आयपीएल फायनलच्या शेवटच्या चेंडूवर सर्वांच्या नजरा रवींद्र जडेजा आणि मोहित शर्मा यांच्यावर होत्या, पण डगआउटमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने डोके खाली करून डोळे मिटले होते. जेव्हा जडेजाने मोहितला चौकार मारून त्याच्याकडे धाव घेतली तेव्हा चेन्नईच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. धोनीलाही आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि त्याने जडेजाला खांद्यावर उचलले आणि त्याला आपल्या मिठीत घेतले. अंतिम सामन्यात शेवटच्या दोन चेंडूत १० धावा करणाऱ्या रवींद्र जडेजाने आयपीएल विजेतेपद धोनीला समर्पित केले, त्यानंतर सीएसकेचे मालक एन. श्रीनिवासन म्हणाले की, “हा चमत्कार फक्त धोनीच करू शकतो.”

श्रीनिवासन यांनी धोनीचे अभिनंदन केले

जडेजाने पत्नी रिवाबासोबत आयपीएल ट्रॉफी धोनीला समर्पित केली. तो म्हणाला की, “हा विजय सीएसकेच्या खास व्यक्तीचा आहे. त्यात गुजरातमध्ये असल्याने घरच्या प्रेक्षकांसमोर पाचवे आयपीएल जिंकणे विशेष आहे.” मंगळवारी सकाळी सीएसकेचे मालक एन. श्रीनिवासन यांनी धोनीशी बोलून त्याचे अभिनंदन केले. श्रीनिवासन यांनी धोनीला सांगितले की, “जादूगार कॅप्टन, अप्रतिम, तू चमत्कार केला आहेस, हे फक्त माहीचं करू शकतोस. आम्हाला तुझा अभिमान आहे.”

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

त्यांनी धोनीला गेल्या काही दिवसांतील त्याच्या कठीण परिश्रमानंतर विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आणि विजय साजरा करण्यासाठी संघासह चेन्नईला येण्याचे निमंत्रण दिले. श्रीनिवासन म्हणाले, “हा सीझन असा होता जिथे चाहत्यांनी दाखवून दिले आहे की ते महेंद्रसिंग धोनीवर किती प्रेम करतात आणि आम्ही पण खूप करतो.” चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी केएस विश्वनाथ आणि चेअरमन आर श्रीनिवासन एन श्रीनिवासन यांच्यासह संध्याकाळी आले होते. तिरुमला तिरुपती देवस्थानमद्वारा संचालित भगवान व्यंकटेश्वर मंदिरात त्यांनी ट्रॉफीसह प्रार्थना केली.

हेही वाचा: WTC Final: “पुजारा हाच एकमेव फलंदाज कसोटी फॉरमॅटसाठी बनवला जातो का?” WTC फायनलपूर्वी सुनील गावसकरांचा टीम इंडियाला सवाल

पुढील नऊ महिने कठोर परिश्रम हे निवृत्त होण्यापेक्षा कठीण असेल- धोनी

सीएसकेच्या विजेतेपदानंतर धोनीचे नाव सर्वांच्या ओठावर आहे आणि एकच प्रश्न आहे की माही पुढच्या हंगामात खेळेल की नाही? खुद्द धोनीच्या म्हणण्यानुसार तो अजूनही या संदर्भात गोंधळात आहे. सामन्यानंतर धोनी म्हणाला की, “परिस्थिती लक्षात घेता निवृत्तीची हीच योग्य वेळ आहे. मला धन्यवाद म्हणणे आणि निवृत्तीची घोषणा करणे सोपे असेल, परंतु येत्या नऊ महिन्यांत कठोर परिश्रम करणे आणि पुढील आयपीएल खेळणे हे कठीण काम असेल. शरीर पूर्णपणे तंदुरुस्त ठेवावे लागते. सीएसकेच्या चाहत्यांकडून मला जे प्रेम मिळाले आहे ते उल्ल्खेनीय आहे.”, असे धोनीने म्हटले आहे. अशा परिस्थितीत त्याचे पुढील आयपीएलमध्ये खेळणे ही त्याच्या चाहत्यांसाठी एक भेट असेल.

चांगल्या लोकांसोबत चांगल्या गोष्टी घडतात : हार्दिक

केवळ सीएसकेचे चाहते, व्यवस्थापन आणि क्रिकेटपटू धोनीचे गुणगान गात आहेत असे नाही. गुजरात टायटन्सचा कर्णधार आणि धोनीचा निकटवर्तीय हार्दिक पांड्याही त्याचे कौतुक करत आहे. हार्दिकचे म्हणणे आहे की, “नशिबाने त्याच्यासाठी विजेतेपद लिहिले होते. तो त्याच्यासाठी (धोनी) खूप खूश आहे. मला त्याच्याकडून हरल्याचा खेद वाटत नाही. चांगल्या लोकांसोबत चांगल्या गोष्टी घडतात आणि धोनी त्याच्या आवडत्या लोकांपैकी एक आहे. देव खूप दयाळू आहे. देवानेही त्यांच्यावर कृपा केली आहे, पण आजची रात्र धोनीची होती.”

हेही वाचा: WTC Final: रोहितसोबत सलामीला कोण उतरणार? वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी टीम इंडियासमोर मोठी समस्या

धोनीने विकेटकीपिंगचा सराव केला नाही

मात्र, चेन्नईच्या एका माजी क्रिकेटपटूच्या मते धोनीला पुढच्या सत्रात खेळणे कठीण आहे. प्रभावशाली क्रिकेटपटू म्हणून तो यष्टिरक्षक रूपाने मैदानात उतरू शकतो. प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी देखील मान्य केले की, “धोनी विकेटकीपिंगमध्ये जबरदस्त आहे परंतु तो सांगू शकतो की त्याने या आयपीएल हंगामात यष्टीरक्षणाचा सराव केलेला नाही. डेव्हन कॉनवेसोबत तो एकदा विकेटकीपिंगला गेला होता, पण तो एक प्रकारचा विनोद होता.”

Story img Loader