिश १७ धावांवर खेळत आहेत.
IPL 2025 Final Live : पॉवर प्लेमध्ये पंजाबची १ बाद ५२ धावांपर्यंत मजल
पॉवर प्लेच्या पहिल्या सहा षटकांमध्ये पंजाबने १ बाद ५२ धावांपर्यंत मजल मारली आहे. प्रभसिमरन सिंग १६ धावांवर तर, जॉश इंग्लिश ८ धावांवर खेळत आहेत. पॉवर प्लेच्या पहिल्या सहा षटकांत बंगळुरूने ५५ धावा फटकावल्या होत्या.
IPL 2025 RCB vs PBKS final live score : बंगळुरूला पहिलं यश, प्रियांश आर्या २४ धावांवर बाद
बंगळुरूला पहिलं यश मिळालं असून प्रियांश आर्या २४ धावांवर बाद झाला आहे. जॉश हेझलवूडच्या गोलंदाजीवर फिल सॉल्टने सीमारेषेवर अतिशय अवघड असा झेल टिपत प्रियांशला माघारी धाडलं.
पंजाबची धडाक्यात सुरुवात, बंगळुरू विकेटच्या प्रतीक्षेत
पहिल्या चेंडूवर चौकार व पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर षटकार लगावत पंजाबने चांगली सुरुवात केली आहे. यासह पहिल्या तीन षटकांत पंजाबने धावफलकावर ३१ धावा लावल्या आहेत. प्रियांश आर्या व प्रभसिमरन सिंग १३ धावांवर खेळत आहेत.
IPL Final 2025 Winner: AI नंही वर्तवलं आयपीएल विजेत्याचं भाकित; म्हणे 'या' संघाला मिळणार ट्रॉफी!
IPL Final Live Score, RCB vs PBKS updates : निर्धारित २० षटकांत बंगळुरूची ९ बाद १९० धावांपर्यंत मजल, जेमिसन-अर्शदीपने RCB चं कंबरडं मोडलं
निर्धारित २० षटकांत बंगळुरूने ९ बाद १९० धावांपर्यंत मजल मारली आहे. या सामन्यात काईल जेमिसन व अर्शदीप सिंगने प्रत्येक ३ बळी घेत RCB चं कंबरडं मोडलं. तर बंगळुरूकडून विराट कोहलीने सर्वाधिक ४३ धावा जमवल्या. तर, त्याला कर्णधार रजत पाटीदार (२६), जितेश शर्मा (२४), लियाम लिव्हिंगस्टन (२५), मयंक अग्रवाल (२४) या चोघांनी चांगली साथ दिली.
RCB vs PBKS LIVE Score : शेफर्डपाठोपाठ कृणाल पांड्या माघारी
अर्शदीपने शेफर्डपाठोपाठ कृणाल पांड्याला देखील माघारी जायला भाग पाडलं आहे. पांड्या अय्यरकडे झेल देत बाद झाला.
Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings, IPL 2025 Final LIVE Score : बंगळुरूला सातवा धक्का, रोमारियो शेफर्ड बाद
अर्शदीप सिंगने २० व्या षटकात बंगळुरूला सातवा धक्का दिला आहे. रोमारियो शेफर्डला (१७ धावा) त्याने पायचित पकडलं. (बंगळुरू १८८/७)
बंगळुरूचा सहावा फलंदाज माघारी परतला आहे जितेश शर्मा २४ धावा करून बाद झाला. त्याला विजयकुमार वैशाखने त्रिफळाचित केलं.
IPL 2025 Final Live : बंगळुरूचा पाचवा फलंदाज तंबूत, काईल जेमिसनच्या गोलंदाजीवर लिव्हिंगस्टन बाद
बंगळुरूचा पाचवा फलंदाज तंबूत परतला आहे. काईल जेमिसनच्या गोलंदाजीवर लियाम लिव्हिंगस्टन बाद झाला आहे. लिव्हिंगस्टन १५ चेंडूत २५ धावा केल्या. तर, जेमिसनचा हा तिसरा बळी होता.
IPL Final Live Score, RCB vs PBKS updates : अहमदाबादच्या मैदानात कोणाचं पारडं जड? कोणत्या संघाने जिंकलेत सर्वाधिक सामने?
अहमदाबादच्या मैदानात बंगळुरूसमोर पंजाबचं पारडं जड आहे. कारण या संघाने अहमदाबादेत खेळवण्यात आलेल्या सातपैकी पाच सामने जिंकले आहेत. याचा अर्थ त्यांना ७१ टक्के सामन्यांमध्ये यश मिळालं आहे. तर, बँगलोरने ६ पैकी केवळ ३ सामने जिंकले आहेत. त्यांना अहमदाबादेत ५० टक्के यश मिळालं आहे.
IPL Final Live Score, RCB vs PBKS updates : बंगळुरूला मोठा धक्का, विराट कोहली ४३ धावांवर बाद
अझमतुल्लाह ओमरझाईने बंगळुरूला मोठा धक्का दिला आहे. त्याने विराट कोहलीला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं आहे. ओमरझाईने स्वतःच्याच गोलंदाजीवर विराटचा झेल टिपला. विराट ३६ चेंडूत ४३ धावा करून माघारी परतला.
RCB vs PBKS LIVE Score : बंगळुरू १४ षटकांत १२५ पार, सामन्याची सूत्रे विराटच्या हाती
बंगळुरूने १४ षटकांत १२५ धावा जमवल्या आहेत, सामन्याची सूत्रे विराटने आपल्या हाती घेतली आहेत. तो ३३ चेंडूत ४२ धावांवर खेळतोय. तर, लियाम लिव्हिंगस्टन १० चेंडूत १५ धावा करून विराटच्या साथीला उभा आहे.
Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings, IPL 2025 Final LIVE Score : १२ व्या षटकात बंगळुरूचं शतक, विराट अद्याप मैदानात उभा
१२ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर लियाम लिव्हिंगस्टनने एकेरी धाव घेत बँगळुरूचं शतक पूर्ण केलं. लिव्हिंगस्टन ३ धावांवर व विराट कोहली २२ चेंडूत २८ धावांवर खेळत आहेत.
IPL 2025 Final Live : बंगळुरूला मोठा धक्का, २६ धावांवर कर्णधार बाद; जेमिसनचा दुसरा बळी
११ व्या षटकांत काईल जेमिसनने बंगळुरूला चौथा धक्का दिला. त्याने कर्णधार रजत पाटीदारला पायचित पकडलं. राटीदार २६ धावा करून माघारी परतला. सामन्यात जेमिसनने दुसरा बळी घेतला आहे.
IPL Final Live Score, RCB vs PBKS updates : १० षटकांत बंगळुरूच्या ८७ धावा
बंगळुरूच्या संघाने १० षटकांत ८७ धावा चोपल्या आहेत. रजत पाटीदार (१२ चेंडूत १८ धावा) व विराट कोहली (२१ चेंडूत २७ धावा) मैदानावर तळ ठोकून उभे आहेत.
Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings, IPL 2025 Final LIVE Score : चहलचा बँगलोरला दुसरा दणका, मयंक अग्रवाल २४ धावांवर बाद
युजवेंद्र चहलने त्याच्या फिरकीच्या जाळ्यात मयंक अग्रवालला अडकवलं. अग्रवाल अर्शदीप सिंगकरवी झेलबाद झाला. त्याने १८ चेंडूत २ चोकार व एका षटकाराच्या मदतीने २४ धावा जमवल्या.
IPL 2025 Final Live : पॉवर प्लेमध्ये बँगलोरच्या ५५ धावा
बँगलोरने पॉवर प्लेच्या ६ षटकांत ३९ धावा जमवल्या आहेत. मयंक अग्रवाल (१७ चेंडूत २४ धावा) व विराट कोहली (१० चेंडूत १३ धावा) मैदानावर आहेत.
बँगलोरच्या चार षटकात ३९ धावा
बँगलोरने चार षटकात ३९ धावा जमवल्या आहेत. मयंक अग्रवला (११ चेंडूत १४ धावा) व विराट कोहली (४ चेंडूत ७ धावा) मैदानावर आहेत.
RCB vs PBKS Live Score: दुसऱ्या षटकात पंजाबचा बँगलोरला दणका, फिल सॉल्ट बाद
काईल जेमिसनने दुसऱ्या षटकातील चौथ्याच चेंडूवर आक्रमक फिल सॉल्टला श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केलं. सॉल्टने ९ चेंडूत दोन चौकार व एका षटकाराच्या मदतीने १६ धावा जमवल्या.