IPL 2023, Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Match Updates: इंडियन प्रीमियर लीगमध्ये चुरस दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. प्रत्येक सामन्यात कुठलतरी षटकार-चौकार किंवा अशी विकेट असते, ज्याची नंतर चर्चा होणार हे नक्की. अशीच खेळी करत युवा भारताचा फलंदाज यशस्वी जैस्वालने विरोधी संघातील गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याचे शतक दोन धावांनी हुकले मात्र त्याची वादळी खेळीने राजस्थानला नवी संजीवनी मिळाली. आयपीएलच्या ५६व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर संपन्न झाला. आधी युजवेंद्र चहलच्या जादुई फिरकी आणि जैस्वालची फलंदाजी यामुळे राजस्थानने कोलकातावर ९ गडी आणि तब्बल ७ षटके राखत दणदणीत विजय मिळवला.

राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा नऊ गडी राखून पराभव केला. या विजयासह तो टॉप-४ मध्ये परतला आहे. राजस्थानचा १२ सामन्यांमधला हा सहावा विजय आहे. त्याने १२ गुण मिळवले आहेत. राजस्थान आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने मुंबई इंडियन्सला चौथ्या आणि लखनौ सुपरजायंट्सला पाचव्या स्थानावर ढकलले. दुसरीकडे, कोलकाता संघ १२ सामन्यांतील सातव्या पराभवासह सातव्या स्थानावर घसरला आहे. त्याला १० गुण आहेत. कोलकात्याला प्लेऑफमध्ये पोहोचणे आता कठीण झाले आहे.

Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
Rajasthan Royals Vs Gujarat Titans Match Highlights in Marathi
RR vs GT : गुजरातने राजस्थानचा विजयरथ रोखला, राशिद खानच्या खेळीच्या जोरावर ३ विकेट्सनी नोंदवला शानदार विजय
Rohit sharma speech in Mumbai Indians Dressing Room Video MI vs DC
IPL 2024: ‘वैयक्तिक कामगिरी, विक्रम फारसे महत्त्वाचे नाहीत…’, रोहित शर्माने मुंबईच्या विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंशी साधला संवाद
Rajasthan beat RCB by 6 wickets
RR vs RCB : राजस्थान रॉयल्सने रचला इतिहास! आयपीएलच्या दोन हंगामात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच संघ

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताने २० षटकांत आठ गडी गमावून १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने १३.१ षटकात १ गडी गमावत १५१ धावा करत सामना जिंकला. त्याच्यासाठी यशस्वी जैस्वालने ४७ चेंडूत नाबाद ९८ धावांची तुफानी खेळी केली. जसं काही व्हिडिओ गेम सुरु आहे अशी फलंदाजी केली. कर्णधार संजू सॅमसनने नाबाद ४८ धावा करत त्याला चांगली साथ दिली, दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी केली. संघाला एकच धक्का बसला तो जोस बटलरच्या रूपाने. दुसऱ्याच षटकात तो खाते न उघडता धावबाद झाला.

हेही वाचा: KKR vs RR Match Updates: हेटमायर बनला स्पायडर मॅन! सीमारेषेबाहेर जाणारा चेंडू अडवत टिपला अफलातून झेल, Video व्हायरल

राजस्थानच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले

तत्पूर्वी, राजस्थानच्या गोलंदाजांनी सामन्यात चमकदार कामगिरी केली. त्याच्याकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. या सामन्यात तो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. ट्रेंट बोल्टने दोन बळी घेतले. संदीप शर्मा आणि केएम आसिफ यांना प्रत्येकी एक यश मिळाले.कोलकाताकडून व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक ५७ धावा केल्या. त्यांच्याशिवाय कर्णधार नितीश राणाने २२, रहमानउल्ला गुरबाजने १८, रिंकू सिंगने १६, आंद्रे रसेल आणि जेसन रॉयने १०-१० धावा केल्या. सुनील नरेन सहा आणि शार्दुल ठाकूर एका धावेवर बाद झाला. अनुकुल रॉयने नाबाद षटकार ठोकले.