IPL 2023, KKR vs PBKS Cricket Score Update: आयपीएलमध्ये आज कोलकाताच्या इडन गार्डनवर पंजाब किंग्जविरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स असा सामना संपन्न झाला. इंडियन प्रीमिअर लीगमधील ५३व्या सामन्यात कोलकाताचा पंजाब किंग्सवर पाच गडी राखून रोमांचक विजय मिळवला. इडन गार्डनवर रसल-रिंकूचा शो पाहावयास मिळाला.  दोन्ही संघ पॉइंट टेबलच्या मध्यभागी अडकले आहेत. येथे पराभूत झाल्यामुळे पंजाब संघाचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग कठीण झाला आहे. शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर रिंकू सिंगने चौकार मारून संघाला विजयी केले.

पंजाब किंग्जचा डाव

पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण त्याची सुरुवात चांगली झाली नाही. २१ धावांवर पंजाबने प्रभासिमरनची पहिली विकेट गमावली. त्याने ८ चेंडूत १२ धावा केल्या. दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या भानुका राजपक्षेला खातेही उघडता आले नाही. लिव्हिंग्स्टन आणि धवन यांनी तिसऱ्या विकेटसाठी २४ धावा जोडल्या आणि आजही लिव्हिंग्स्टन दमदार इनिंग खेळेल असे वाटत असतानाच. ९ चेंडूत १५ धावा केल्यानंतर तो वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर पायचीत बाद झाला. मातब्बर फलंदाज जितेश शर्माने चौथ्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. जितेशने १८ चेंडूत २१ धावांची खेळी खेळली. पंजाबला सर्वात मोठा धक्का धवनच्या रूपाने बसला जेव्हा तो ५७ धावा करून नितीश राणाने बाद झाला.

Mutafizur Rehman To Miss Chennai Super Kings Matches as going back to bangladesh for BAN vs ZIM T20 Series
IPL 2024: CSK समोर मोठा पेच, महत्त्वाच्या सामन्यांमधून हा गोलंदाज होणार बाहेर; काय आहे कारण?
ms dhoni fan madness break up with girl friend poster viral ipl 2024
गर्लफ्रेंडच्या नावात सात अक्षरे नसल्याने बॉयफ्रेंडने उचलले मोठे पाऊल? PHOTO पाहून युजर्स म्हणाले, “धोनीचा असा चाहता…”
Gambhir breaks silence on controversy with Virat,
IPL 2024 : गौतम गंभीरचे विराटबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाला, मला कोहलीकडून ‘ही’ गोष्ट शिकायला आवडेल
Shahrukh Khan Son Abram Bowls Wide Yorker to Rinku Singh Video Viral
IPL 2024: शाहरूखची बॅटिंग तर, लेक अबरामने रिंकू सिंगला टाकला भन्नाट यॉर्कर अन्… Video होतोय व्हायरल

कोलकाता नाईट रायडर्सने पंजाब किंग्जचा पाच गडी राखून पराभव केला. या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना सात गड्यांच्या मोबदल्यात १७९ धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाताने शेवटच्या चेंडूवर पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्सचे ११ सामन्यांत १० गुण झाले असून हा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आला आहे. त्याचबरोबर पंजाब ११ सामन्यांत १० गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे.

हेही वाचा: KKR vs PBKS, IPL 2023: ‘चिते की चाल गुरबाज की नजर’, पहिले सोडला अन् नंतर डायव्हिंग करत पकडला आश्चर्यकारक झेल, Video व्हायरल

या सामन्यात पंजाबकडून कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक ५७ धावा केल्या. त्याचवेळी वरुण चक्रवर्तीने तीन आणि हर्षित राणाने दोन गडी बाद केले. कोलकाता नाईट रायडर्सकडून नितीश राणाने ५१ आणि आंद्रे रसेलने ४२ धावा केल्या. पंजाबकडून राहुल चाहरने दोन बळी घेतले. शेवटच्या षटकात ६ धावांची गरज होती, पण अर्शदीपने अप्रतिम गोलंदाजी केली, पण पुन्हा एकदा रिंकू सिंगने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून कोलकाताला दोन गुण मिळवून दिले. या विजयासह कोलकाताने प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. कोलकाताकडून नितीश राणाने सर्वाधिक ५१ धावांची खेळी खेळली.