Kumar Sangakara Gives Explanation About RR Poor Performance : जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानात आयपीएल २०२३ चा सर्वात रंगतदार सामना रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला. आरसीबीने विजयासाठी १७२ धावांचं आव्हान दिल्यानंतर राजस्थानचा आख्खा संघ अवघ्या ५९ धावांवर गारद झाला. आरसीबीने केलेल्या दारुण पराभवानंतर राजस्थानचे प्रशिक्षक कुमार संगकाराने अखेर प्रतिक्रिया दिली. संगकारा माध्यमांशी बोलताना म्हणाला, हे खराब फलंदाजीचं प्रदर्शन होतं. आम्ही चांगली गोलंदाजी करून आरसीबीला १७१ धावांवर रोखलं होतं. या खेळपट्टीवर १७२ धावांचं लक्ष्य गाठता आलं असतं.

संगकाराने पुढं म्हटलं, “आम्ही पॉवर प्ले मध्ये खूप जास्त प्रयत्न करत होतो, असं मला वाटलं. पॉवर प्ले मध्ये अधिक धावा करण्याची रणनिती आम्ही आखली होती. आम्ही गरजेपेक्षा जास्त सकारात्मक होण्याचा प्रयत्न करत होतो. आम्हाला चांगली भागिदारी करायची होती. पण आम्ही पॉवर प्ले मध्येच पाच विकेट्स गमावले आणि कदाचित आमच्यासाठी हा सामना तेव्हाच संपला होता.”

नक्की वाचा – RCB साठी अनुज रावत ठरला हिरो! धोनी स्टाईलने रनआऊट करून हेटमायरचा झंझावात थांबवला, पाहा जबरदस्त Video

आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात राजस्थानचा कमालीचा फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर यशस्वी जैस्वालला शून्यावर बाद केलं. त्यानंतर पार्नेलच्या गोलंदाजीवर जॉस बटलरही शून्य धावांवर झेलबाद झाला. राजस्थानची खराब सुरुवात झाल्यानंतरही कर्णधार संजू सॅमसनने आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि पार्नेलच्याच गोलंदाजीवर तो ४ धावांवर बाद झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर जो रूटलाही पार्नेलने १० धावांवर बाद केलं आणि आरसीबीनं विजयाच्या दिशेनं वाटचाल केली. शिमरन हेटमायरने १९ चेंडूत ३५ धावा कुटल्या. पण तो मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर झुरेल, आश्विन, झॅम्पा, संदीप शर्मा आणि आसिफही स्वस्तात माघारी परतले आणि राजस्थानचा संपूर्ण संघ गारद झाला. पार्नेलने ३ विकेट घेतल्या. तर ब्रेसवेल आणि कर्ण शर्माला प्रत्येकी दोन विकेट मिळाल्या.