KKR vs SRH IPL 2024 Final Match Updates: कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२४ च्या फायनलमध्ये जबरदस्त सुरूवात केली आहे. सनरायझर्स हैदराबादची सर्वात मोठी ताकद त्यांचे दोन्ही सलामीवीर होते, ज्यांना पहिल्या दोन षटकांत केकेआरच्या वेगवान गोलंदाजांनी पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पहिल्याच षटकात मिचेल स्टार्कच्या जादुई चेंडूने अभिषेक शर्माला क्लीन बोल्ड केले. तर दुसऱ्या षटकात वैभव अरोराने ट्रॅव्हिस हेडला गोल्डन डकवर बाद केले. विजेतेपदाच्या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना एसआरएचला दोन षटकांत दोन गडी गमावून केवळ सहा धावा करता आल्या. मिचेल स्टार्कने अभिषेक शर्माला ज्या चेंडूवर बाद केले, त्या चेंडूला आता बॉल ऑफ द टूर्नामेंट असं म्हटलं जातंय, ज्याचा व्हीडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे.

आयपीएलच्या मिनी लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने स्टार्कला २४ कोटी ७५ लाख खर्चून संघात घेतले. अशा प्रकारे तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. पण या हंगामातही स्टार्क खेळताना संघासाठी महागडा ठरत होता. पण प्लेऑफमधील सामन्यात स्टार्कने आपली चमक दाखवून दिली. क्वालिफायरमध्ये तीन विकेट घेत त्याने सर्वांची बोलती बंद केली. तर फायनलच्या सामन्यातही त्याने पहिल्याच षटकात संघाला मोठी विकेट मिळवून दिली. फायनलमध्ये पहिल्या षटकातील पहिल्या चार चेंडूत केवळ दोन धावा दिल्यानंतर स्टार्कने पाचवा चेंडू गुड लेंथवर टाकला. या शानदार आऊटस्विंगरने त्याने अभिषेक शर्माचा त्रिफळा उडवला.

Kolkata Knight Riders Win IPL 2024 Title
IPL 2024 Final: कोलकाता नाईट रायडर्स दशकभरानंतर आयपीएल विजेते
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
kolkata knight riders
KKR vs SRH: बॉलरचा झाला बॅट्समन, बॅट्समनचा झाला बॉलर; कोलकाताने असा केला जेतेपदावर कब्जा
Aryan Dev Neekhra pune porsche crash accident
“ते लोक माझा खून…”, पुणे अपघातावरून रॅप करणाऱ्या आर्यनचा कारवाईनंतर आणखी एक व्हिडीओ व्हायरल

स्टार्कने अभिषेकला टाकलेला चेंडू लेग स्टंपच्या लाईनवर पडला आणि तिथून स्विंग झाला आणि ऑफ स्टंपला उडवून गेला. चेंडू सुमारे ६ इंच फिरला आणि अभिषेकचा त्रिफळा उडवून गेला. फलंदाज तर तो चेंडू मारायला गेला पण स्विंगने मात्र आपले काम पूर्ण केले. अभिषेक शर्मा अवघ्या दोन धावा करून बाद झाला.

AN ABSOLUTE RIPPER! ?

As spectacular as it gets from Mitchell Starc ⚡️

He gets the in-form Abhishek Sharma early ?

Watch the match LIVE on @JioCinema and @StarSportsIndia ??#TATAIPL | #KKRvSRH | #Final | #TheFinalCall pic.twitter.com/K5w9WIywuR— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2024

अंतिम सामन्याचे समालोचन करत असलेले प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी या चेंडूला ‘बॉल ऑफ द टूर्नामेंट’ म्हटले, ज्यामध्ये स्विंग करण्यापूर्वी डावखुऱ्या फलंदाजासाठी एक अँगल तयार करण्यात आला होता. आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेला फलंदाज अभिषेक शर्माचा विकेट घेणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर ट्रॅव्हिस हेड खाते न उघडता पुढच्याच षटकात वैभव अरोराचा बळी ठरला. १०० धावा करायच्या आत केकेआरने आपले ८ विकेट गमावले. केकेआरच्या धारदार गोलंदाजीसमोर एकही फलंदाज फार काळ टिकू शकला नाही.