IPL Franchise Post For Indian Army: भारत – पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. दोन्ही देशांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बीसीसीआयने आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. आता बीसीसीआयच्या बैठकीत आयपीएल स्पर्धा सुरू केव्हा होणार, याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. ही स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यानंतर नवीन वेळापत्रकाची घोषणा केली जाईल. बीसीसीआयने घेतलेल्या या निर्णयाचं आयपीएल फ्रॅंचायझींनी देखील स्वागत केलं आहे. तसेच भारतीय सैन्याचे कौतुक करणारे पोस्ट आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची खास पोस्ट

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फ्रॅंचायझीने आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “ देश संकटात असताना आम्ही आमच्या भारतीय सशस्त्र दलातील सैनिकांचा धैर्य आणि शौर्याला सलाम करतो. प्रत्येक भारतीयाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो. जय हिंद.”

चेन्नई सुपर किंग्जची खास पोस्ट

चेन्नई सुपर किंग्ज फ्रॅंचायझीने देखील एक्स अकाऊंवरून पोस्ट शेअर करत भारतीय सैन्याला सलाम केला आहे. त्यांनी भारतीय जवानांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर, “ देश प्रथम, इतर सर्व गोष्टी थांबू शकतात…”, असं लिहिलं आहे. या फोटोला कॅप्शन देत त्यांनी, “प्रत्येक पावलात हिम्मत असते, आणि प्रत्येक श्वासात आपला अभिमान. आपल्या सैनिकांना खरंच सलाम करावासा वाटतो..” असं लिहिलं आहे.

मुंबई इंडियन्सने देखील खास पोस्ट शेअर केली आहे. मुंबईने कॅप्शन देत, आम्ही आमच्या सैन्याच्या पाठीशी आहोत, असं लिहिलं आहे. लखनऊ सुपर जायंट्सने ,“ देश प्रथम…” अशी पोस्ट शेअर केली आहे.

आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित

आयपीएल २०२५ स्पर्धेत गुरूवारी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यातील पहिल्या डावातील १० षटकं झाल्यानंतर, हा सामना रद्द करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन्ही देशातील तणावाची स्थिती पाहता आयपीएल २०२५ स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली आहे. या स्पर्धेत ७४ सामने खेळवले जाणार होते. आतापर्यंत ५८ सामने खेळवले गेले आहेत. अजूनही १६ सामने शिल्लक आहेत. लवकरच बीसीसीआय पुढील सामन्यांच्या वेळापत्रकाची घोषणा करू शकते.