आयपीएलच्या १९व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होत आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर शुक्रवारी (१४ एप्रिल) दोन्ही संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईटरायडर्सविरुद्ध आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर हॅरी ब्रुकने आयपीएल२०२३ हंगामातील पहिले शतक झळकावले. त्याच्या शतकाच्या जोरावर हैदराबादने कोलकातासमोर २२९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.नाणेफेक जिंकून कोलकाताचा कर्णधार नितीश राणाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो त्याला महागात पडला.

आजच्या सामन्यात सलामीवीर हॅरी ब्रुक कोलकात्याच्या गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडत तुफानी शतक झळकावले. ब्रुकच्या या फटकेबाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने २० षटकात २२८ धावांपर्यंत मजल मारली. तत्पूर्वी, मात्र पाचव्या षटकात पहिल्याच चेंडूवर मयांक अग्रवाल आणि शेवटच्या चेंडूवर राहुल त्रिपाठीला माघारीत घाडत रसेलने हैदराबादच्या डावावर लगाम कसला होता. मात्र तो दुखापतग्रस्त झाला आणि त्याने मैदान सोडले. पॉवर प्लेमधील षटकांच्या अखेरीस हैदराबादच्या २ बाद ६६ धावा झाल्या होत्या.

RCB vs RR Eliminator Match Updates in Marathi
IPL 2024 : नऊ वर्षानंतर राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी Eliminator मध्ये आमनेसामने, पाहा आकडेवारी
IPL 2024 CSK vs RCB Highlights Match Score in Marathi
RCB vs CSK Highlights, IPL 2024 : आरसीबीने ‘करो या मरो’च्या सामन्यात मारली बाजी, सीएसकेचा २७ धावांनी पराभव करत प्लेऑफ्समध्ये दमदार एन्ट्री
KKR 1st team to qualified for IPL 2024 playoffs
IPL 2024 : कोलकाता प्लेऑफ्समध्ये; मुंबईवर दणदणीत विजयासह बाद फेरी गाठणारा पहिलाच संघ
Sunrisers Hyderabad Created History in IPL
SRH vs LSG : सनरायझर्स हैदराबादने रचला इतिहास! ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्माने लावली विक्रमांची रांग
sunrisers hyderabad
SRH vs LSG: हरली लखनौ, पण आव्हान संपलं मुंबईचं; सनरायझर्सनं अवघ्या पाऊण तासात सामना घातला खिशात!
MS Dhoni mastermind planned for wicket ravis Head Kavya Maran shock
मास्टरमाइंड धोनीने स्फोटक ट्रॅव्हिस हेडला असं अडकवलं जाळ्यात, आऊट होताच काव्या मारन झाली निराश; VIDEO व्हायरल
Jake Fraser's Second Fastest Half-Century for Delhi in DC vs MI Match
DC vs MI : जेक फ्रेझरने वादळी अर्धशतक झळकावत रचला इतिहास, दिल्लीसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू
match prediction ipl 2024 royal challengers bangalore match against sunrisers hyderabad today
IPL 2024 : बंगळूरुसमोर विजयाचे आव्हान; सनरायजर्स हैदराबादशी आज गाठ; हेड, कोहलीकडून अपेक्षा

कोलकाता नाईट रायडर्सला त्यांच्या घरच्या मैदानावर ईडन गार्डन्सवर २२९ धावांचे लक्ष्य देण्यात आले आहे. सनरायझर्सच्या हॅरी ब्रूकने ५६चेंडूत नाबाद १०० धावा केल्या. त्याने आपल्या खेळीला १२ चौकार आणि तीन षटकारांचा साज चढवला. आयपीएलच्या १६व्या मोसमातील हे पहिले शतक आहे. कर्णधार एडन मार्करामने २६चेंडूत ५० धावांची खेळी केली. अभिषेक शर्माने १७ चेंडूत ३२ आणि हेनरिक क्लासेनने सहा चेंडूत नाबाद १६ धावा केल्या. मयंक अग्रवाल आणि राहुल त्रिपाठी प्रत्येकी नऊ धावा करून बाद झाले. कोलकाताकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक तीन गडी बाद केले. मात्र हॅमस्ट्रिंगमुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले. त्याच्या व्यतिरिक्त वरुण चक्रवतीला एक विकेट घेण्यात यश मिळाले.

दोन्ही संघांचे प्लेइंग-११

सनरायझर्स हैदराबाद: हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक, टी नटराजन.

कोलकाता नाइट रायडर्स: रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), एन जगदीशन, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, सुयश शर्मा, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती.