चेन्नई : ‘प्ले-ऑफ’मध्ये अखेरच्या क्षणी प्रवेश मिळवल्यानंतर मुंबई इंडियन्स संघासमोर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या ‘एलिमिनेटर’च्या सामन्यात बुधवारी लखनऊ सुपर जायंट्स संघाचे आव्हान असेल. या सामन्यात लयीत असलेल्या मुंबईच्या फलंदाजांवर सर्वाचे लक्ष असेल.

यंदाच्या हंगामात मुंबईला पहिल्या दोन सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता. मात्र, त्यानंतर मुंबईने कामगिरी उंचावली आणि पुढील १२ पैकी ८ साखळी सामने जिंकले. मुंबईला गुजरात टायटन्सचीही मदत झाली. गुजरातने अखेरच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुवर मात केली. त्यामुळे बंगळूरुचे आव्हान संपुष्टात आले आणि मुंबईला ‘प्ले-ऑफ’मध्ये प्रवेश मिळाला.

मुंबईच्या यशात फलंदाजांनी प्रमुख भूमिका बजावली आहे. सूर्यकुमार यादव व इशान किशन यांनी कामगिरीत सातत्य राखले आहे. कर्णधार रोहित शर्मा व कॅमरून ग्रीन यांनी गेल्या सामन्यात हैदराबादविरुद्ध केलेल्या कामगिरीमुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला असेल. त्यामुळे मुंबईच्या या फलंदाजांना रोखण्याचे लखनऊच्या गोलंदाजांसमोर आव्हान असेल.

वेळ : सायं. ७.३० वाजता

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, जिओ सिनेमा

ग्रीनची भूमिका महत्त्वाची

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमरून ग्रीनने निर्णायक क्षणी खेळ उंचावत सनरायजर्स हैदराबादविरुद्ध अखेरच्या साखळी सामन्यात ४७ चेंडूंत नाबाद शतक झळकावले. त्यापूर्वीच्या चार सामन्यांत मिळून ग्रीनने केवळ १५ धावा केल्या होत्या. हैदराबादविरुद्ध त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले. तो लखनऊविरुद्धच्या सामन्यातही याच क्रमांकावर खेळणे अपेक्षित आहे. त्यामुळे त्याची भूमिका मुंबईसाठी महत्त्वाची असेल. एमए चिदम्बरम स्टेडियमवर झालेल्या चेन्नईविरुद्धच्या साखळी सामन्यात मुंबईला १३९ धावाच करता आल्या होत्या. या सामन्यात नेहाल वढेराने (६४) एकाकी झुंज दिली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लखनऊच्या गोलंदाजांची कसोटी

मुंबईच्या लयीत असलेल्या फलंदाजांसमोर लखनऊच्या गोलंदाजांची कसोटी लागेल. लखनऊसाठी लेग-स्पिनर रवी बिश्नोईने (१४ सामन्यांत १६ बळी) सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. गेल्या काही सामन्यांत त्याने मोक्याच्या क्षणी बळी मिळवले आहेत. त्यामुळे त्याच्यापासून मुंबईच्या फलंदाजांना सावध राहावे लागेल. कर्णधार कृणाल पंडय़ा, नवीन-उल-हक व आवेश खान यांसारख्या गोलंदाजांच्या कामगिरीत सातत्य नाही. याची लखनऊला चिंता असेल. लखनऊकडे क्विंटन डीकॉक, मार्कस स्टोइनिस व निकोलस पूरन यांसारखे आक्रमक परदेशी फलंदाज आहेत. स्टोइनिसने मुंबईविरुद्ध नाबाद ८९ धावांची खेळी केली होती. तसेच पूरनने कोलकाताविरुद्ध अर्धशतक केले होते. कॅमरून ग्रीन