Team India Squad For WTC Final 2023 : आयपीएल २०२३ चा हंगाम सुरु असतानाच भारताचा सलामीवीर फलंदाज के एल राहुल दुखापग्रस्त झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना राहुलला गंभीर दुखापत झाली अन् तो आयपीएलमधून बाहेर पडला. विशेष म्हणजे राहुल दुखापतीमुळं आगामी होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनललाही मुकला आहे. त्यामुळे ७ जून ते ११ जूनला खेळवण्याता येणाऱ्या या मोठ्या कसोटी सामन्यात राहुलच्या जागेवर कोणत्या खेळाडूची वर्णी लागणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र, आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. कारण भारताचा धडाकेबाज डावखुरा फलंदाज ईशान किशन राहुलच्या जागेवर टीम इंडियात सामील झाल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

इंग्लंडच्या ओव्हल स्टेडियममध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा महामुकाबला रंगणार आहे. आयपीएलमध्ये एकाहून एक रंगतदार सामने होत असतानाच दुसरीकडे टीम इंडियाला या फायनलचे वेध लागले आहेत. अशातच राहुलला दुखापत झाल्याने त्याला शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. परंतु, त्याच्या जागेवर धाकड फलंदाज ईशान किशन खेळणार असल्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा नक्कीच धुव्वा उडणार, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

नक्की वाचा – RCB नं आतापर्यंत IPL किताब का जिंकला नाही? पाकिस्तानच्या माजी खेळाडूचं मोठं विधान, म्हणाला, “विराट कोहली शांत…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

WTC फायनलसाठी टीम इंडियाचा स्क्वॉड : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के एस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन आश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट, ईशान किशन (विकेटकीपर).