IPL 2025 SRH vs KKR Highlights: या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबादने २० षटकांअखेर २७८ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सचा संपूर्ण डाव १६८ धावांवर आटोपला. यासह कोलकाताने हा सामना ११० धावांनी आपल्या नावावर केला.
IPL 2025 Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders Live Match Score Updates: आयपीएल २०२५ सनरायझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाईट रायडर्स सामन्याचे लाईव्ह अपडेट्स
SRH vs KKR Live: हैदराबादचा शेवट गोड! कोलकातावर मिळवला ११० धावांनी विजय
या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबादने २० षटकांअखेर २७८ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सचा संपूर्ण डाव १६८ धावांवर आटोपला. यासह कोलकाताने हा सामना ११० धावांनी आपल्या नावावर केला.
SRH vs KKR: केकेआरचे ८ फलंदाज तंबूत! हैदराबादची मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल
कोलकाता नाईट रायडर्स संघातील ८ फलंदाज तंबूत परतले आहे. यासह सनरायझर्स हैदराबादचा संघ मोठ्या विजयाच्या वाटेवर आहे.
SRH vs KKR Live: केकेआरचा निम्मा संघ तंबूत , हैदराबादची चांगली सुरूवात
केकेआरला लागोपाठ २ मोठे धक्के बसले आहेत. रिंकू सिंग बाद झाल्यानंतर आंद्रे रसेलही पहिल्याच चेंडूवर बाद होऊन माघारी परतला आहे.
SRH vs KKR Live: केकेआरला तिसरा धक्का , हैदराबादची चांगली सुरूवात
मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला तिसरा धक्का बसला आहे. क्विंटन डिकॉक बाद होऊन माघारी परतला आहे.
SRH vs KKR Live: केकेआरला दुसरा धक्का
केकेआरला कर्णधार अजिंक्य रहाणेच्या रूपात मोठा धक्का बसला आहे. जयदेव उनाडकटने अजिंक्य रहाणेला झेलबाद करत पॉवरप्लेमध्ये दुसरी विकेट मिळवली. यासह केकेआरने पॉवरप्लेमध्ये २ बाद ५९ धावा केल्या आहेत.
SRH vs KKR Live: सुनील नरेन क्लीन बोल्ड
जयदेव उनाडकटने चौथ्या षटकात सुनील नरेनला क्लीन बोल्ड करत केकेआरला मोठा धक्का दिला. नरेनने शानदार फटके लगावत चांगली सुरूवात करून दिली होती.
या सामन्यात ईशान किशन, ट्रॅव्हीस हेड आणि हेनरिक क्लासेनच्या शानदार फलंदाजीच्या बळावर हैदराबादने केकेआरसमोर विजयासाठी २७९ धावांचे आव्हान ठेवले आहे.
SRH vs KKR Live: ईशान किशन परतला तंबूत
सनरायझर्स हैदराबादला तिसरा धक्का बसला आहे. तो २९ धावा करत माघारी परतला आहे.
सनरायझर्स हैदराबादच्या १८ व्या षटकात २५० धावा पूर्ण. हैदराबादकडून फलंदाजी करताना क्लासेन आणि ईशान किशनने गुजरातच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे.
हैदराबादला दुसरा मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर फलंदाज हेड ७६ धावा करत माघारी परतला आहे.
SRH vs KKR Live:क्लासेन - हेडची तुफान फटकेबाजी! हैदराबादची ३०० धावांच्या दिशेने वाटचाल
हेनरिक क्लासेन आणि हेडच्या जोडीने कोलकाताच्या गोलंदाजांचा चांगलाच अनुभव आहे. हैदराबादने १२ षटकांत १७० धावांचा टप्पा गाठला आहे.
SRH vs KKR Live: हैदराबादला पहिला धक्का
सनरायझर्स हैदराबादला पहिला मोठा धक्का बसला आहे. संघातील सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा बाद होऊन माघारी परतला आहे.
SRH vs KKR Live: पावरप्ले
हैदराबादच्या फलंदाजांनी पावरप्लेच्या षटकांमध्ये दमदार फलंदाजी केली आहे. हेड आणि अभिषेकने ६ षटकांत ७९ धावा केल्या आहेत.
SRH vs KKR Live: सनरायझर्स हैदराबादची वादळी सुरूवात
सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या अभिषेक शर्मा ट्रॅव्हीस हेडच्या जोडीने हैदराबादने चौथ्या षटकात ५० धावांचा पल्ला गाठला आहे.
SRH vs KKR Live: केकेआरची प्लेईंग इलेव्हन
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), मनीष पांडे, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, वैभव अरोरा, हर्षित राणा, एनरिक नॉर्टजे, वरुण चक्रवर्ती
SRH vs KKR Live: सनरायझर्स हैदराबादची प्लेईंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (यष्टीरक्षक), हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, एशान मलिंगा
सनरायझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाईट रायडर्स सामन्याची नाणेफेक हैदराबाद जिंकली असून त्यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल झालेला नाही.
IPL 2025 SRH vs KKR Highlights