scorecardresearch

Premium

WTC Final: रोहितसोबत सलामीला कोण उतरणार? वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी टीम इंडियासमोर मोठी समस्या

Australia vs India, Final: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली यावेळी मुंबई इंडियन्सला आयपीएल ट्रॉफी जिंकता आली नाही. आता रोहित शर्माला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात इतिहास रचण्याची संधी आहे. मात्र, सलामीला कोण? हा प्रश्न कायम आहे.

WTC Final: Who will open with Rohit A big problem for Team India before the final before the World Test Championship
सौजन्य- (इंस्टाग्राम)

Australia vs India, Final Kennington Oval, London: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. ७ जूनपासून लंडनमध्ये हा सामना सुरू होणार आहे. यासाठी बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अंतिम संघ सादर केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली यावेळी मुंबई इंडियन्सला आयपीएल ट्रॉफी जिंकता आली नाही. आता रोहित शर्माला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात इतिहास रचण्याची संधी आहे. मात्र, सलामीला कोण? हा प्रश्न कायम आहे.

आयसीसीने सांगितले की, भारताने १५ सदस्यीय संघात कोणताही बदल केलेला नाही. के.एल. राहुल दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. त्यामुळे त्यांचे नाव मागे घेण्यात आले आहे. तर यशस्वी जैस्वालचा स्टँडबाय खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. जयस्वालने राजस्थान रॉयल्ससाठी चमकदार कामगिरी केली आहे. त्याने १४ सामन्यात ६२५ धावा केल्या आहेत.

canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
canada prime minister justin trudeau (1)
कॅनडाच्या पंतप्रधानांचं जी २० परिषदेवेळीच बिनसलं होतं? ‘या’ कृतीमुळे झाली होती भारतीय सुरक्षा यंत्रणेची अडचण!

विशेष म्हणजे टीम इंडियाने केएस भरत आणि इशान किशन यांचा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात समावेश केला आहे. त्याचबरोबर अनुभवी अजिंक्य रहाणेलाही संधी देण्यात आली आहे. रहाणेने अलीकडे चांगली कामगिरी केली आहे. संघाने वेगवान गोलंदाजांच्या यादीत मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि जयदेव उनाडकट यांना संधी दिली आहे.

अंतिम सामन्यासाठी विराट कोहलीसह टीम इंडियाचे अनेक खेळाडू सरावासाठी उतरले आहेत. कर्णधार रोहित शर्मा देखील ३० मे (मंगळवार) रोजी संघात सामील झाला. असं असलं तरी हा अंतिम सामना रोहित शर्मासाठी खूप खास असणार आहे. रोहितला त्याच्या कर्णधारपदाखाली यावेळी मुंबई इंडियन्सला आयपीएल ट्रॉफी जिंकता आली नसली तरी आता डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात इतिहास रचण्याची संधी त्याच्याकडे आहे.

रोहित शर्मा इतिहास रचण्याच्या वाटेवर

अंतिम सामन्यात रोहित शर्माने आपल्या संघाला ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून दिल्यास, तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार ठरेल. यासह, तो भारतीय संघाला त्याच्या नेतृत्वाखाली आयसीसी ट्रॉफी जिंकणाऱ्या निवडक कर्णधारांमध्ये सामील होईल. स्टार फलंदाज विराट कोहलीही त्याच्या नेतृत्वाखाली भारतासाठी एकही आयसीसी विजेतेपद मिळवू शकला नाही. म्हणजेच रोहितला कर्णधार म्हणून आयसीसी ट्रॉफी जिंकून विराट कोहलीला मागे टाकायची संधी असेल.

हेही वाचा: IPL2023: “माही भाई आपके लिए तो कुछ भी…” धोनीने रवींद्र जडेजाला CSKमध्ये राहण्यासाठी कसे पटवले? जाणून घ्या

अंतिम सामन्यापूर्वी रोहित शर्माच्या फॉर्ममुळे टीम इंडियाचे टेन्शन वाढू शकते. रोहितला आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्ससाठी २०.७५च्या सरासरीने केवळ ३३२ धावा करता आल्या. आता रोहितला ते अपयश विसरून अंतिम सामन्यात फलंदाजीत दमदार खेळ दाखवायला हवा. रोहितच्या विपरीत, शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंनी आयपीएल २०२३मध्ये चमकदार कामगिरी केली. तसेच शुबमन हा सलामीलाच पर्याय असू शकतो. याशिवाय कसोटी विशेषज्ञ चेतेश्वर पुजारानेही अलीकडच्या काळात काउंटी क्रिकेटमध्ये भरपूर धावा केल्या आहेत आणि त्याला इंग्लिश परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे.

आयसीसी विजेतेपदाची प्रदीर्घ प्रतीक्षा संपणार?

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाची आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची प्रतीक्षाही संपणार आहे. तसं पाहिलं तर भारतीय संघ दहा वर्षांपासून एकही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. शेवटच्या वेळी २०२३ मध्ये, टीम इंडियाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर अंतिम सामन्यात त्याने इंग्लंडचा पराभव केला. त्यानंतर टीम इंडियाने अनेक वेळा सेमीफायनल किंवा फायनल गाठली, पण विजेतेपद मिळवता आले नाही.

हेही वाचा: WTC Final: “पुजारा हाच एकमेव फलंदाज कसोटी फॉरमॅटसाठी बनवला जातो का?” WTC फायनलपूर्वी सुनील गावसकरांचा टीम इंडियाला सवाल

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी संघ

ऑस्ट्रेलिया संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अ‍ॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हॅझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, स्टीव्ह स्मिथ (व्हीसी), मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर

स्टँडबाय खेळाडू: मिच मार्श, मॅथ्यू रेनशॉ

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के.एस. भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (यष्टीरक्षक)

स्टँडबाय खेळाडू: यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-05-2023 at 18:10 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×