MI vs LSG IPL 2023 Eliminator Highlights: आयपीएल २०२३च्या एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा सामना मुंबई इंडियन्सशी संपन्न झालाे. चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम खेळताना मुंबईने २० षटकांत ८ गडी गमावून १८२ धावा केल्या आणि मुंबईला १८३ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, लखनऊला केवळ १०१ धावाच करता आल्या. पलटणने तब्बल ८१ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपरजायंट्सचा ८१ धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबईने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळवले आहे. आता शुक्रवारी मुंबईचा सामना गुजरातशी होणार आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने आठ गड्यांच्या मोबदल्यात १८२ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊचा संघ १६.३ षटकांत अवघ्या १०१ धावांवर गारद झाला. या सामन्यात मुंबईसाठी सर्व खेळाडूंनी फलंदाजी करत योगदान दिले. ग्रीनने सर्वाधिक ४१ धावा केल्या. त्याचवेळी लखनऊकडून नवीन-उल-हकने चार आणि यश ठाकूरने तीन बळी घेतले. मार्कस स्टॉयनिसने दुसऱ्या डावात लखनऊसाठी सर्वाधिक ४० धावा केल्या. मुंबईच्या आकाश मधवालने पाच बळी घेतले. या सामन्यातील पराभवाने लखनऊचे प्लेऑफमध्ये पहिला विजय मिळवण्याचे स्वप्न भंगले. या संघाने गेल्या वर्षी एलिमिनेटर सामनाही खेळला होता आणि त्यात पराभव झाला होता.
प्रत्युत्तरात लखनौचा संघ १६.३ षटकात १०१ धावांवर सर्वबाद झाला. २५ धावांच्या आतच संघाचे दोन्ही सलामीवीर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले. इम्पॅक्ट खेळाडू काईल मेयर्स १८ धावा आणि प्रेरक मांकड ३ धावा करून बाद झाला. क्रुणाल पांड्यालाही मोठी खेळी खेळता आली नाही. तो अवघ्या ८ धावांवर बाद झाला. यानंतर आयुष बदोनीलाही संघासाठी मोठी खेळी करता आली नाही. तो केवळ १ धाव करून पॅव्हेलियनमध्ये परतला. निकोलस पूरन गोल्डन डक बनला. लखनऊकडून धडाकेबाज खेळी करणारा मार्कस स्टॉयनिस धावबाद झाला. त्याने २७ चेंडूत सर्वाधिक ४० धावा केल्या. यानंतर कृष्णप्पा गौतमही धावबाद झाला. रवी बिश्नोईलाही काही विशेष कामगिरी करता आली नाही. तो अवघ्या 3 धावांवर बाद झाला. यानंतर दीपक हुडाही धावबाद झाला. १३ चेंडूत एका षटकाराच्या मदतीने १५ धावा करून तो बाद झाला. यानंतर लखनऊच्या विकेट्स ठराविक अंतरानंतर विकेट्स पडत राहिल्या. मुंबईच्या आकाश मधवालने शानदार गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. आकाशने १.४२ च्या स्ट्राइक रेटने ३.३ षटकात केवळ ५ धावा देत सर्वाधिक ५ बळी घेतले.
Lucknow Super Giants vs Mumbai Indians Eliminator Highlights Cricket Match Updates: लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हायलाइट्स स्कोअर अपडेट्स
आयपीएल २०२३च्या एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा सामना मुंबई इंडियन्सशी संपन्न झालाे. चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम खेळताना मुंबईने २० षटकांत ८ गडी गमावून १८२ धावा केल्या आणि मुंबईला १८३ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, लखनऊला केवळ १०१ धावाच करता आल्या. पलटणने तब्बल ८१ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
आकाश मधवालची भेदक गोलंदाजी आणि लखनऊची खराब रनिंग बिटवीन द विकेट्स यामुळे लखनऊ पराभवाच्या छायेत दिसत आहे. रवी बिश्नोई, दीपक हुड्डा यांना बाद करत मुंबई विजयाच्या उंबरठ्यावर आहे.
लखनऊ सुपर जायंट्स १००-९
लखनऊ सुपर जायंट्सची विकेट्स पडण्याची मालिका सुरूच असून १०० धावांच्या आता त्यांच्या सात गडी तंबूत परतले आहेत. त्यामुळे या सामन्यात लखनऊला एखादा चमत्कारचं वाचवू शकतो. कृष्णाप्पा गौतम ३ चेंडूत २ धावा करून धावबाद झाला.
लखनऊ सुपर जायंट्स ९५-७
८९ धावांच्या स्कोअरवर लखनऊची सहावी विकेट पडली. त्यामुळे लखनऊच्या उरल्यासुरल्या ज्या विजयाच्या आशा होत्या त्या धूसर झाल्या आहेत. मार्कस स्टॉयनिस २७ चेंडूत ४० धावा करून धावबाद झाला.
लखनऊ सुपर जायंट्स ८९-६
एकाच षटकात आकाश मधवालने लखनऊ सुपर जायंट्सला दोन धक्के दिले. आधी आयुष बदोनी ७ चेंडूत केवळ एक धाव घेऊन बाद झाला. आकाश मधवालने त्याला क्लीन बोल्ड केले. पाठोपाठ निकोलस पूरन भोपळाही न फोडता इशान किशनवरही झेलबाद केले. आता संघाची मदार मार्कस स्टॉयनिसवर आहे.
लखनऊ सुपर जायंट्स ७४-५
पहिल्या दोन विकेट्स लागोपाठ पडल्यानंतर कर्णधार क्रुणाल पांड्या आणि मार्कस स्टॉयनिस या दोघांनी लखनऊचा डाव सावरला होता. मात्र, पियुष चावलाने त्याला फिरकीच्या जाळ्यात फसवून टिम डेव्हिडकरवी झेलबाद केले. त्याने ११ चेंडूत ८ धावा केल्या.
लखनऊ सुपर जायंट्स ६९-३
टर्निंग पॉईंटवर नेहल वढेरा मार्कस स्टॉयनिसचा झेल सोडला त्यावेळी तो ७ धावांवर खेळत होता. आता ही विकेट मुंबईला किती महागात पडते हे येणारा काळच ठरवेल.
लखनऊ सुपर जायंट्स ३६-२
मुंबईने शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन करत लखनऊच्या दोन्ही सलामीवीरांना तंबूत धाडले. काइल मेयर्सला ख्रिस जॉर्डनने १८ धावांवर ग्रीनकरवी झेलबाद केले.
लखनऊ सुपर जायंट्स २३-२
१८३ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनऊची खराब सुरुवात झाली. प्रेरक मंकड केवळ ३ धावा करून बाद झाला. त्याला ह्रितिक शोकीनने आकाश मधवालकरवी झेलबाद केले.
लखनऊ सुपर जायंट्स १२-१
आयपीएलच्या १६व्या हंगामाची उत्सुकता अंतिम टप्प्यात आहे. चालू हंगामात बुधवारी लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एलिमिनेशन सामना खेळवला जात आहे. चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम खेळताना मुंबईने २० षटकांत ८ गडी गमावून १८२ धावा केल्या आणि मुंबईला १८३ धावांचे लक्ष्य दिले.
इम्पॅक्ट खेळाडू नेहल वढेराने मुंबईच्या डावातील शेवटच्या षटकात मोठा इम्पॅक्ट पाडत दमदार फलंदाजी केली. १२ चेंडूत २३ धावा करून तो रवी बिश्नोईकरवी झेलबाद झाला. त्याला यश धूलने बाद केले.
मुंबई इंडियन्स १८२-८
शेवटच्या काही षटकात मोठे फटके मारण्याचे प्रयत्न मुंबई इंडियन्सचे फलंदाज करत आहेत. मात्र त्यात त्यांना यश येताना दिसत नाही. मोहसीन खानने ख्रिस जॉर्डनला ३ चेंडूत ४ करत दीपक हुड्डाकरवी झेलबाद झाला.
मुंबई इंडियन्स १६८-७
नवीन-उल-हकने आजच्या सामन्यात शानदार गोलंदाजी केली. त्याने आतापर्यंत ४ विकेट्स घेतल्या. तिलक वर्माने २२ चेंडूत २६ धावा केल्या. दीपक हुड्डाने अप्रतिम झेल घेतला.
मुंबई इंडियन्स १५९-६
मोक्याच्या क्षणी धावांची गती वाढवण्यात टिम डेव्हिड बाद झाला. फुलटॉस चेंडूवर बाद झाला मात्र तो नो बॉल होता का यावर थर्ड अंपायरने निर्णय नाकारत तो वैध चेंडू होता असे सांगितले. त्यामुळे टिम नाराज झाला. त्याने १३ चेंडू १३ धावा केल्या.
मुंबई इंडियन्स १४८-५
एकाच षटकात सूर्यकुमार आणि कॅमेरून ग्रीन या दोन सेट फलंदाजांना बाद केल्यानंतर लखनऊ सामन्यात परतली आली. सध्या खेळपट्टीवर खेळत असलेल्या तिलक वर्मा आणि
टिम डेविड यांना आक्रमक खेळी करण्याची गरज आहे. शेवटचे चार षटके राहिली आहेत.
मुंबई इंडियन्स १४१-४
नवीन-उल-हकने एकाच षटकात दोन सेट फलंदाजांना बाद करत लखनऊला सामन्यात परत आणले. १०४ धावांवर मुंबईची तिसरी विकेट पडली. सूर्यकुमार यादव २० चेंडूत ३३ धावा करून कृष्णप्पा गौतमकरवी झेलबाद केले. सूर्यकुमारने आपल्या खेळीत दोन चौकार आणि दोन षटकार मारले. त्यानंतर त्याच षटकात कॅमेरून ग्रीनला त्रिफळाचीत केले. त्याने ४१ धावा केल्या होत्या.
मुंबई इंडियन्स १०५-४
सूर्यकुमार यादव आणि कॅमेरून ग्रीन यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली आहे. दोन्ही फलंदाज वेगाने धावा काढत ग्रीन त्याच्या अर्धशतकाच्या जवळ आहे. त्याचबरोबर सूर्याही वेगाने धावा करत आहे.
मुंबई इंडियन्स १०३-२
सलामीवर इशान किशन आणि कर्णधार रोहित शर्मा लवकर बाद झाल्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ अडचणीत आला होता. मात्र, विस्फोटक फलंदाज 'द-स्काय'ने मागील फॉर्म कायम ठेवत येताच मोठे फटके मारण्यास सुरुवात केली. त्याचा ट्रेडमार्क फिल्प शॉट मारत त्याने चौकार-षटकारांची आतिषबाजी केली. दुसऱ्या बाजूने मागील सामन्यातील शतकवीर ग्रीनही मोठे फटके मारत आहे.
मुंबई इंडियन्स १०२-२
मुंबई इंडियन्सची धावसंख्या दोन गडी गमावून ५० धावा पार अशी पॉवर प्लेमध्ये झाली होती. सूर्यकुमार यादव आणि कॅमेरून ग्रीन आक्रमक फलंदाजी करत आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येकडे घेऊन जात आहेत. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी शानदार भागीदारी केली आहे. पॉवरप्लेनंतर मुंबईची धावसंख्या दोन बाद ६२ अशी आहे.
मुंबई इंडियन्स ६९-२
मुंबईची पहिल्या दोन षटकात चांगली सुरुवात झाली होती. पण तिसऱ्या आणि चौथ्या षटकात लखनऊच्या गोलंदाजांनी कमबॅक करत मुंबईला दोन धक्के दिले. ३८ धावांवर मुंबई संघाची दुसरी विकेट पडली. रोहित शर्मानंतर इशान किशनही बाद झाला आहे. त्याने १२ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने १५ धावा केल्या. यश ठाकूरने त्याला यष्टिरक्षककरवी इशान किशन झेलबाद केले.
मुंबई इंडियन्स ३८-२
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन ही सलामीची जोडी मोठे फटके मारत होते. पण त्यात कर्णधार रोहित नवीन-उल-हकच्या गोलंदाजीवर बदोनीकरवी १० चेंडूत ११ धावा करू झेलबाद झाला.
मुंबई इंडियन्स ३०-१
मुंबई इंडियन्सची फलंदाजी सुरू झाली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन ही सलामीची जोडी क्रीझवर आहे. लखनऊसाठी क्रुणाल पांड्याने पहिले षटक केले. लखनऊने फिरकी गोलंदाजांसह गोलंदाजी सुरू केली आहे. कृष्णप्पा गौतमने दुसरे षटक केले. पांड्याच्या तिसऱ्या षटकात १६ धावा कुटल्या.
मुंबई इंडियन्स ३०-०
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला असून दोन्ही सलामीवीर मैदानात आले आहेत. रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी डावाला सुरुवात केली.
मुंबई इंडियन्स ५-०
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरुन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, तिलक वर्मा, ख्रिस जॉर्डन, हृतिक शोकीन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल.
इम्पॅक्ट खेळाडू पर्याय: नेहल वढेरा, रमणदीप सिंग, विष्णू विनोद.
लखनऊ सुपर जायंट्स: आयुष बदोनी, दीपक हुडा, प्रेरक मंकड, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), क्रुणाल पांड्या (कर्णधार), कृष्णप्पा गौतम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, यश ठाकूर, मोहसिन खान.
इम्पॅक्ट खेळाडू पर्याय: काइल मेयर्स, डॅनियल सॅम्स, युधवीर सिंग, स्वप्नील सिंग, अमित मिश्रा.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात मुंबईचा संघ एका बदलासह मैदानात उतरला आहे. कुमार कार्तिकेयच्या जागी हृतिक शोकीनचा संघात समावेश करण्यात आला आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की एम. ए चिदंबरम स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स सामन्यादरम्यान चेन्नईचे हवामान चांगले दिसत आहे. पावसाची शक्यता नाही आणि सामन्यादरम्यान तापमान ३१-३२अंश सेल्सिअस दरम्यान असेल. दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता फार कमी आहे.
चेपॉक हे चेन्नई सुपर किंग्जचे होम ग्राउंड आहे. येथील खेळपट्टी संथ असून फिरकी गोलंदाजांना मदत होते. यावर्षी सुरुवातीच्या सामन्यांमध्ये येथे खूप धावा झाल्या. मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये गोलंदाजांचे वर्चस्व होते. पहिल्या क्वालिफायरमध्येही फलंदाजी सोपी नव्हती. या सामन्यात फलंदाजांनाही त्रास होऊ शकतो. खेळपट्टी संथ असण्याची शक्यता आहे आणि नाणेफेक जिंकणारा संघ फलंदाजी निवडू शकतो.
प्लेऑफमध्ये मुंबई इंडियन्सचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. मुंबईने प्लेऑफमध्ये १८ सामने खेळले असून १२ जिंकले आहेत. मुंबईने सर्वाधिक पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. या हंगामातही या संघाला सलग तीन सामने जिंकून सहाव्यांदा ट्रॉफी जिंकायची आहे.
https://twitter.com/mipaltan/status/1661348393824796672?s=20
मुंबई संघाला आतापर्यंत आयपीएलमध्ये लखनऊविरुद्ध एकही सामना जिंकला आलेला नाही. या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण तीन सामने झाले असून सर्व सामने लखनऊने जिंकले आहेत. या सामन्यातही लखनऊ संघाला विजय मिळवून मुंबईविरुद्ध अजिंक्य होण्याचा विक्रम कायम ठेवायचा आहे.
https://twitter.com/LucknowIPL/status/1661353911662567425?s=20
Lucknow Super Giants vs Mumbai Indians Eliminator Highlights Cricket Match Updates: लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हायलाइट्स स्कोअर अपडेट्स
२०११मध्ये क्वालिफायर आणि एलिमिनेटर फेऱ्या सुरू झाल्या. तेव्हापासून, १२ हंगामात फक्त एकदाच एलिमिनेटर खेळून संघ चॅम्पियन झाला आहे. हे २०१६मध्ये घडले होते. आज मुंबई किंवा लखनऊ यांच्यापैकी कोणीतरी असे परत करून दाखवणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.