IPL 2025 GT vs DC Match Updates in Marathi: आयपीएल २०२५ च्या गुणतालिकेत पहिल्या स्थानी असलेला दिल्ली कॅपिटल्सचा संघ आज गुजरात टायटन्स संघाविरूद्ध खेळत आहे. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या संघाने २०३ धावा केल्या. केएल राहुल पुन्हा या सामन्यात सलामीसाठी उतरला होता. दरम्यान केएल राहुलने संघाचा मेन्टॉर केविन पीटरसनला ट्रोल केलं आहे.

दिल्ली वि. गुजरातच्या सामन्यापूर्वीचा एक व्हीडिओ दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने शेअर केला आहे.यादरम्यान शुबमन गिल केविन पीटरसनला भेटण्यासाठी पोहोचतो. पण राहुलच्या एका उत्तराने पीटरसन त्याच्याकडे पाहतच राहिला. गिल आणि पीटरसन बोलत होते, तेव्हा गिलने विचारलं मेन्टॉरचं नेमकं काय असत? दिल्ली कॅपिटल्सनेही त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.

पीटरसन आणि गिल एकमेकांशी बोलत असतात, त्यात भेटायला येताच पीटरसन गिलला विचारतो, “हॅलो कसा आहेस, काय चाललंय?” गिल म्हणाला, “फार दिवसांपासून संघाबरोबर आहात, मेन्टॉर असण्याचा अनुभव कसा आहे, मजा येतेय का?” यावर पीटरसन विचारतो, “मेन्टॉर काय असतो, मेन्टॉरचं काम काय असत, कोणालाच नाही माहित. तू मला सांगू शकतोस का मेन्टॉर काय करतो?”

यावर केएल राहुल उत्तर देतो, “मेन्टॉर तो असतो जो, सीझनच्या मध्येच दोन आठवड्यांसाठी मालदीवला फिरायला जातो.” राहुलचं उत्तर ऐकून पीटरसनही चकित होतो आणि हसायला लागतो. हे सर्व संभाषण मस्करीत सुरू असत. दिल्ली संघानेच सोशल मीडियावर हा व्हीडिओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Delhi Capitals (@delhicapitals)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Kevin Pietersen Comment on KL Rahul Trolling
दिल्ली कॅपिटल्सच्या व्हीडिओवर पीटरसनची कमेंट

पीटरसनने मैदानावर राहुलला काही प्रत्युत्तर दिलं नाही, परंतु व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये त्याने राहुलला उत्तर दिले. त्याने मेन्टॉर म्हणजे काय हे स्पष्ट केलं आहे. अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मुंबई इंडियन्स (एमआय) विरुद्धचा १२ धावांनी पराभव वगळता त्यांनी सहापैकी पाच सामने जिंकले आहेत. त्यांच्या घरच्या मैदानावरील सामन्यात, त्यांनी राजस्थान रॉयल्स (RR)चा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. दिल्ली संघ सध्या पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे.