रविवारी लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये लढत झाली. या सामन्यात लखनऊचा वेगवान गोलंदाज मोहसीन खान याने धमाकेदार कामगिरी केली. त्याने फक्त १६ धावा देत दिल्ली कॅपिटल्सच्या चार फलंदाजांना तंबुत पाठवलं. त्याच्या या कामगिरीनंतर त्याने केलेला संघर्ष आणि घेतलेली मेहनत याविषयीचे अनेक किस्से समोर येत आहेत. कठीण काळात मोहसीन खानने स्वत:ला कसं सावरलं तसेच दिग्गज गोलंदाज मोहम्मद शम्मी याने मोहसीन खानबद्दल काय गौरवोद्गार काढले होते, याबद्दल प्रशिक्षक बद्रुद्दीन यांनी सविस्तर सांगितले आहे.

मुंबईकडून संधी मिळत नसल्यामुळे झाला होता निराश

लखनऊ संघाकडून खेळताना मोहसीन खानने दिल्लीच्या डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत, रोवमन पॉवेल आणि शार्दुल ठाकूर यांच्या गड्यांना तंबुत पाठवलं. मात्र स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मोहसीन खानला मोठी मेहनत घ्यावी लागली. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात असताना त्याला खेळण्यास संधी दिली जात नव्हती. त्यानंतर त्याने बद्रुद्दीन यांना फोन कॉल करून त्याच्या मनात काय सुरु आहे याबद्दल सांगितले होते. याविषयी बोलताना “सर मला काहीही समजत नाहीये. मी खूप त्रासलो आहे. हे मला खेळण्याची संधी देत नाहीयेत, असं मला मोहसीन खानने कॉल करुन सांगितलं,” असे बद्रुद्दीन यांनी सांगितले. तसेच त्यानंतर असा विचार मनात आणू नकोस. झहीर खान आणि लसिथ मलिंगा यांच्याशी बोलत राहा. येणाऱ्या काळात तू चांगला गोलंदाज होशील, असे मी त्याला सांगितले,” असेदेखील बद्रुद्दीन यांनी सांगितले.

हेही वाचा >>> IPL 2022 KKR vs RR : आज कोलकाता-राजस्थान आमनेसामने, कोणाचा होणार विजय? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

तसेच मोहसीन खानने मोहम्मद शमीकडून कसे प्रशिक्षण घेतले. तसेच शमीनेही मोहसीनबद्दल काय गौरवोद्गार काढले, याबद्दलही बद्रुद्दीन यांनी सविस्तर सांगितले. “मोहसीन खानला गोलंदाजी करण्यात सुरुवातीला रस नव्हता. मात्र मोहम्मद शमीकडून त्याला खूप काही शिकता आले. लॉकडाऊनदरम्यान शमीने त्याला गोलंदाजीबद्दल बऱ्याच गोष्टी सागितल्या. त्याने शमीकडून रिव्हर्स स्विंगसारख्या गोष्टी शिकून घेतल्या. मोहम्मद शमीने वसीम अक्रमकडून धडे घेतले होते. त्यामुळे तुलादेखील तेच करावे लागेल. अशी संधी पुन्हा-पुन्हा येत नाही. त्यामुळे ही संधू दवडू देऊ नको. भविष्यात तुला हे सगळं मदतीला येईल, असे मी मोहसीन याला सांगितले होते,” असे बद्रुद्दीन म्हणाले.

हेही वाचा >>> विश्लेषण : उमरान मलिकसारखा १५०च्या वेगानं चेंडू टाकायला काय लागतं?

मोहम्मद शमी काय म्हणाला होता ?

लॉकडाऊनच्या काळात मोहसीनने मोहम्मद शमीकडून धडे घेतले. यावेळी शमीने मोहसीनची घालमेल खोळखली होती. मोहम्मद शमीने मोहसीनची प्रशांसा केली होती. ही आठवणदेखील बद्रुद्दीन यांनी सांगितली. “तू माझ्यापेक्षा चांगला गोलंदाज आहेस असे मोहम्मद शमीने मोहसीन खानला सांगितले होते. तसेच त्याला अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असे शमी म्हणाला होता. त्यानंतर मी मोहसीनला कॉल केला तुला मोहम्मद शमीकडून जेवढं शिकता येईल तेवढं शिकून घे, असं सांगितलं. त्यानंतर त्याच्या खेळात बदल झाला,” असं बद्रुद्दीन यांनी सांगितलं.

हेही वाचा >>> CSK vs SRH : अरेरे…एका धावेनं हुकलं ऋतुराज गायकवाडचं शतक; नटराजनने केले बाद

दरम्यान, मोहसीन खान सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. त्याने दिल्लीविरोधातील सामन्यात चार बळी घेतले. चार षटकांत फक्त १६ धावा देत त्याने ही किमया साधली आहे. विशेष म्हणजे त्याने या सामन्यामध्ये सलामीवीरचा खिताब जिंकला.