Moeen Ali on MI vs CSK: इंडियन प्रीमियर लीग २०२३ चा सर्वात मोठा सामना आज म्हणजेच ८ एप्रिल रोजी होणार आहे, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आम्ही बोलत आहोत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याबद्दल. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर या मोसमात एमआय आणि सीएसके प्रथमच आमनेसामने असतील. दोन्ही संघांमध्ये हाय व्होल्टेजची लढत पाहायला मिळणार आहे. त्याचवेळी या शानदार सामन्यापूर्वी चेन्नईचा स्टार अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने दोन्ही संघांच्या प्रतिस्पर्ध्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

२०२२ मध्ये आयपीएलच्या मोठ्या लिलावापासून दोन्ही संघ संघर्ष करत आहेत. मुंबई आणि चेन्नई यांच्यातील आयपीएल स्पर्धा आयपीएलचा ‘एल क्लासिको’ म्हणून ओळखली जाते. मात्र, दोन्ही संघांमधील ३४ सामन्यांत मुंबईने २० विजयांसह आघाडी घेतली आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला मोईन म्हणाला, “हा असा सामना आहे ज्याची मी खूप आतुरतेने वाट पाहत आहे. हे दोन सर्वात यशस्वी फ्रेंचायझी संघ आहेत आणि दोघांच्या चाहत्यांची संख्या खूप जास्त आहे. एक क्रिकेटपटू म्हणून मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटबाहेर खेळलेल्या सर्वात मोठ्या सामन्यांपैकी हा एक आहे.

हेही वाचा: Virat Kohli: “कोहलीने येताच बॅट फेकून दिली… मी त्याच्या…”, भारताच्या माजी खेळाडूने सांगितला विराट बाबतील अजब किस्सा

मोईन अलीने केली दोन मोठ्या फुटबॉल संघांच्या सामन्याशी तुलना

मोईन म्हणाला, “हा असा सामना आहे ज्याची मी खूप आतुरतेने वाट पाहत आहे. ही दोन सर्वात यशस्वी फ्रँचायझी संघांची टक्कर आहे आणि दोघांचे चाहते प्रचंड आहेत. एक क्रिकेटपटू म्हणून, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या बाहेर खेळलेल्या सर्वात मोठ्या सामन्यांपैकी एक आहे.” तो पुढे म्हणाला, “तुम्ही फुटबॉलच्या दृष्टिकोनातून पाहिले तर हा सामना मँचेस्टर युनायटेड आणि लिव्हरपूलसारखा आहे. हे मुकाबले खूप मोठे होत असतात. जगात त्यांचीच चर्चा होत असते असे म्हणत त्याने चेन्नई आणि मुंबई या दोन आयपीएल संघांची सुद्धा अशीच चर्चा जगभरात सुरु आहे असे म्हटले.”

याशिवाय, हेड टू हेड सामन्यांबद्दल बोलायचे तर, आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आतापर्यंत एकूण ३४ सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी एसआयने २० सामने जिंकले आहेत. तर चेन्नईला केवळ १४ सामने जिंकता आले आहेत. तथापि, आकडेवारीवर विश्वास ठेवला तर मुंबईचा नेहमीच चेन्नईवर वरचष्मा राहिला आहे.

हेही वाचा: Amit Mishra Catch: युवा खेळाडूलाही लाजवेल अशी ४० वर्षीय मिश्राने चित्याची चपळाई दाखवत पकडला अफलातून झेल, Video व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वानखेडेच्या फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी मुंबईला आक्रमक सुरुवात करून देणे गरजेचे आहे. मधल्या फळीत सूर्यकुमार यादववर मुंबईची भिस्त असेल. सूर्यकुमारला गेल्या काही काळात धावांसाठी झगडावे लागले आहे. त्यामुळे त्याला लवकरच सूर गवसेल अशी मुंबईला आशा असेल.