IPL 2025 Lucknow Super Giants Full Squad and Schedule: लखनौ सुपर जायंट्स संघाने लिलावात २७ कोटींची विक्रमी बोली लावत ऋषभ पंतला संघात सामील केलं. कर्णधारपद आणि यष्टीरक्षक या दोन्ही जबाबदाऱ्या हाताळू शकेल अशा खेळाडूच्या लखनौ शोधात होतं आणि लखनौने आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी किंमत मोजत ऋषभ पंतला संघात सामील केलं. रिटेन्शममध्ये त्यांनी कर्णधार लोकेश राहुलला रिलीज केलं होतं. आयपीएलमधील सर्वात मोठी बोली लावणाऱ्या लखनौचा कसा आहे संपूर्ण संघ? जाणून घ्या

लखनौ संघही पूर्णपणे बदललेला दिसणार आहे. संघाचा कर्णधार आणि पहिला खेळाडू असलेला केएल राहुल संघात नसणार आहे. लखनौने कर्णधार पंतला म्हणून संघात घेण्यासाठी विक्रमी बोली लावली आणि २०२५ चा सीझन सुरू होण्यापूर्वी संघाची धुरा त्याच्याकडे सोपवली. फिनिशर म्हणून प्रसिद्ध डेव्हिड मिलरला लखनौनं घेतलं आहे. ऋषभ, पूरन, मिलर हे डावखुरं त्रिकुट प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी ठरू शकतं. विदेशी खेळाडूंमध्ये मिचेल मार्श आणि एडन मारक्रम या खेळाडूंवर लखनौनं विश्वास ठेवला आहे. अब्दुल समद या हैदराबादकडे अनेक वर्ष असणाऱ्या खेळाडूला लखनौनं आपल्याकडे वळवलं आहे.

लखनौ सुपर जायंट्स संघाने आयपीएल लिलावापूर्वी रिटेन केलेले खेळाडू

लखनौ सुपर जायंट्सने निकोलस पूरन, रवी बिश्नोई, मयंक यादव, मोहसीन खान आणि आयुष बडोनी यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. निकोलस पूरन हा संघाचा सर्वात महागडा रिटेन्शन खेळाडू ठरला. लखनौ सुपर जायंट्सने निकोलस पूरनसाठी २१ कोटी रुपये खर्च केले आहेत. याशिवाय रवी बिश्नोई आणि मयंक यादव यांना प्रत्येकी ११ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. पण मयंक यादव दुखापतीमुळे सुरूवातीचे सामने खेळणार नसल्याचे समोर आले आहेत, याबाबत संघाने अद्याप काही माहिती दिलेली नाही. याशिवाय मोहसीन खान आणि आयुष बडोनी यांना अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवण्यात आले आहे. या दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी ४ कोटी रुपयांसह संघात कायम ठेवण्यात आले आहे.

LSG चे किमतीसह रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी

निकोलस पूरन – २१ कोटी
रवी बिश्नोई – ११ कोटी
मयंक यादव – ११ कोटी
मोहसीन खान – ४ कोटी
आयुष बडोनी – ४ कोटी

लखनौ सुपर जायंट्सचा आयपीएल २०२५ साठी संपूर्ण संघ (Lucknow Super Giants IPL 2025 Full Squad)

ऋषभ पंत (कर्णधार), निकोलस पूरन, रवी बिश्नोई, मयंक यादव, मोहसीन खान, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, एडन मारक्रम, मिचेल मार्श, आवेश खान, अब्दुल समद, आर्यन जुयाल, आकाश दीप, हिम्मत सिंग, एम सिद्धार्थ, दिग्वेश सिंग, शाहबाज अहमद, आकाश सिंग, शमर जोसेफ (आरटीएम) , प्रिन्स यादव, युवराज चौधरी, राजवर्धन हंगेरकर, अर्शिन कुलकर्णी, मॅथ्यू ब्रिट्झके

लखनौ सुपर जायंट्स आयपीएल २०२५ चे वेळापत्रक (IPL 2025 Lucknow Super Giants Match Schedule)

२४ मार्च – दिल्ली कॅपिटल्स वि. लखनौ सुपर जायंट्स
२७ मार्च – सनरायझर्स हैदराबाद वि. लखनौ सुपर जायंट्स
१ एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स
४ एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स<br>६ एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स वि. लखनौ सुपर जायंट्स
१४ एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स
१५ एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स वि. चेन्नई सुपर किंग्स
१९ एप्रिल – राजस्थान रॉयल्स वि. लखनौ सुपर जायंट्स
२२ एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स वि. दिल्ली कॅपिटल्स
२७ एप्रिल – मुंबई इंडियन्स वि. लखनौ सुपर जायंट्स
४ मे – पंजाब किंग्स वि. लखनौ सुपर जायंट्स
९ मे – लखनौ सुपर जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
१४ मे – गुजरात टायटन्स वि. लखनौ सुपर जायंट्स
१७ मे – लखनौ सुपर जायंट्स वि. सनरायझर्स हैदराबाद